एक्स्प्लोर

Corona Vaccination | पहिल्या टप्प्यात 'या' तीन कोटी लोकांना कोरोना लस दिली जाणार, तपशील जाणून घ्या

देशभरात 16 जानेवारीपासून लसीकरणास सुरुवात होणार असली तरी सामान्य लोकांना कोरोना लसीसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार पहिले तीन कोटी डोस आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्या कामगारांना दिले जाणार आहे.

नवी दिल्ली : देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण सुरू होणार असल्याचा घोषणा केंद्र सरकारने केली आहे. लसीकरणासाठी राज्य व केंद्रशासित प्रदेशांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी आज उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान केले. यात कॅबिनेट सचिव व आरोग्य सचिवांखेरीज इतर अधिकारी सहभागी झाले होते. त्यानंतर लसीकरणाची प्रस्तावना जाहीर केली.

सर्वप्रथम तीन कोटी लोकांना लस देणार कोरोना लसीकरण 16 जानेवारीपासून सुरू होणार असेल तरीही सामान्य लोकांना यासाठी वाट पाहावी लागणार आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार पहिल्या टप्प्यात तीन कोटी आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवर काम करणाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाईल. त्यांच्यानंतर ही लस 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि 50 वर्षांपेक्षा कमी वयाच्या इतर आजारांनी ग्रस्त असलेल्यांना दिली जाईल.

देशात लसीकरण सुरू होण्यापूर्वी सरकारने ड्राय रन म्हणजेच देशभरात दोनदा लसीकरणाचा सराव घेण्यात आला. शुक्रवारीही दुसर्‍या वेळी उत्तर प्रदेश वगळता देशातील प्रत्येक जिल्ह्यात ड्राय रन झाली.

CoronaVaccine Update: येत्या 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात

पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 जानेवारी रोजी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत, परंतु त्याआधी लसीकरणाची तारीख जाहीर झाली आहे. या व्यतिरिक्त, लोकांमध्ये लसीसंबंधीची भीती दूर करण्यासाठी सत्ताधारी भाजप मोठ्या प्रमाणात मोहीम राबवित आहे.

दोन लसींना आपात्कालीन स्थितीत वापरण्यास परवानगी

इंडिया बायोटेकची कोवॅक्सीन आणि ऑक्सफोर्ड अ‍ॅस्ट्रॅजेनेकाची कोविशिल्ड लसीला 3 जानेवारीला आपत्कालीन वापरासाठी मंजूर झाली आहे. कोविशील्डची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने केली आहे.

कोविड लस नोंदणीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक

कोरोना लसीसाठी नाव नोंदणीसाठी फोटोसाठी आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, डायव्हिंग लायसन्स, पॅनकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, सेवा ओळखपत्र (फोटोसह) केंद्र/राज्य सरकारद्वारे जारी केलेले पासपोर्ट, आरजीआयने जारी केलेले स्मार्ट कार्ड, टपाल कार्यालय/बँकेने दिलेला पासबुक फोटो आणि कामगार मंत्रालयाच्या आरोग्य विमा स्मार्ट कार्डसह पेन्शन दस्तऐवज आवश्यक असेल. यापैकी कोणतीही कागदपत्रे असल्यास आपण कोरोना लसीकरणासाठी नोंदणी करण्यास सक्षम असाल. यासह 1075 वर टोल फ्री हेल्पलाईन क्रमांकही देण्यात आला आहे.

#BREAKING | 16 जानेवारीपासून भारतात लसीकरणाचा कार्यक्रम सुरू होणार | ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CNG Bike Launch : बजाज फ्रिडम 125 लवकरच बाजारात, सीएनजीची बाईकचा लूक पाहिलात का?ABP Majha Headlines : 11 PM : 05 Jully : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सAnant Ambani& Radhika Merchant wedding | अनंत-राधिका मर्चेंटच्या संगीत सोहळ्याला दिग्गजांची उपस्थितीZERO HOUR With Sarita Kaushik | लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी-विरोधक आमने-सामने ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Disha Patani : दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
दिशा पटानीचा सिझलिंग ग्लॅम लूक, कल्कि 2898 एडीच्या रॉक्सीचा घायाळ करणारा अंदाज
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
काँग्रेसचा आमदार व्हायचंय?, 20 हजार रुपयांसह अर्ज करा, मागासवर्गीयांना सवलत; परिपत्रक व्हायरल
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
सूर्यासाठी अमिताभचा डायलॉग, सभागृहात टाळ्या; मुख्यमंत्र्‍यांची चौफेर फटकेबाजी
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
कुटुंबातील 2 महिलांना मिळणार लाडकी बहीण योजनेचा लाभ; कागदपत्रांची पूर्तता, असा करा अर्ज
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
जगातील पहिल्या CNG बाईकचे 3 मॉडेल, 3 प्रकारच्या किंमती; महाराष्ट्रात आजपासूनच सुरू झाली विक्री
Britain Election Result :  ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, 1997 नंतर चारशे जागांचा टप्पा ओलांडला
ब्रिटनमध्ये अबकी बार 400 पार, लेबर पार्टीनं करुन दाखवलं, ऋषी सुनक सत्तेबाहेर, 14 वर्षानंतर सत्तांतर
Devenrdra Fadnavis : कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
कॅप्टन एकनाथ शिंदे, उपकर्णधार अजित पवार, विश्वविजेत्यांच्या सत्कार सोहळ्यात फडणवीसांची जोरदार फटकेबाजी
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
''सूर्याचा कॅच अन् आम्ही 2 वर्षांपूर्वी काढलेली विकेट''; मुख्यमंत्र्‍यांची धुव्वादार बॅटिंग, टीम इंडियाला 11 कोटीचं बक्षीस
Embed widget