एक्स्प्लोर

Vidarbha Rain: विदर्भात मुसळधार पावसाचा कहर!धरणांचे दरवाजे उघडले,पूराच्या पाण्यात जनजीवन ठप्प,कुठे काय परिस्थिती?

Vidarbha Heavy Rains: राज्यातील अनेक भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असून नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत.

Vidarbha Rain Update: विदर्भात रविवारी सकाळपासून मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. बुलढाणा, अकोला, जळगाव, वाशिम, चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांत अतिवृष्टी झाल्याने नद्या-नाले धोक्याच्या पातळीवर पोहोचले आहेत. धरणांचे दरवाजे उघडावे लागले असून, शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे. हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, अनेक घरांना व दुकांनांना पाण्याचा फटका बसला आहे.

बुलढाणा जिल्हा

बुलढाण्यातील मेहकर, चिखली, सिंदखेड राजा तालुक्यांत मुसळधार पाऊस झाला. नदी-नाले तुडुंब भरून वाहू लागले. चिखली तालुक्यातील शेलगाव आटोळ येथे एक युवक पुराच्या पाण्यात वाहून गेला; त्याचा मृतदेह चार तासानंतर सापडला. जिल्ह्यात शेकडो हेक्टर शेती जलमय झाली आहे. बुलढाणा-चिखली, नागपूर-मुंबई, खामगाव-मेहकर यांसह अनेक महामार्ग बंद झाले आहेत. ग्रामीण भागात घरांमध्ये पाणी शिरून पडझड झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

अकोला जिल्हा

अकोल्यात मुसळधार पावसामुळे काटेपूर्णा प्रकल्पाचे सर्व 10 दरवाजे ६० सें.मी.ने उघडण्यात आले असून ४८० क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. तर पारस औष्णिक विद्युत केंद्रासाठी बनवलेल्या बाळापूर प्रकल्पाचे १० दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणामी बाळापूर शहराचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. मन आणि महेशा नदीकाठच्या भागांत पाणी शिरल्याने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे.

जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे धबधबे पर्यटनाचे केंद्र ठरत आहेत. अजिंठा लेणी परिसरातील सप्तकुंड धबधबा आणि यावल तालुक्यातील मनू देवी धबधबा मोठ्या धबधक्यासह वाहू लागले आहेत. मात्र, रावेर-अजनदा जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक रोखण्यात आली आहे. सकाळपासून पाऊस थांबल्याने पूर ओसरला असला तरी ,नाल्याच्या पुराने अनेक शेतात  आणि घरात पाणी शिरल्याने पिकांचे आणि घरांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळाले,काही ठिकाणी घराच्या भिंती कोसळल्या आहेत तर बक्षी पुरा गावात वादळी पावसात सहा बकऱ्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे

चंद्रपूर जिल्हा

चंद्रपूर जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस झाला नसला तरी पश्चिम विदर्भातील मुसळधार पावसामुळे वर्धा नदीला मोठा पूर आला आहे. ईसापुर आणि सातनाला धरणांतून मोठा विसर्ग सुरू झाल्याने वर्धा, पैनगंगा, इरई आणि झटपट नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे चंद्रपूर-हडस्ती आणि चोरगाव रस्ते बंद करण्यात आले आहेत. मात्र, इरई धरणातून पाणी सोडलेले नसल्याने शहराला पुराचा धोका आत्तापर्यंत टळला आहे.

वाशिम जिल्हा

वाशिमच्या नेतन्सा परिसरात थरारक घटना घडली. नमहादेव मंदिर दर्शनाला गेलेल्या 8 युवकांना कांचनदीच्या पुराने वेढा घातला. हे युवक जवळपास पाच तास पाण्यात अडकले होते. अखेर धाडसाने एका युवकाने बाहेर पडून थरारक सुटका केली. प्रशासनाकडून मदत पोहोचण्यास विलंब झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अमरावती-यवतमाळ जिल्ह्यात गेले दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरणाचा विसर्ग सुरू आहे. या धरणाचे पाणी पैनगंगा नदीतून वर्धा नदीत आल्याने वर्धा, इरई आणि झरपट नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

प्रशासनाचा इशारा

राज्यातील अनेक भागात अजूनही मुसळधार पाऊस सुरू असून नद्या-नाले तुडुंब भरून वाहत आहेत. धोक्याची पातळी ओलांडलेल्या नद्यांच्या काठावर नागरिकांनी जाणे टाळावे तसेच नदीपात्र ओलांडू नये, अशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget