शिवराय हे महाराष्ट्राची अस्मिता, पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी : वर्षा गायकवाड
Varsha Gaikwad : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवारी मुंबई दौऱ्यावर येणार असून त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार असल्याचं खासदार वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.
![शिवराय हे महाराष्ट्राची अस्मिता, पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी : वर्षा गायकवाड Varsha Gaikwad demanded pm Narendra Modi should apologize for the fall of Shivaji Maharaj statue rajkot fort sindhudurg maharashtra marathi news शिवराय हे महाराष्ट्राची अस्मिता, पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागावी : वर्षा गायकवाड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/08/29/da224b0bbcb9607b0c46cd6903a11e3e172493500306893_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शिवाजी महाराज हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत, त्यांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्यानेच राजकोटवरील पुतळा आठ महिन्यात कोसळल्याचा आरोप मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या पुतळ्याचं उद्घाटन झालं होतं, त्यामुळे आता पंतप्रधानांनीच माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली.
खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील भव्य पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळल्याच्या घटनेचे शिवप्रेमींमध्ये तीव्र संताप आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन झाले होते. पण भाजप युती सरकारला भ्रष्टाचाराची इतकी कीड लागली आहे की त्यांना महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार केला. महाराजांचा पुतळा कोसळल्याने महाराष्ट्राच्या अस्मितेला भाजप सरकारने कलंक लावला आहे. महाराजांचा पुतळा कोसळून जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर माफी मागावी.
नरेंद्र मोदींसमोर काँग्रेस आंदोलन करणार
यासंदर्भात बोलताना प्रा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, भारतीय जनता पक्ष सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करत असते. यावेळी त्यांनी कहरच केला आहे. कमीशनखोरीसाठी किमान आपले आराध्य दैवत महाराजांना तरी सोडायला हवे होते. पण भाजपाला त्याचे काही देणेघेणे नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता मुंबईत BKC येथे येत आहेत. यावेळी तिथेच महायुती सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात येईल.
ही बातमी वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)