एक्स्प्लोर

UPSC मध्ये महाराष्ट्राचे घवघवीत यश! 100  हून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल शुक्रवारी जाहीर झाला असून त्यामध्ये महाराष्ट्रातील 100 हून अधिक उमेदवार यशस्वी झाल्याचं दिसून येतंय.

नवी दिल्‍ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा (UPSC) निकाल शुक्रवारी जाहीर झाला. बिहारच्या शुभम कुमारने देशात पहिला येण्याचा मान मिळवला. या परीक्षेत महाराष्ट्रानेही आपली यशस्वी कामगिरी कायम ठेवली असून एकूण 761 उमेदवारांपैकी राज्यातील 100 हून अधिक उमदेवारांनी यश संपादन केले आहे. राज्यातून मृणाली जोशी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे तर विनायक नरवाडे हा दूसऱ्या क्रमांकावर आहे. यूपीएससीतील गुणवत्ता यादीत या दोघांनी अनुक्रमे 36 आणि 37 वा क्रमांक पटकावला आहे.
             
केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या 2020 सालच्या परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. या निकालात  पहिल्या 100 उमेदवारांमधे महाराष्ट्रातील 5 उमेदवारांचा समावेश आहे.  यामध्ये मृणाली जोशी (36), विनायक कारभारी नरवाडे (37), रजत रविंद्र उभयकर(49), जयंत नाहाटा (56), विनायक महामुनी (95) यांचा समावेश आहे. 

राज्यातील इतर यशस्वी विद्यार्थी
लक्ष्य कुमार चौधरी (132), शुभम कुमार खंडेलवाल (133), रीचा कुलकर्णी (134), कमलकीशोर देशभुष खंडारकर (137), अवध सोमनाथ निवृत्त (166), अभ‍िषेक खंडेलवाल (167), गौरव रविंद्र सांळुके, पार्थ कश्यप (174), प्रतिक अशोक धुमाळ (183), आशिष गंगवार(188), रीना प्रधान (194), नितीशा संजय जगताप (199), संचित गंगवार (222), तुषार उत्तम देसाई (224), प्रथमेश अरविंद राजेशिर्के (237), साहील खरे (243), संकेत बलवंत वाघे (266), मयुर खंडेलवाल (284) प्रवीण दराडे  (312) , आकाश चौधरी (322), आनंद पाटील (325), सचिन चौबे (334), श्रीकांत विसपुते (335), साहिल संगवान (336), दिव्या गुंडे (338), सुहास गाडे (350), सागर मिसाळ (353), सुरज गुंजाळ (554), अनिल म्हस्के (361), अर्पिता ठुबे (383), सागर वाडी (385), आदित्य जिवने (399), अमोल मुरकुट (402) गोगणा गावित (422), अनिकेत फडतरे (426), श्रीराज वाणी (430), राकेश आकोलकर (432), वैभव बांगर (442), शुभम जाधव (445), अमर राऊत (449), शुभम नागरगोजे (453), ओंकार पवार (455),  अभिषेक दुधाळ (469), प्रणव ठाकरे (476),  श्रीकांत मोडक (499), यशवंत मुंडे (502), अनुजा मुसळे (511), बानकेश पवार (516), अनिकेत कुलकर्णी (517), अश्विन राठोड (520), अर्जित महाजन (521), शुभम स्वामी (523), श्रीकांत कुलकर्णी (525), शरण कांबळे (542), स्नेहल ढोके (564), सचिन लांडे (566), स्वप्निल चौधरी (572), अभिषेक गोस्वामी (574), अनिल कोटे (584), विकास पालवे (587), विशाल सारस्वत (592), मोहम्मद शाहिद खान (597) हर्षल घोगरे (614), अजिंक्य विद्यागर (617), निलेश गायकवाड (629), हेताळ पगारे (630), रविराज वडक (633), कुणाल श्रोते (640), सायली गायकवाड (641), सुलेखा जगरवार (646)  ,सुबोध मानकर (648)  ,शिवहार मोरे (649)   ,सुब्रह्मण्य केळकर (653) , सुमितकुमार धोत्रे (660), किरण चव्हाण (680), सुदर्शन सोनवणे (691), विनीत बनसोड (692), श्लोक वाईकर (699), अजय डोके (705), देवव्रत मेश्राम (713), स्वप्निल निसर्गन (714), शुभम भैसारे (727), पियुष मडके (732), शितल भगत (743), स्वरूप दीक्षित (749). 


केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी 2020 मध्ये परीक्षा घेण्यात आली. कोरोनाच्या प्रार्दूभावामुळे मुलाखती घेण्यास यावर्षी उशीरा झाला. लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यावर्षीच्या फेब्रुवारी ते जुलै या महिन्यात मुलाखत घेण्यात आली. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण 761 उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून 263,आर्थिक मागास प्रवर्गातून (ईडब्ल्यूएस) 86, इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) 229, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) 122, अनुसूचित जमाती प्रवर्गातून 61 उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांमध्ये 25 शारीरिकरित्या दिव्यांग उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने 150 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये  सामान्य गट 75, आर्थिक मागास प्रवर्ग (ईडब्ल्यूएस) 14,  इतर मागास वर्ग 55, अनुसूचित जाती 05, अनुसूचित जमाती  ०1  उमेदवारांचा समावेश आहे.  

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू 
भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण -180 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – 72, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  18 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –49, अनुसूचित जाती (एस.सी.) – २8, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 13 जागा रिक्त आहेत. गुणाणूक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – 36 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – 15, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 03,  इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – 10, अनुसूचित जाती (एस.सी.) – 05, अनुसूचित जमाती (एस.टी.) – 03 जागा रिक्त आहेत. 

भारतीय पोलीस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – 200 जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) – 80,  उमेदवार आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 20,  इतर मागास प्रवर्गातून - 55, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 30, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 15  उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे. 

केंद्रीय सेवा गट अ - या सेवेमध्ये एकूण - 302 जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - 118 उमेदवार, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस)  34, इतर मागास प्रवर्गातून - 84, अनुसूचित जाती प्रवर्गातून - 43 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून –23 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

केंद्रीय सेवा गट ब - या सेवेमध्ये एकूण – 118  जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) -53, आर्थिक मागास प्रवर्ग(ईडब्ल्यूएस) 11  उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून - 31, अनुसूचित जाती प्रवर्गातून – 16  तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – 07 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल. 
 
151 उमेदवारांची निवड तात्पुरती  आहे.
अधिकृत निकाल व यशस्वी उमदेवारांची नांवे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या www.upsc.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहेत. 

 

महत्वाच्या बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 

व्हिडीओ

Shinde vs Nashik Navi Mumbai :जुनं वॉर,आरोपांना धार;MMRमध्ये दोन राजकीय वाघांची झुंज Special Report
Eknath Shinde Devendra Fadnavis : शिंदेंसोबतची युती, फडणवीसांची सायकोलॉजी Special Report
Ajit Pawar Sharad Pawar NCP : 'आधी लगीन कोंढाण्याचं'मग तोरण एकीचं? Special Report
BJP Vs Shivsena : मुंबईचा कोण सिंकदर? BMC कोणाचा भगवा झेंडा फडकणार? Special Report
Ajit Pawar VS Murlidhar Mohol : पिंपरी-चिंचवड जिंकण्यासाठी दोन पैलवान रिंगणात Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dagdu Sakpal : मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मुलीला उमेदवारी नाही, पक्षाला आपली गरज संपली; ठाकरेंचा माजी आमदार नाराज, शिंदेंनी मध्यरात्रीच भेट घेतली
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मोठी बातमी ! नवी मुंबईतील प्रभाग 17 मधील निवडणुकीला हायकोर्टाकडून अंतरिम स्थगिती; भाजप उमेदवाराला दिलासा
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
मुंबईत कुर्ला स्टेशनदरम्यान लोकल ट्रेनला भीषण आग, डब्बा जळून खाक; CSMT कडे जाणारी वाहतूक विस्कळीत
Share Market Crash : सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
सेन्सेक्स निफ्टीत घसरण, गुंतवणूकदारांचे एका दिवसात  8 लाख कोटी स्वाहा, घसरणीचं कारण जाणून घ्या 
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
मोठी बातमी ! मुंबईसह 29 ठिकाणी 15 जानेवारीला सुट्टी जाहीर; शासनाची अधिसूचना जारी
ABP Majha Top 10 Headlines :  ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 जानेवारी 2026 | गुरुवार 
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले, ठाकरेंची सत्ता आल्यास त्यांच्या बायका भांडत बसतील; प्रकाश महाजनांची जहरी टीका
Sangli Municipal Corporation Election: सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
सांगलीत ऐन निवडणुकीत पोलिसांचा मोठा दणका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासह 8 जण हद्दपार
Embed widget