एक्स्प्लोर

शेतकऱ्यांच्या समस्य़ांवरुन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंकडून सरकारची कानउघाडणी

"जनतेसाठी शेतकरी अन्नधान्य पिकवतात, त्यामुळे त्यांची काळजी घेणं ही सरकारचीच जबाबदारी आहे," असं म्हणत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सरकारचे कान टोचले.

नागपूर : "जनतेसाठी शेतकरी अन्नधान्य पिकवतात, त्यामुळे त्यांची काळजी घेणं ही सरकारचीच जबाबदारी आहे," असं म्हणत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सरकारचे कान टोचले. नागपूरमध्ये अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. नागपुरात दरवर्षी अॅग्रोव्हिजन कृषी प्रदर्शनाचे आयोजन केलं जातं. यंदाचं हे नववं वर्ष असून, शुक्रवारपासून सुरु झालेले हे प्रदर्शन सोमवारपर्यंत चालणार आहे. यात शेती बरोबरच शेतीतील नविन तंत्रज्ञानाची माहीती देण्यात आली. नायडू म्हणाले की, "आता शेतकरी स्वतः ला संघटीत करत असून, ते त्यांच्या रास्त मागण्यासाठी आंदोलने ही करत आहेत. मात्र हे आंदोलन अहिंसक असायला हवे," असे ही व्यंकय्या नायडू म्हणाले. "संसदेमध्ये शेतीवर चर्चा झाल्यास माध्यमं कधीच त्याकडे लक्ष देत नाहीत. मात्र, संसदेत कोणी धुडगूस घातला, तर माध्यमांमधून त्याची चर्चा होते. माध्यमांनी शेती आणि ग्रामीण विषयांना प्राधान्य द्यायला हवं," असे ते म्हणाले. याच कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे लाभ पोहोचतील, अशी ग्वाही दिली. आम्ही राज्याच्या इतिहासात आजवरची सर्वात मोठी आणि पारदर्शक कर्जमाफी केल्याचा दावा त्यांनी केला. विशेष म्हणजे, विद्यमान सरकारने केलेल्या पारदर्शक कर्जमाफीमुळे फक्त योग्य आणि गरजू शेतकरीच पात्र यादीत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

महत्त्वाच्या बातम्या

Goa Travel Restrictions : पावसात गोव्याला जाताय? पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार, कडक नियम लागू
पावसात गोव्याला जाताय? पर्यटकांनी पाण्यात उतरल्यास थेट तुरुंगात जावं लागणार, कडक नियम लागू
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार

व्हिडीओ

Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?
TET Exam Paper Leaked Case : टीईटी पेपरफुटीचे धागेदोरे थेट बिहार, हरियाणापर्यंत... | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Income Tax Rules : तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुम्ही तुमचा आयटीआर भरला नाही तर काय होईल? टॅक्स नसेल तरी दंड भरावा लागेल का?
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
तुकाराम मुंढे इम्पॅक्ट; अलिशान कारमधून गुटखा जप्त, 28 लाखांचा मुद्देमाल हस्तगत, श्रीगोंद्यात पोलिसांची कारवाई
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
मन हेलावणारी घटना, झाड कोसळून स्कुलबसमधील विहानचा मृत्यू, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर; अकस्मात मृत्यूची नोंद
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
युरोपमधील उष्णतेच्या लाटेमुळे भारतीय एसी निर्यातदारांवर जगाचे लक्ष केंद्रित; उत्पादकांना संधी, ग्राहकांना पर्याय
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
मोठी बातमी ! राज्यातील NHM चे 15 हजार कंत्राटी कर्मचारी झाले 'परमनंट'; 7 व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार
Ayodhya Ram Mandir : अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
अयोध्या राम मंदिर देणगी चोरी प्रकरण; 'बँक ऑफ बडोदा'ला पोलिसांची नोटीस, आरोपींच्या खात्यांबाबत मोठी माहिती समोर
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
धक्कादायक! संभाजीनगरमध्ये शिक्षकावर विद्यार्थ्याचा चाकूहल्ला, अकोल्यात नगरसेवकाच्या पतीवर जीवघेणा हल्ला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 जून 2026 | शनिवार
Embed widget