(Source: ECI/ABP News/ABP Majha)
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण, संपर्कात आलेल्यांना कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण झाली आहे. दानवे यांनी ट्वीट करत आपला अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली आहे.
जालना : देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असतानाच, यामध्ये राजकीय नेतेसुद्धा बाधीत होताना दिसत आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. दानवे यांनी ट्वीट करत आपला अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याची माहिती दिली आहे. दरम्यान, डॉक्टरांच्या सल्ल्याने आपण आयसोलेशनमध्ये असून, आपल्या संपर्कातील आलेल्यांना कोरोना टेस्ट करण्याचे आवाहन दानवे यांनी केले आहे.
कोरोनाची लक्षणे जाणवत असल्यामुळे टेस्ट केली असता रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याची माहिती मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे. दरम्यान, आज भाजपचे आमदार आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी देखील संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना टेस्ट करुन घेण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाची लागण झालेले राजकीय नेते
माजी मंत्री पंकजा मुंडे
मंत्री एकनाथ शिंदे
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
आदिवासी मंत्री के. सी. पाडवी
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
खासदार सुप्रिया सुळे
आमदार सागर मेघे
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
आमदार शेखर निकम
आमदार इंद्रनील नाईक
आमदार चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर)
आमदार माधुरी मिसाळ
माजी मंत्री दिपक सावंत
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील
आमदार रोहित पवार
आमदार धीरज देशमुख
हजारोंची गर्दी असलेल्या विवाहसोहळ्यांसह अनेक राजकीय कार्यक्रमांना सार्वजनिक ठिकाणी ही नेतेमंडळी हजेरी लावत असल्याचे दिसत आहे. आता या नेत्यांनाच कोरोनाची लागन झाली आहे. आता या नेतेमंडळींना कोरोना झाल्यामुळं त्यांना भेटलेले दुसरे नेते आणि सेल्फीसाठी धडपडत जवळ येणाऱ्या कार्यकर्त्यांना मात्र धडकी भरली आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. शुक्रवारी राज्यात तब्बल 40 हजार 925 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14, 256 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात शुक्रवारी एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही. आतापर्यंत 876 ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी 435 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. शुक्रवारी मुंबईत 20 हजार 971 रुग्णांची नोंद झाली. मागील काही दिवसांपासून हजारांच्या तुलनेत वाढणारी रुग्णसंख्या शुक्रवारी फक्त 790 ने वाढली होती. त्यामुळे बाधितांच्या संख्या वाढ स्थिरावल्याचे समोर आलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या: