एक्स्प्लोर

आधी शहरात लसीकरण करा मगच आषाढी वारी भरवा; पंढरपूर मधील नागरिकांची मागणी

आधी पंढरपूर शहरात लसीकरण करा मगच आषाढी वारी भरवा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.मागील सात दिवसापासून नागरिकांना लसी नाहीत. मात्र, पालखी प्रस्थानाला जाणाऱ्या महाराजांचे लसीकरण सुरु.

पंढरपूर : वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव अशी ओळख असलेल्या आषाढी वारीवर यंदाही कोरोनाचे संकट असल्याने सरकारने 10 मानाच्या पालखी सोहळ्यांना पंढरपूरला येण्याची परवानगी दिली आहे. मात्र, आषाढी वारी भरण्यापूर्वी पंढरपूर मधील नागरिकांचे लसीकरण करून घ्या आणि मगच वारी भरवा अशी मागणी नागरीकांतून होत आहे.

यंदा या दहा मानाच्या पालखी सोहळ्यासोबत प्रत्येकी 40 अशा 4 हजार वारकऱ्यांना परवानगी दिली गेली आहे. यांच्या सुरक्षेसह इतर व्यवस्थापनासाठी किमान अडीच ते 3 हजार पोलीस व इतर विभागाचे अधिकारी अधिकृतपणे पंढरपूरमध्ये येणार आहेत. याशिवाय आषाढी वारीसाठी घुसखोरी करून प्रवेश मिळवणाऱ्या भाविकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असणार आहे. 
      
यामुळे अजूनही कोरोनाचा धोका कायम असलेल्या पंढरपूर शहरातील लसीकरणाची अवस्था मात्र दयनीय आहे. सव्वा लाखाच्या शहरात केवळ 18 ते 19 हजार नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एवढ्या मोठ्या शहरात आठवड्याला केवळ दीडशे ते दोनशे एवढाच लसींचा साठा मिळत असल्याने लसीकरण व्यवस्थेचा पुरता फज्जा उडाला आहे. यातही गेल्या 23 जूननंतर पंढरपुरात लस आली नसल्याने शेकडो नागरिक लसींची वाट पाहत लसीकरण केंद्रावर हेलपाटे मारत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीनंतर पंढरपूर शहराची अवस्था गंभीर बनली होती. अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत असल्याने नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती कायम आहे. 

अशावेळी पुन्हा आषाढी वारीला वारकरी येणार असल्याने आधी लसीकरण करा आणि मगच वारी भरावा अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. आम्ही विकत लस घेण्यास तयार आहोत, शहरात 14 केंद्रांना परवानगी दिली तर त्यांना लसी पुरवल्यास आम्ही पैसे देऊन लसीकरण करून घेऊ अशी भूमिका शहरातील व्यापारी घेत आहेत. शहरातील नागरिकांचे  लसीकरण गेल्या 7 दिवसापासून बंद असताना आज मात्र पालखी प्रस्थानासाठी परवानगी दिलेल्या वारकरी महाराजांची तपासणी करून लसीकरण करण्यात आले आहे. आता शासनाला वारी भरवायची असेल तर रोज किमान एक हजार लसी शहरातील नागरिकांना देऊन लसीकरणाला यात्रेपूर्वी वेग आणावा अशी मागणी नगराध्यक्षा साधना भोसले यांनी केली आहे. अन्यथा जो फटका निवडणुकीचा बसला तशीच मनुष्यहानी आषाढीनंतर होऊ नये हीच अपेक्षा पंढरपूरचे नागरिक करीत आहेत.

किमान बसने जाणाऱ्या पालख्यांची संख्या तरी वाढवावी..

