एक्स्प्लोर

Vanchit Bahujan Aghadi : सत्ताधारी पक्षाकडून उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न; वंचितच्या मुख्य प्रवक्त्यांचा खळबळजनक आरोप

Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीच्या (Vanchit Bahujan Aghadi) उमेदवारांना आपली उमेदवारी मागे घेण्याबाबत सत्ताधाऱ्यांनी मजबूर केल्याचा गंभीर आरोप वंचितकडून करण्यात आला आहे.

Vanchit Bahujan Aghadi मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) जळगावचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. त्यापाठोपाठ सोलापूरचे उमेदवार राहुल गायकवाड यांनीही आता उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. असे करण्यास या उमेदवारांना सत्ताधाऱ्यांनी मजबूर केल्याचा गंभीर आरोप वंचितकडून करण्यात आला आहे. सत्ताधारी पक्षांनी धमकावल्यानेच वंचितच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याचा खळबळजनक आरोप वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते आणि राज्य उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे यांनी व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे.

सत्ताधाऱ्यांकडून वंचितच्या उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न 

वंचित बहुजन आघाडीच्यावतीने महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघामध्ये उमेदवार उतरवण्यात येत आहेत. मात्र, आमच्या असे लक्षात आले आहे की, त्या उमेदवारांना सत्ताधारी पक्षांकडून धमकावण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मोकळे म्हणाले की, जळगाव येथे प्रफुल्ल लोढा यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, सत्ताधारी पक्षातील नेत्यांना ते रूचलेले दिसत नाही. हा जैन समाजाचा व्यक्ती, वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर आमच्या मतदारसंघात कसा काय उभा राहतो? असा सवाल उपस्थित करत त्या उमेदवाराला त्रास देण्याचा प्रयत्न झाला, तसेच त्याला धमकावण्यात आले. त्यांच्या कुटुंबांला धमकावण्यात आले. त्याचे व्यवहार रोखण्याचेही प्रयत्न झाले आणि दबाव टाकून त्या उमेदवाराला उमेदवारी मागे घ्यायला लावली असल्याचा आरोपही सिद्धार्थ मोकळे यांनी बोलतांना केला आहे.

काही उमेदवारांनी पक्षाशी संपर्क साधला आणि घडलेला घटनाक्रम सांगितला. काही गोष्टी आमच्या हातातल्या होत्या, त्या आम्ही रोखू शकत होतो. मात्र, काही गोष्टी आमच्या हातात नव्हत्या, त्यामुळे कुटुंबांना नाहक त्रास नको हा विचार करून त्यांनी उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्याला पक्षाने संमती दिली आणि त्या ठिकाणी दुसरा उमेदवार आम्ही उतरवला असल्याचेही  सिद्धार्थ मोकळे यांनी सांगितले. 

आरएसएस, भाजपची सत्ता उलथवून टाकू 

सोलापूर येथे सुद्धा आमच्या उमेदवाराने पक्षाशी संपर्क न साधता थेट उमेदवारी अर्ज मागे घेतला. तिथली माहिती काढल्यावर आमच्या लक्षात आले की, तिथे सुद्धा सत्ताधारी पक्षाने आमच्या उमेदवाराला धमकावले आहे. त्या दबावाला बळी पडून उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याचे मोकळे यांनी म्हटले आहे. अशा पद्धतीने आमच्या उमेदवाराला धमकावून, अर्ज मागे घ्यायला लावून गलिच्छ राजकारण जर इथला सत्ताधारी पक्ष करत असेल, तर त्याचा आम्ही तीव्र निषेध व्यक्त करतो. तसेच त्यांना सांगू इच्छितो की, वंचित बहुजन आघाडी हा लढाऊ बाण्याचा पक्ष आहे. प्रामाणिकपणे जनतेचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष आहे. अशा कितीही धमक्या दिल्या, धमकावून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा वंचित बहुजन आघाडी थांबणार नाही. इथली आरएसएस - भाजपची सत्ता उलथवून टाकल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराही मोकळे यांनी दिला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 31 January 2024 दुपारी १ च्या हेडलाईन्सNarhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरणUday Samant : मराठी भाषेला त्रास देणाऱ्यांना... उदय सामंतांचं भाषण Pune Vishwa Marathi SammelanGunaratna Sadavarte On Suresh Dhas भाजप नेत्यांनी सुरेश धसांना समज द्यावा, त्यांच्यावर हक्कभंग आणावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
आताची पिढी पूर्णपणे बुद्धू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य; म्हणाले... 
Devendra Fadnavis : मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
मी पुन्हा येईन, माझा पिच्छाच सोडत नाही, एखादा शब्द आपल्याला चिपकतो; विश्व मराठी संमेलनात फडणवीसांची तुफान फटकेबाजी!
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
नामदेव शास्त्रींबद्दल पंकजांनी काय म्हटलं होतं; बजरंग सोनवणेंनी करुन दिली आठवण, दिल्लीतून स्पष्टच बोलले
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Dhananjay Munde: भगवानगड आणि नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, नव्या आत्मविश्वासाने काम करेन: धनंजय मुंडे
माझ्या पाठिशी भगवानगड आणि न्यायाचार्यांची ताकद उभी राहिलेय, माझा आत्मविश्वास वाढलाय: धनंजय मुंडे
Accident : भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
Embed widget