एक्स्प्लोर

शिवरायांची एकदा नव्हे 100 वेळा माफी मागायला तयार; राजकारण करणं हे दुर्दैव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विरोधकांना राजकारण करण्यासाठी अनेक विषय आहेत. मात्र, शिवाजी महाराजांचा विषय हा राजकारणाचा विषय नसून आमच्यासाठी श्रद्धेचा विषय असल्याचा मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

CM Eknath Shinde on Shivaji Maharaj Statue : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा अवघ्या आठ महिन्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावर कोसळल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट पसरली आहे. शिवभक्तांमध्ये संतापाचा कडेलोट झाला असून सर्वत्र शिवरायांचा अपमान झाल्याची भावना व्यक्त होत आहे. झाललेी घटना अतिशय दुर्दैवी असल्याचे ते म्हणाले.  

या सर्व पार्श्वभूमीवर आज (29 ऑगस्ट) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. एकदा नव्हे, तर शंभरवेळा शिवरायांची माफी मागायला तयार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, की शिवरायांची एकदा नवे तर शंभरवेळा माफी मागायला तयार आहे. 

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, काल रात्री महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत सिंधुदुर्गमध्ये झालेल्या पुतळा दुर्घटनेबाबत चर्चा झाली. ही खरतर खूप वेदनादायी घटना आहे. नौदलाकडू महाराजांचा पुतळा बनवला आला होता. काल झालेल्या बैठकीला सरकारमधील मंत्री तसेच नेव्हीचे अधिकारी आणि पोलीस उपस्थित होते. बैठकीनंतर एका समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीमध्ये नेव्हीचे अधिकारी, तज्ज्ञ शिल्पकार आणि इतर विषयातील तज्ज्ञांचा समावेश करण्यात आला आहे. लवकरात लवकर ही समिती काम सुरू करेल असे त्यांनी यावेळी सांगितले. 

अजित पवारांनी माफी सुद्धा मागितली आहे

शिंदे पुढे म्हणाले की, तेथील वारे, वातावरण आणि एकूण परिस्थीचा आढावा घेऊन महाराजांचा नवीन मजबूत पुतळा उभा करण्यात येणार आहे. विरोधकांनी यावर राजकारण करणे योग्य नाही. कारण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या महाराजांच्या पायावर मी एकवेळा नाही, तर हजारवेळा नतमस्तक व्हायला तयार आहे. अजित पवारांनी माफी सुद्धा मागितली आहे. शिवाजी महाराज आमच्यासाठी राजकारणाचा विषय नाही. विरोधकांनी सुद्धा यावर राजकारण करू नये. नेव्हीने दुर्घटनास्थळाची पाहणी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
Gold Rate : सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Kolhapur News:  नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
कोल्हापूर : नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं; जळगावात भाजप अन् शिवसेनेत जुंपली, नेते आमने-सामने
भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं; जळगावात भाजप अन् शिवसेनेत जुंपली, नेते आमने-सामने
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Nana patole and Chandrashekhar Bawankule : नाना पटोले आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यात चांगलीच जुंपली
Nitesh Rane PC : Nilesh Rane यांचा बळीचा बकरा केला जातोय; नितेश राणेंनी केली भावाची पाठराखण
Raj Thackeray Nashik Tree cutting: दुसरीकडे झाडं लावायला पाचपट जागा असेल तर साधुग्राम तिकडेच करा
Top 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट 29 नोव्हेंबर 2025
Sayaji Shinde Nashik Tapovan Tree Cutting : एकही झाड तुटू देणार नाही, झाडं तोडल्यास माफी नाही

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
आज आपण जिवंत आहोत ते केवळ मोदींनी दिलेल्या लसीमुळे : भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण
Gold Rate : सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
सोन्याच्या दरात तेजी सुरु, सोनं 1360 रुपयांनी महागलं, 24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर जाणून घ्या
Kolhapur News:  नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
कोल्हापूर : नामवंत शाळेतील मास्तर महिलेसोबत रंगेहाथ सापडला; गावकऱ्यांनी पहिल्यांदा बेदम चोपला मग नग्न करून तब्बल तीन तास दोरीने बांधून घातला!
भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं; जळगावात भाजप अन् शिवसेनेत जुंपली, नेते आमने-सामने
भाजपचा एखादा नगरसेवक निवडून आला तर खूप झालं; जळगावात भाजप अन् शिवसेनेत जुंपली, नेते आमने-सामने
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
पैसे दिले तर काजू, किसमिस म्हणून खाऊन घ्यायचे,धनुष्यबाणाचे बटन दाबायचे; आमदार सत्तारांचे मतदारांना आवाहन
Devendra Fadnavis : मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
मी कोणावरही टीका करत नाही, आमच्याकडे नीती, नियती आहे अन् निधी देखील आहे; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य; राज्याच्या तिजोरीबाबत पुनर्उच्चार?
Accident: भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
भरधाव डंपर खडीसकट कारवर कोसळला; 4 वर्षाच्या चिमुरड्यासह एकाच कुटुंबातील 7 जणांचा अंत, काकाच्या अत्यसंस्काराला जाताना अवघं कुटुंब क्षणात उद्ध्वस्त
Kolhapur News: मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
मुरगुडला राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या दारात दोन पत्रावळीत लिंबू, नारळ, हळद टाकत भानामती!
Embed widget