एक्स्प्लोर

Chandrapur News : चंद्रपुरात पावसाचा रुद्रावतार! शेकडो घरं पाण्याखाली, अनेक जनावरे दगावली, जनजीवन विस्कळीत

Chandrapur News : चंद्रपूर जिल्ह्यात या पावसानं कहर केल्याचे बघायला मिळाले आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील चिचपल्ली गावातील गावतलाव फुटल्याने गावातील अंदाजे 100 ते 150 घरांमध्ये पाणी शिरले आहे.

Chandrapur News चंद्रपूर : मधल्या काळात पावसानं दांडी दिल्याने विदर्भातील शेतकऱ्यांची चिंता वाढवली होती. मात्र गेल्या दोन दिवसात उपराजधानी नागपूरसह (Nagpur News) पूर्व विदर्भाला अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. सध्या पूर्व विदर्भात (Vidarbh) सुरू असलेल्या धुव्वाधार पावसाने  (Heavy Rain) सर्वत्र एकाच दाणादाण उडवली आहे. अतिवृष्टी सदृश्य  पावसामुळं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातील रस्त्यांना नदी नाल्याचे स्वरूप प्राप्त झालं आहे. दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात (Chandrapur News) या पावसानं कहर केल्याचे बघायला मिळाले आहे. चंद्रपूर-मूल मार्गावरील चिचपल्ली गावातील गावतलाव फुटल्याने गावातील अंदाजे 100 ते 150 घरांमध्ये पाणी शिरले आहे.  सलग दोन दिवस पाऊस झाल्याने गावतलावातील पाण्यात मोठी वाढ झाली. दरम्यान आज पहाटे तलावाची पाळ फुटून गावात पाणी शिरले आहे. परिणामी गावातील ग्रामस्थांचे धान्य आणि इतर साहित्याचे मोठं नुकसान झाले आहे. सोबतच गावातील जवळपास 100 बकऱ्या आणि इतर जनावरं देखील या पुरात दगावले आहेत.  

अनेक घरं पाण्याखाली, शेकडो जनावरे दगावली

उपराजधानी नागपूरसह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना शनिवारच्या सकाळपासून कोसळणाऱ्य मुसळधार पावसाने (Heavy Rain) धो- धो धुतलंय. दरम्यान अजून देखील काही भागात पावसाचा जोर कायम असून संभाव्य पावसाचा धोका लक्षात घेता योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाच्या (IMD) वतीने केले आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका पूर्व विदर्भाला बसला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिचपल्ली गावातील गावतलाव फुटल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले आहे. अचानक आलेल्या या पाण्यामुळे शेकडो घरं पाण्याखाली गेली आहे. यात अनेक जनावरे देखील दगवली आहे. तर शेतकऱ्यांनी शेतीसाठी घरात आणून ठेवलेले खत आणि बी-बियाणेही पाण्यात भिजली आहे. एकुणात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि वित्त हानी झाल्याचे चित्र आहे. 

मुख्यमंत्र्यांचे सर्व यंत्रणेला आदेश  

महाराष्ट्रात पडत असलेल्या अतीमुसळधार पाऊसामुळे कुठे ही आपत्कालीन परिस्थिती उद्धभवू नये यासाठी सर्व यंत्रणांना सतर्क रहाण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक, राज्यातील सर्व महापालिका आयुक्त आणि आप्तकालिन यंत्रणांच्या प्रमुखांशी फोनवरून चर्चा केलीय. सर्व यंत्रणांना सतर्क रहाण्याचा आदेश यावेळी देण्यात आला आहे.

सह्याद्रीपर्वत रांगांच्या पूर्व आणि पश्चिम उतारावर अतीमुसळधार पाऊस पडत आहे. या ठिकाणी नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी पूर नियंत्रण यंत्रणा सज्ज करणे, तसेच रविवार असल्यामुळे वर्षा पर्यटनालाठी मोठ्या संख्येने पर्यटक बाहेर पडले आहेत. त्यांना धोकादायक परीस्थितीची वेळीच जाणीव करून देणे सोबतच अती धोकादायक ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

इतर महत्वाच्या बातम्य

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का

व्हिडीओ

Naresh Mhaske : ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होताच नरेश म्हस्केंनी दिल्या शुभेच्छा म्हणाले..
Mahapalikecha Mahasangram Dhule : धुळ्यातील नागरिकांच्या समस्या काय? स्थानिक पत्रकारांशी संवाद
Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
KDMC : शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
शिंदेंच्या बालेकिल्ल्याला मनसे-ठाकरेसेना सुरूंग लावणार का? भाजपचं गणित काय? कल्याण-डोंबिवलीमध्ये कोण बाजी मारणार?
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
पंतप्रधान हे बारामती किंवा कराडमधले होणार नाहीत; एपस्टिन फाईलबाबत पृथ्वीराज चव्हाणांचे पुन्हा भाष्य
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
बनावट आयकार्ड, बोगस IAS अधिकाऱ्याच्या तुळजापूर मंदिरात पर्दाफाश; व्हिआयपी दर्शनासाठ अट्टाहास नडला
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
Embed widget