एक्स्प्लोर

Vidarbha Weather Update : विदर्भात उन्हाचा प्रकोप कायम! पुढील तीन दिवस उष्णतेची लाट, तर 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात सर्वत्र उन्हाचा प्रकोप आणि उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. तर आजपासून पुढील तीन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा तर अकोला शहराला ऑरेंज अलर्ट  जारी करण्यात आला आहे.

Vidarbha Weather Update नागपूर : राज्यात सर्वत्र उन्हाचा प्रकोप आणि उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले आहे. तर दुसरीकडे विदर्भातील (Vidarbha) जवळ जवळ सर्व जिल्ह्यांतील उष्णतेचा पारा (Temperature) रोज नवे उच्चांक गाठत आहे. वाढत्या उन्हाचा धोका लक्षात घेता अकोला (Akola) जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर आजपासून पुढील तीन दिवस विदर्भातील काही जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा तर अकोला शहराला ऑरेंज अलर्ट  जारी करण्यात आला आहे. संभाव्य उन्हाचा इशारा लक्षात घेता नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच गरज नसल्यास दुपारच्या वेळी बाहेर जाणे टाळावे. असे आवाहन देखील नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून (IMD) करण्यात आले आहे. 

विदर्भातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Chnage) होत असून सध्या हवामानाची विविध रूपं आणि रंग बघायला मिळत आहेत. सध्या राज्यातील काही भागात अवकाळी पावसाचा (Unseasonal Rain) प्रकोप पहायला मिळतोय. तर काही भागात पाण्याचं दुर्भिक्ष्य असणारा दुष्काळाने अनेक गावांची चिंता वाढवली आहे. मात्र, गेल्या आठवड्यातील अवकाळी पावसानं काहीसे सुखावलेले अकोलेकर (Akola) सध्या उन्हाच्या वाढलेल्या पाऱ्यानं चांगलेच हैराण झाले आहेत. अकोला (Akola) जिल्ह्यात 31 मे पर्यंत कलम 144 अन्वये जमावबंदी लागू करण्याचे आदेश अकोल्याचे जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिले आहेत.

तर दुसरीकडे आजपासून पुढील दोन दिवस अकोला जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. या सोबतच आगामी 29 मे पर्यंत चंद्रपुर जिल्ह्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून या दोन्ही जिल्ह्यांत उष्णतेची लाटेचा अंदाज नागपूर प्रादेशिक हवामान विभागाकडून (IMD) वर्तविण्यात आला आहे.

यवतमाळ जिल्ह्यात विक्रमी तापमामाची नोंद 

यवतमाळ जिल्ह्यात आज 45.5 अशी विक्रमी तापमामाची नोंद झाली आहे. यावर्षीच्या उन्हाळ्यातील हे सर्वोच्च तापमान ठरले असून गेल्या पाच वर्षांतले हे सर्वाधिक तापमान असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून सूर्य सकाळी 8 वाजता पासून आग ओकू लागला असून नागरिकांना उन्हाचे तीव्र चटके बसू लागत आहे. तर दुपारच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट दिसून येत आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रात असे एकूण 64 शीत कक्ष सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी 227 बेड राखीव ठेवण्यात आले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sadabhau Khot Vs Sharad Pawar | सदाभाऊ आधी बरळले, आज दिलगिरीची भाषा Special ReportBharat Jodo Yatra Congress | भारत जोडो अभियानात 197 संघटना असल्याची माहिती Special ReportDonald Trump |  ट्रम्पचा विजय, भारतासाठी अच्छे दिन? Special ReportShah Rukh Khan Threat | आधी भाईजान आणि आता किंग खान, शाहरूख खानला जीवे मारण्याची धमकी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget