एक्स्प्लोर

Vijay Kadam : 'विच्छा माझी पुरी करा'ने घराघरात पोहोचले, रंगमंचावर 'खुमखुमी' दाखवली; अष्टपैलू विजय कदमांचा सोनेरी प्रवास

विजय कदम यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला थिएटरमधून सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम केले. 'विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्या', 'खुमखुमी' हे कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले.

Vijay Kadam : मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज (10 ऑगस्ट) पहाटे निधन झाले. विजय कदम 1980 आणि 90 च्या दशकात प्रचंड लोकप्रिय अभिनेते होते. त्यांच्या अष्टपैलू अभिनय क्षमतेसाठी ओळखला जात होते. त्यांनी गंभीर भूमिकांप्रमाणेच विनोदी भूमिकाही केल्या. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे. अभिनेते विजय कदम गेल्या दीड वर्षांपासून कर्करोगाने त्रस्त होते. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी त्यांची झुंज अपयशी ठरली.अभिनेते विजय कदम यांच्या पार्थिवावर आज रात्री उशिरा अंधेरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दु:खद बातमीनंतर मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

'विच्छा माझी पुरी करा'ने घराघरात पोहोचले

विजय कदम यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला थिएटरमधून सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी मराठी चित्रपटांमध्ये काम केले. 'विच्छा माझी पुरी करा हे लोकनाट्या', 'खुमखुमी' हे कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. 1986 पासून आतापर्यंत विजय कदम यांनी 750 हून जास्त प्रयोग केले. विजय कदम यांनी अनेक वर्षे त्यांच्या ‘विजयश्री’ या संस्थेकडून ‘खुमखुमी’हा एकपात्री प्रयोग केला. या दोन्ही कार्यक्रमांमध्ये विजय कदम घराघरात पोहोचले. 

अनेक मराठी चित्रपटात भूमिका

राजानं वाजवला बाजा, आनंदी आनंद, इरसाल कार्टी, लावू का लाथ, गोळाबेरीज, ऑन ड्युटी २४ तास, वासुदेव बळवंत फडके, रेवती, देखणी बायको नाम्याची, मेनका उर्वशी, कोकणस्थ आदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या. सही रे सही, टुरटूर, पप्पा सांगा कुणाचे ही देखील त्यांनी गाजलेली नाटके आहेत. विजय कदम यांनी 1980 च्या दशकात चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करून प्रेक्षकांची खूप प्रशंसा मिळवली. त्यांचे 'चश्में बहादूर', 'पोलिसलाइन', 'हळदे रुसली कुंकू हसलं' आणि 'आम्ही दोघं राजा राणी' हे चित्रपट खूप गाजले. विजय कदम विनोदी भूमिकांसाठी जितके लोकप्रिय होते तितकेच ते गंभीर भूमिकांसाठीही लोकप्रिय होते. त्यामुळेच त्यांना अष्टपैलू प्रतिभेचा अभिनेता असेही म्हटले जात असे. 

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

PM Modi In AKola : महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Jayant Patil on Ajit Pawar : पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
D. K. Shivakumar : महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; पीएम मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Avinash Jadhav on Sanjay Raut : बाळासाहेबांनी काँग्रेसबाबत काय सांगितलं ते राऊत विसरले ?Saroj Ahire NCP Nashik : शिवसेनेच्या उमेदवाराला थांबवलं जाईल अशी प्राथमिक माहिती -सरोज अहिरेCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :11 AM : 9 नोव्हेंबर 2024 :  ABP MajhaPoonam Mahajan on Uddhav Thackeray : ...म्हणून उद्धव ठाकरे माझ्यासाठी महत्त्वाचे : पूनम महाजन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi In AKola : महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
महाराष्ट्राला महाविकास आघाडीच्या घोटाळेबाजांचे एटीएम बनू देऊ नका! पीएम मोदींकडून काँग्रेस सर्वाधिक 'टार्गेट'
Radhakrishna Vikhe Patil : आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
आता बस्स झालं! माझा फोटो वापरू नका, शिंदे गटाच्या उमेदवाराला विखे पाटलांचा भर सभेत इशारा; नेमकं काय घडलं?
Jayant Patil on Ajit Pawar : पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
पृथ्वीवर असा पक्ष नसेल ज्या पक्षाच्या चिन्हाखाली लिहायला लागतंय आमचं चिन्ह 'न्याय प्रविष्ठ' आहे! जयंत पाटलांचा अजितदादांवर बोचरा वार
D. K. Shivakumar : महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; पीएम मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
महायुतीच्या नेत्यांना मी सर्व खर्च, गाड्या, स्पेशल चार्टड देतो, येऊन आमच्या योजना बघाव्यात; मोदींच्या टीकेवर काँग्रेसच्या संकटमोचकांचे ओपन चॅलेंज
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
ते ठाकरे असतील तर मी राऊत, संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर, आता मनसेने राऊतांना पुन्हा डिवचलं; म्हणाले, काँग्रेससोबत...
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Embed widget