सरकार जे काही निर्देश देईल त्या सगळ्याचं पालन करायला वारकरी तयार आहेत. वारकरी हा शिस्तबद्धच असतो तो कधी धुडगुस घालत नाही. निवडणुकीसारखे अनेक राजकीय कार्यक्रम होतात मग वारीला अटकाव का? असा प्रश्ना आषाढी वारीसाठी पायी पालख्यांना परवानगी द्यावी याबाबत याचिका दाखल करणाऱ्या वकिलांनी उपस्थित केला आहे. अडीचशे नोंदणीकृत पालख्या असताना केवळ मानाच्या दहा पालख्या का निवडल्या. सर्वांच्या प्रतिनिधित्वाचा विचार का केला नाही. पहिली मागणी आमची पायी वारीला परवानगीची आहे, ती मान्य झाली नाही तर किमान बसने जाणाऱ्या पालख्यांची संख्या तरी वाढवावी ही विनंती कोर्टाकडे करू, असे ते म्हणाले. पुढच्या दोन-तीन दिवसात ही याचिका सुनावणीस येईल अशी आशा आहे, असे ते म्हणाले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Phaltan Doctor Death: 'ती खूप पॅनिक दिसत होती, गाडीही आत...'; फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
'ती खूप पॅनिक दिसत होती, गाडीही आत...'; फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
Panvel Crime: पनवेल हादरलं! ऑफिसमधील महिलेला घरी बोलवले, पत्नीच्या मदतीने  गुंगीचं औषध देत लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ बनवत लाखोंचा गंडा
पनवेल हादरले! ऑफिसमधील महिलेला घरी बोलवले, पत्नीच्या मदतीने गुंगीचं औषध देत लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ बनवत लाखोंचा गंडा
सोन्याची पुन्हा एक गटांगळी! 24 तासांत सोन्याचा भाव 4 हजारांनी घसरला, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?
सोन्याची पुन्हा एक गटांगळी! 24 तासांत सोन्याचा भाव 4 हजारांनी घसरला, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?
Bacchu Kadu & Girish mahajan : बावनकुळेंनी 8-10 फोन लावले पण बच्चू कडूंनी दाद दिली नाही, अखेर भाजपचा संकटमोचक धावून आला, फोनवर महत्त्वाची चर्चा
बावनकुळेंनी 8-10 फोन लावले पण बच्चू कडूंनी दाद दिली नाही, अखेर भाजपचा संकटमोचक धावून आला, फोनवर महत्त्वाची चर्चा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bacchu Kadu Farmer Protest : कार्यकर्ते अडवले, बच्चू कडू संतापले; सरकारला थेट इशारा
Nana Patole On Farmers Issue : सरकार फक्त आकडे जाहीर करतंय,कोणतीही मदत करत नाहीय
Gold Price Drop: 'सोन्याचे भाव कोसळले, ग्राहकांना मोठा दिलासा
Devendra Fadnavis On Bacchu Kadu Protest : आंदोलन करुन प्रश्न सोडवता येत नाहीत : देवेंद्र फडणवीस
Khadse Robbery: 'त्या' सीडी आणि पेनड्राईव्हमध्ये काय होतं? Eknath Khadse यांच्या घरातून चोरी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Phaltan Doctor Death: 'ती खूप पॅनिक दिसत होती, गाडीही आत...'; फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
'ती खूप पॅनिक दिसत होती, गाडीही आत...'; फलटणच्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर तरुणीसोबत नेमकं काय घडलं?
Panvel Crime: पनवेल हादरलं! ऑफिसमधील महिलेला घरी बोलवले, पत्नीच्या मदतीने  गुंगीचं औषध देत लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ बनवत लाखोंचा गंडा
पनवेल हादरले! ऑफिसमधील महिलेला घरी बोलवले, पत्नीच्या मदतीने गुंगीचं औषध देत लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ बनवत लाखोंचा गंडा
सोन्याची पुन्हा एक गटांगळी! 24 तासांत सोन्याचा भाव 4 हजारांनी घसरला, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?
सोन्याची पुन्हा एक गटांगळी! 24 तासांत सोन्याचा भाव 4 हजारांनी घसरला, 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?
Bacchu Kadu & Girish mahajan : बावनकुळेंनी 8-10 फोन लावले पण बच्चू कडूंनी दाद दिली नाही, अखेर भाजपचा संकटमोचक धावून आला, फोनवर महत्त्वाची चर्चा
बावनकुळेंनी 8-10 फोन लावले पण बच्चू कडूंनी दाद दिली नाही, अखेर भाजपचा संकटमोचक धावून आला, फोनवर महत्त्वाची चर्चा
Phaltan Doctor Death: फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांशी राहुल गांधींचा फोनवरून संवाद, आई - वडील म्हणाले ....
फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या कुटुंबीयांशी राहुल गांधींचा फोनवरून संवाद, आई - वडील म्हणाले ....
Bacchu Kadu & Chandrashekhar Bawankule: सरकारकडून चर्चेचे दरवाजे उघडेच, पण बच्चू कडू बैठकीला येतच नाहीत: चंद्रशेखर बावनकुळे
सरकारकडून चर्चेचे दरवाजे उघडेच, पण बच्चू कडू बैठकीला येतच नाहीत: चंद्रशेखर बावनकुळे
Eknath Khadse Robbery: आता सीडी लावतो म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरातून 'ती' सीडी अन् पेनड्राईव्ह गायब; नाथाभाऊंच्या दाव्यानं एकच खळबळ
आता सीडी लावतो म्हणणाऱ्या एकनाथ खडसेंच्या घरातून 'ती' सीडी अन् पेनड्राईव्ह गायब; नाथाभाऊंच्या दाव्यानं एकच खळबळ
Pune Accident: भरधाव वेगात आला अन् वाहनांना उडवत गेला, पुण्यातील नवले पुलाखाली भीषण ट्रक अपघात, व्हिडिओही आला समोर
भरधाव वेगात आला अन् वाहनांना उडवत गेला, पुण्यातील नवले पुलाखाली भीषण ट्रक अपघात, व्हिडिओही आला समोर
Embed widget