एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
माझा इफेक्ट : अकोल्यातील दूध भेसळप्रकरणी दोघांचं निलंबन
एबीपी माझाच्या बातमीनंतर दुग्धविकासमंत्र्यांनी कारवाई केली. विशेष म्हणजे, निलंबनाच्या आदेशात एबीपी माझाच्या बातमीचा उल्लेखही करण्यात आलाय.
अकोला : अकोला शासकीय दूध योजनेतील भेसळ प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा दुग्ध शाळा पर्यवेक्षक डी. डी. जाधव आणि दुग्ध शाळा व्यवस्थापक निरंजन कदम यांच्यासह एकाचं निलंबन करण्याचे आदेश दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिले आहेत.
एबीपी माझाच्या बातमीनंतर दुग्धविकासमंत्र्यांनी कारवाई केली. विशेष म्हणजे, निलंबनाच्या आदेशात एबीपी माझाच्या बातमीचा उल्लेखही करण्यात आलाय.
प्रकरण काय आहे?
अकोल्याच्या शासकीय डेअरीतल्या भेसळीचा प्रकार समोर आला होता. अकोल्यातील शासकीय दूध योजनेच्या टँकरमध्ये कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारीच कशी भेसळ करतात याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल झाला होता.
अकोला-मूर्तिजापूर मार्गावर शासकीय दूध योजनेचं कार्यालय आहे. अकोल्याच्या शासकीय डेअरीतून राज्यातील भंडारा, सांगली, सोलापूर, पुण्यासह मुंबईच्या 'महानंद'ला दूध पुरवठा केला जातो. दर दोन दिवसांनी अकोल्यातून दहा हजार लिटर क्षमतेचा दुधाचा एक टँकर या ठिकाणांवर पाठवला जातो. मात्र या कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी या दुधात दुध पावडर आणि पाणी मिसळून ही भेसळ करतात. या व्हिडीओमध्ये खुद्द शासकीय डेअरीचा व्यवस्थापकही दिसतो आहे. त्यामुळे भेसळीच्या या साखळीत बडे अधिकारीही सहभागी असल्याचं स्पष्ट होतं होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
राजकारण
मुंबई
Advertisement