Mumbai Mayor Bunglow : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग; टीकेची झोड उठताच महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण, म्हणाल्या महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख
नव्या निविदा प्रक्रियेचे काम राणीच्या बागेचे होते. मात्र महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख केला गेला. या वादामुळे टेंडर मागे घेण्याचे आदेश मी दिले असल्याची अधिकृत माहिती महापौर रितू तावडेंनी यावेळी दिली.

Mumbai News: मुंबईच्या महापौरांच्या अधिकृत बंगल्याच्या खर्चासंदर्भातील (Mumbai Mayor Bungalow Expenditure) नव्या निविदा प्रक्रियेच्या बातमीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अशातच या मुद्दयावरुन विरोधकांनी महापौर रितू तावडेंवर टीका केलीय. दरम्यान, या प्रकरणावर महापालिकेने स्पष्टीकरण देत सांगितले होतं, की निविदेशी महापौरांचा अथवा महापौर निवासस्थानाचा काहीही संबंध नाही, तर, पालिकेकडून (BMC) दिलेल्या स्पष्टीकरणानंतर आता स्वतः रितू तावडे (Ritu Tawde) यांनी मुंबई पालिकेचे वादग्रस्त टेंडर मागे घेण्याचे आदेश दिले आहे. सोबतच पत्रकार परिषद घेत त्यांनी या बाबत अधिक खुलासा केलाय. दरम्यान यावेळी विरोधकांच्या टीकेलाही रितू तावडे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.(Ritu Tawde on Mumbai Mayor Bunglow)
नव्या निविदा प्रक्रियेचे काम राणीच्या बागेचे होते. मात्र महापौर बंगल्याचा चुकून उल्लेख केला गेला आहे. या सगळ्या वादामुळे हे टेंडर मागे घेण्याचे आदेश मी दिले असल्याची अधिकृत माहिती महापौर रितू तावडेंनी यावेळी दिली.
Ritu Tawde: फेक नेरेटिव्ह पसरवला जातोय, उबाठा या आडून पक्ष चालवतोय
महापौर बंगल्याशी जर या सगळ्या टेंडरचा संबंध जोडला जात असेल, तर उद्यान विभागाकडून सांगण्यात आलं आहे की जर तुम्हाला अडचण होत असेल तर हे टेंडर मागे घेऊ. जेणेकरून चौकशीचा प्रश्नच उद्भवत नाही. एक फेक नेरेटिव्ह पसरवला जातोय की महापौर बंगल्यासाठी आणखी खर्च केला जातोय. महापौर बंगला हेरिटेजकडे येतो. ही टेंडर प्रोसेस बंगल्याच्या अख्त्यारीत येत नाही. महापौर नाव जोडलं की मायलेज त्यांना (विरोधकांना) मिळतो. आपली दुकान, उबाठा या आडून पक्ष चालवतोय. असा आरोपही महापौर रितू तावडेंनी केला आहे.
Mumbai Mayor PC : 'माझ्या बंगल्यात साधा खिळाही मारलेला नाही'; महापौरांचे स्पष्टीकरण
दरम्यान, 'माझ्या बंगल्यात साधा खिळाही मारलेला नाही. 2 कोटी 89 लाख टेंडर काढलाय ते राणीची बाग झू उद्यान विभागाकडून टेंडर काढालंय, हेरिटेज कडून काढलेला नाही. नॉइज बारियर असेल किंवा इतर काही असेल महापौर बंगला ते झू या ठिकाणाचं काम केलं जातंय. बंगलाच्या आतलं काम कुठेही सुरु नाही. अपग्रेडेशन बंगला प्रीमियासेस असा शीर्षक आहे. याचा अर्थ बंगला परिसर ते झू असा आहे. असे स्पष्टीकरण रितू तावडे यांनी या संदर्भात दिले आहे.
Ritu Tawde: महापौर बंगल्याच्या संदर्भातील टेंडर शीर्षकमुळे गोंधळ झाला.
मॅनहोलमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटूंबियाला 10 लाख देण्यात आले आहेत. गाडीचा विषय हा स्थायी समितीला आलेला नाही, मंजूरी आली नाही त्याआधीच चर्चा करतायत. कॉन्ट्रॅक्टर बेसेसवर या गाड्या आहेत. तर महापौर बंगल्याच्या संदर्भातील टेंडर शीर्षकमुळे गोंधळ झाला. ते पत्रक बदलून देण्यात येईल. ही शीर्षकाची गंभीर चूक आहे. गार्डन अधीक्षक शी सुद्धा मी बोलले ते दुरुस्त करत आहे. शीर्षकमुळे गोंधळ झाला. साउंड बारियर का लावले जातात? हे प्रशानसाची बाब आहे. प्रशासन यावर उत्तर देईल. संबंधित त्रिपाठी यावर बोलतील. पाण्याच्या टाक्या कशाला हव्यात, यावर प्रशासन उत्तर देईल. मात्र महापौर बंगल्याशी याचा काहीही सबंध नाही. राणीच्या बागेतील प्रभातफेरी बद्दल, झू अथोरीटी सेंटर डिपार्टमेंटकडून नोटीस आली आहे. त्यांना उत्तर द्यायचं आहे. प्रभात फेरी कशी सुरु करता येईल यावर विचार सुरु असल्याचे ही महापौर रितू तावडे म्हणाल्या.
Ritu Tawde on Kishori Pednekar: किशोरी पेडणेकरांचा मोह सावरलेला नाही, आदित्य ठाकरे यांच्या बुद्धीची सुद्धा कीव येते
सध्या विरोधकांकडे कुठलेही मुद्दे राहिले नाही. किशोरी पेडणेकर यांचा मोह सावरलेला नाही. रात्रंदिवस त्यांना महापौर दिसतात. आदित्य ठाकरे यांनी सुद्धा ट्वीट केलं. त्यांनी अभ्यास करून स्टेटमेंट करायला हवं होतं. आदित्य ठाकरे यांच्या बुद्धीची सुद्धा कीव येते. यांनी जो 25 वर्ष घोटाळा केलाय तो बाजूला करण्याचं काम आम्ही करतोय. ते शोधताय महापौर बद्दल काय करायचे, असेही महापौर रितू तावडे म्हणाल्या.
Kishori Pednekar on Ritu Tawde आदित्य ठाकरे यांची बालबुद्धी दिसते, मग महापौर आता तुमची यात बालबुद्धी दिसतेय
टेंडर वाचलं तर त्यात हेरिटेज बंगलो लिहलं आहे. अधिकारी एवढ्या मोठ्या चुका कशा करू शकतात? महापौरांना कोण अडचणीत आणतंय? लिहिताना जर व्यवस्थित लिहिलं असतं तर महापौर संतापाल्या नसत्या. मी टेंडर मागे घेते असा त्या म्हणतायत, याचा अर्थ तुम्ही काहीतरी केलंय, असा याचा अर्थ होतो. तुम्ही गटनेत्यांची बैठक बोलवायला पाहिजे होती. लगेच तुम्ही आदित्य ठाकरे यांची बालबुद्धी दिसते. मग महापौर आता तुमची यात बालबुद्धी दिसते. असं म्हणत विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी रितू तावडेंवर हल्लाबोल केला आहे.
Kishori Pednekar: तुम्ही आता अधिकऱ्यांवर काय कारवाई करणार?
अडीच वर्षाची खुर्ची असते. तुम्ही आता अधिकऱ्यांवर काय कारवाई करणार? महापौर यांना अडचणीत आणण्यासाठी हे टेंडर होतं. गटनेते बैठक बोलवली असती, तर आम्ही महापौर यांच्या पाठीशी राहिलो असतो. आम्हाला स्वप्न पडत नाही. 5 वर्ष महापौर पदाचे स्वप्न आम्हाला पडणार नाही. टेंडर मागे घ्यायला लावते, असा म्हणतात म्हणजे आणखी महापौर त्यांच्या अडचणी वाढवतायत. असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.
इतर महत्वाच्या बातम्या
Before You Go
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?























