आनंदाची बातमी... उजनी धरण 100 टक्के भरलं, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण
पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे 100 टक्के भरले आहे. उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
![आनंदाची बातमी... उजनी धरण 100 टक्के भरलं, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण Ujani dam water level will fill 100 percent today, satisfaction farmers solapur pune आनंदाची बातमी... उजनी धरण 100 टक्के भरलं, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/10/03085408/Ujani_Dam_2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पंढरपूर : पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेले उजनी धरण हे 100 टक्के भरले आहे. सलग तिसऱ्या वर्षी धरण 100 टक्के भरले आहे. यामुळं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्राच्या प्रमुख धरणांपैकी महत्त्वाचे असणारे उजनी धरण सलग तिसऱ्या वर्षी शंभर टक्के भरले आहे. पुणे, सोलापूर, अहमदनगर आणि मराठवाड्याला वरदान ठरलेल्या उजनी धरणात आज 117 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. 27 ऑगस्ट 2018 ला, यानंतर 7 ऑगस्ट 2019 ला व आज 31 ऑगस्ट 2020 ला उजनी धरण शंभर टक्के भरले आहे.
सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासह मराठवाड्यास वरदायिनी असलेले उजनी धरण मायनसमध्ये गेले होते. आता ते 100 टक्के भरलं असल्याने शेतकरी वर्ग खुश झाला आहे. उजनीवर अवलंबून असणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. पुणे जिल्ह्यात व भीमा खोऱ्यात झालेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत जोरदार वाढ झाली आहे.
सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यासह मराठवाड्यास कृषी विकासाला हातभार लागलेल्या उजनी धरणाच्या पाणी साठ्याकडे नेहमीच शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. या उन्हाळ्यात उजनी धरण मायनसमध्ये गेले होते तर जून 2020 मध्ये सर्वात निचांकी म्हणजेच मायनस - 24.15 टक्क्यांपर्यंत गेलेल्या धरणात पुणे जिल्ह्यातून व भीमा खोऱ्यात पडलेल्या पावसाचे पाणी आल्याने पाणी पातळी वाढली होती.
संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी चंद्रभागेवरील भराव दुरुस्तीस नगर पालिकेकडून सुरुवात पंढरपूर शहरानजीक दगडी पुलाशेजारी असलेल्या बंधाऱ्याच्या वरील बाजूकडील भराव वाहून गेल्यामुळे या बंधाऱ्यास मोठा धोका उत्पन्न झाला होता. सदर भराव वाहून गेल्यानंतर भीमा पाटबंधारे विभागाकडून तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेणे गरजेचे होते, मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. यंदा सर्वत्र चांगला पाऊस सुरू असून उजनी धारणातही वेगाने पाणी जमा होत आहे. अशावेळी संभाव्य पुराचा धोका टाळण्यासाठी अखेर नगरपालिकेने या बंधाऱ्याच्या मजबुतीकरण करण्यास सुरुवात केल्याने परिसरातील नागरिकांत भीती कमी झाली आहे . या परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा वाळू उपसा होत असल्याने बंधाऱ्याच्या भराव खचू लागला होता .महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)