एक्स्प्लोर

विधानपरिषद निवडणुकीसाठी आपण इच्छुक, पक्षश्रेष्ठींना कळवलंय : एकनाथ खडसे

गेल्या कित्येक दिवसांपासून अडगळीत पडलेल्या एकनाथ खडसेंनी विधानपरिषद उमेदवारासाठी इच्छूक असल्याचं म्हटलं आहे. त्याबाबत पक्षश्रेष्ठींना कळवलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून सक्रिय राजकारणापासून दूर असलेले माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे पुन्हा चर्चेत आले आहेत. विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. विधानपरिषद निवडणुकीच्या उमेदवारीसाठी आपण इच्छुक असल्याचं एकनाथ खडसे यांनी स्वत: बोलून दाखवलं आहे.

विधानपरिषद निवडणूक लढवण्याची आपली इच्छा आपण पक्षश्रेष्ठींकडे व्यक्त केली आहे. याबाबतचा निर्णय काय घ्यायचा ते ठरवतील, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. याआधीही राज्यसभेसाठी माझ्या नावाची चर्चा करण्यात आली होती आणि पक्षाने देखील माझ्या नावाची शिफारस त्यावेळी केली होती. मात्र तेव्हा ते होऊ शकलं नाही. मात्र मला सुरुवातीपासूनच महाराष्ट्राच्या राजकारणात रस होता आणि आजही तो आहे. त्यामुळे आपण विधानपरिषदेवर जाण्यास इच्छुक आहोत, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं. मात्र अगोदरच दूर केलेल्या एकनाथ खडसे यांच्या मागणीकडे भाजप पक्षश्रेष्ठींकडून किती गांभीर्याने पाहिलं जातं, याकडेच आता सर्वांचा लक्ष लागून आहे.

महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक

भाजपच्या चार जागांसाठी विधानसभेत पराभूत झालेले किंवा उमेदवारी न मिळालेल्या 'स्वकीय आणि परकीय' अशा दोन्ही इच्छुकांमध्ये चुरस पाहायला मिळेल.

कोणाच्या नावांची आहे चर्चा?

पंकजा मुंडे - भाजपचा आक्रमक ओबीसी चेहरा. विधानसभेत मोठ्या फरकाने पराभव झाल्यामुळे मराठवाड्यात पुन्हा ताकद देण्याचा प्रयत्न. मागील पाच वर्षे ग्रामविकास आणि महिला बाल कल्याण मंत्री म्हणून कामाचा अनुभव असल्यामुळे सरकारला कोंडीत पकडण्याची संधी.

एकनाथ खडसे - राज्यसभेवर पाठवण्याच्या चर्चेला पूर्णविराम देत, मला राज्याच्या राजकारणात रस असल्याचं खडसे यांनी स्वतः स्पष्ट केलं होतं. विरोधी पक्ष नेते पदाचा दांडगा अनुभव. राज्यातील ओबीसी नेतृत्वाची मोट बांधून संघटनात्मक बळकटीसाठी अजूनही प्रभावीपणे काम करण्याची इच्छा.

चंद्रशेखर बावनकुळे - उमेदवारी नाकारल्यामुळे तेली समाजाने विधानसभा निवडणुकीत पाठ फिरवली. नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय. माजी मंत्री म्हणून प्रशासनावर चांगली पकड. आर्थिक पाठबळ असलेला विदर्भाचा महत्वाचा नेता.

विधानपरिषद निवडणूक | कुणाला किती जागा? 9 जागांसाठी अशी आहेत आकड्यांची गणितं

हर्षवर्धन पाटील - इंदापूरमधून पराभूत झाल्यानंतर भाजपात सक्रिय राहण्यासाठी विधानपरिषदेत वर्णी. उत्तम संसदपटू आणि संसदीय कामकाजाचा गाढा अभ्यास. सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी सक्षम. पश्चिम महाराष्ट्रातील मोठा चेहरा.

रणजितसिंह मोहिते पाटील - लोकसभा निवडणुकीत भाजपात प्रवेश करून थेट शरद पवारांना शह दिला. मात्र अध्याप योग्य पुनर्वसन नाही. उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र. सोलापूर आणि आसपासच्या परिसरात चांगली संघटनात्मक बांधणी.

मुन्ना महाडिक - प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मध्यस्थीने भाजपात प्रवेश. लोकसभा आणि विधानसभेतील पराभवानंतर महाडिक यांच्या घरात एकही पद नाही. मात्र कोल्हापुरात कार्यकर्त्यांचं मोठं जाळं आहे.

मात्र, भाजपच्या पद्धतीनुसार संभाव्य उमेदवारांची यादी केंद्रीय संसदीय समितीकडे पाठवण्यात आली आहे. या जागांसाठी अनेक नावांची शिफारस राज्याच्या कोअर कमिटीकडून करण्यात आली आहे. याबाबत शिक्कामोर्तब केंद्रीय नेतृत्वाकडूनच जाणार केली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार

व्हिडीओ

Udayanraje Bhosale उदयनराजेंच्या हस्ते गाण्याचं प्रदर्शन,चर्चा उदयनराजेंच्या स्टाईलची Special Report
Narayan Rane Sindhudurg Speech : आता घरी बसायचं...नारायण राणेंचा राजकीय सन्यास, भावनिक भाषण UNCUT
Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
Uddhav Thackeray : तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
तेजस्वी घोसाळकरच्या विरोधात नाही तर भाजपची प्रवृत्ती ठेचायला आलोय; सासऱ्यांसमोर उद्धव ठाकरेंचं भाषण
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Embed widget