एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंकडून कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 50 हजार सदस्य नोंदणीचे टार्गेट

Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 50 हजार सदस्य नोंदणी करण्याचे टार्गेट पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

Uddhav Thackeray : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 50 हजार सदस्य नोंदणी करण्याचे टार्गेट पदाधिकाऱ्यांना दिले आहे. प्रमुख नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी सदस्य नोंदणी करण्यास सांगितले आहे. उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीच्या संघटनात्मक तयारीबाबत चर्चा करण्यासाठी तीन जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांना बोलावले होते. मातोश्रीवर ही बैठक पार पडली. 

या बैठकीला उपस्थित असलेल्या एका नेत्याने सांगितले की, त्यांना प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून  आमच्या पक्षाकडे 50,000 समर्थकांची नोंदणी करण्यास सांगण्यात आले आहे. आगामी निवडणुका धनुष्यबाण चिन्हाशिवाय होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे नवीन चिन्ह मशाल लोकांपर्यंत नेण्याचे आवाहन प्रमुख नेत्यांनी केले.

स्थानिक नेत्यांकडून शिफारसी मागवल्या

या बैठकीला कोल्हापूरमधून शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि विजय देवणे उपस्थित होते. पक्षाच्या पुनरुज्जीवनासाठी वरिष्ठ नेत्यांनी स्थानिक नेत्यांकडून शिफारसी मागवल्या. संजय पवार यांनी सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संघटनात्मक सुधारणेवर भाष्य केले. तसेच नेत्यांना आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू करण्याचे आवाहन केले. कोल्हापुरातील दोन्ही शिवसेना खासदार तसेच एकमेव आमदार प्रकाश आबिटकर शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नेत्यांना अप्रत्यक्षपणे या जिल्ह्यांमधून लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांचा शोध घेण्याचे सांगण्यात आले आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेला भगदाड 

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाळी केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात त्याचे पडसाद उमटले. जिल्ह्यातील एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, सहयोगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, माजी आमदार राजेश क्षीरसागर खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी बंडखोरी करत शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम पदाधिकारी करत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात शिंदे गटाकडूनही पदाधिकारी नेमले गेले आहेत. 

आदित्य ठाकरेंना उस्फूर्त प्रतिसाद

बंडखोरांच्या मतदारसंघात युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनीही ऑगस्ट महिन्यात सभा घेत जिल्हा पिंजून काढला होता.  यावेळी आदित्य ठाकरे यांचे झालेले स्वागत आणि त्यांच्या सभांना मिळालेला प्रतिसाद पाहून बंडखोरांना चांगलाच धसका बसला होता. आजरा तालुक्यातही त्यांचे झालेले स्वागत बंडखोरांना विचार करायला लावणारे होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्टपर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
महाराष्ट्रात एसआयआरची मुदत 10 दिवसांनी वाढवली, 17 ऑगस्ट पर्यंत घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येणार 
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा

व्हिडीओ

Congress On Sunetra Pawar : गूंगी गुडियाचा टोला, वाद विकोपाला | Special Report ABP Majha
Ketan Agarwal Case Update : सियाचं कांड, लग्नाआधीच गुप्तहेरांना डिमांड | Special Report ABP Majha
Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
अहिल्यानगरच्या शेवगावमध्ये बिबट्याची दहशत; नर-मादीसह पिल्लांचा वावर, शेतात जायचं कसं? ग्रामस्थ काळजीत
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
Embed widget