Corona Vaccination | येत्या 16 जानेवारीला राज्यात 511 जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण : राजेश टोपे
लसीकरांसाठी सर्व खाजगी आणि शासकीय रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सेसला सकरात्मक सहयोय करण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे.
जालना : येत्या 16 तारखेला राज्यात 511 जिल्हा उपजिल्हा रुग्णालयात लसीकरणं होणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यासाठी सुरुवातीलाच 50 हजार 11 हेल्थ वर्कर्सना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. या लसीकरांसाठी सर्व खाजगी आणि शासकीय रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सेसला सकरात्मक सहयोय करण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले आहे. दरम्यान या लसीकरांसाठी महाराष्ट्र सज्ज असल्याचा पुनरुच्चर यावेळी त्यांनी केला.
दरम्यान बर्ड फ्ल्यूचे माणसाला होण्याचे प्रमाण कमी असून पण ते झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होतात. परिणामी यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाच्या समन्वयाने सतर्कता बाळगण्याच्या सूचना केल्या असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान जगात बर्ड फ्ल्यूचा मानवी आरोग्यास धोका निर्माण होण्याचे प्रमाण कमी असले तरी ते गंभीर असू शकतात. शिवाय त्याची बरीच लक्षणे कोविड सारखी आहेत. त्यामुळे या बाबत काळजी घेणे गरजेचे असल्याने देखील त्यांनी म्हटलंय.
सर्वप्रथम तीन कोटी लोकांना लस देणार
कोरोना लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू होणार असेल तरीही सामान्य लोकांना यासाठी वाट पाहावी लागणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार पहिल्या टप्प्यात तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाईल. त्यांच्यानंतर ही लस 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना दिली जाईल. देशात लसीकरण सुरू होण्यापूर्वी सरकारने ड्राय रन म्हणजेच देशभरात दोनदा लसीकरणाचा सराव घेण्यात आला.
देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, सोमवार 11 जानेवारीला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. यामध्ये कोरोनाच्या लसीकरण कार्यक्रमाच्या नियोजनावर चर्चा होणार असल्याची माहिती आहे. ही बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आयोजित करण्यात आली आहे. देशात भारत बायोटेकची Covaxin आणि ऑक्सफोर्ड अॅस्ट्राजेनेकाची Covishield या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे.
संबंधित बातम्या
ब्रिटनकडून आणखी एका कोरोना लसीला मंजूरी, 70 लाख डोसची मागणी
Corona Vaccination | पहिल्या टप्प्यात 'या' तीन कोटी लोकांना कोरोना लस दिली जाणार, तपशील जाणून घ्या