एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
इंजिनिअर तरुणीच्या हाती गावाचा कारभार, अवघ्या 25व्या वर्षी सरपंच
बीडमध्ये सध्या मंजरथ ग्रामपंचायत चांगल्याच चर्चेचा विषय बनला आहे. याचं कारण म्हणजे त्या गावाची नवनिर्वाचित सरपंच...
बीड : क्षेत्र कोणतेही असो तिथे तुम्हाला काम करण्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेची गरज असतेच अपवाद फक्त राजकारण. म्हणूनच आजही राजकीय क्षेत्रात अगदी बोटावर मोजता येणारी मंडळी सोडली तर फार शिकलेले लोक आपल्याला शोधून देखील सापडत नाही. पण बीडमध्ये एक पंचवीस वर्षाची ऐरोनॉटीकल इंजिनिअर तरुणी चक्क सरपंचपदी विराजमान झाली आहे.
बीडमध्ये सध्या मंजरथ ग्रामपंचायत चांगल्याच चर्चेचा विषय बनला आहे. याचं कारण म्हणजे त्या गावाची नवनिर्वाचित सरपंच...
ऋतुजा आनंदगावकर.... वय अवघं 25 वर्ष, शिक्षण ऐरोनॉटीकल इंजिनिअरिंग. आता एवढं शिक्षण घेतल्यावर कोणीही लाखभर पगाराची नोकरी नक्कीच करेल. मात्र, ऋतुजानं नोकरीपेक्षा गावाला प्राधान्य दिलं.
ऋतुजाला समाजकारणाचं बाळकडू घरातच मिळालं. तिच्या वडीलांनी 25 वर्ष गावचा कारभार हाकला आणि गावाला समृद्ध केलं.
जनतेतून सरपंच झालेल्या ऋतुजाकडून गावकऱ्यांच्या देखील मोठ्या अपेक्षा आहेत. एक सुशिक्षित मुलगी गावाचा विकास नक्की करणार असा विश्वास गावकऱ्यांना वाटतो. आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत गरजा ती पूर्ण करेल यासाठी गावातील महिलांनी एकत्र येऊन तिचा प्रचार केला आणि तिला निवडून दिलं.
ऋतुजाचे आई-वडीलांनी देखील गावात बरीच विकासकामं केली आहेत. त्यामुळे या निवडणुकीत ऋतुजाला त्याचा फायदा झाला. त्यामुळे आता गावच्या अधिक विकासाची जबाबदारी तिची खांद्यावर असणार आहे.
सध्या ऋतुजा ऐरोनॉटीकल ऑनालिस्ट म्हणून काम करते. गरज पडली तर गावच्या कामासाठी नोकरी सोडण्यासाठीही तयार असल्याचही ऋतुजा सांगते.
सध्या राजकारणात शिक्षकलेल्या उमेदवारांची फारच गरज आहे. राजकारणात येऊ पाहणाऱ्या तरुणांसाठी ऋतुजानं एक नवा आदर्श उभा केला आहे.
VIDEO :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
निवडणूक
राजकारण
Advertisement