Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 01 जुलै 2022 : शुक्रवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. भाजपच्या धक्कातंत्रानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शिंदेशाहीची सुरुवात, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री तर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री
शिवसेनेचे प्रबळ नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केलं आणि राज्यातील सत्तासंघर्षाची सुरुवात झाली. शिवसेनेतील काही आमदारांसह एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नॉट रिचेबल झाले आणि शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. एकापाठोपाठ एक आमदार आणि मंत्री एकथान शिंदेंच्या गटात सामील होऊ लागले. खरं तर तेव्हापासूनच महाविकास आघाडी सरकारचं काउंटडाऊन सुरु झालं होत. भावनिक साद, आवाहन, अल्टिमेटम सर्व काही करुन झालं पण बंडखोर आमदार आपल्या भूमिकेवर ठाम होते. आरोप-प्रत्यारोपांची सत्र रंगली आणि अखेर या राजकीय नाट्यावर पडदा पडला तो म्हणजे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या राजीनाम्यामुळे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला आणि गेल्या अडीच वर्षांपासून महाराष्ट्रात सत्तेत असलेलं महाविकास आघाडी सरकार कोसळलं.
2. मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन एकनाथ शिंदे गोव्याला परतले, आज आमदारांना घेऊन मुंबईत येण्याची शक्यता
3. वरिष्ठांनी मनधरणी केल्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री, मात्र शपथविधीनंतर देवेंद्र फडणवीसांच्या नाराजीच्या राजकीय वर्तुळात चर्चा
4. पत्रकार परिषदेदरम्यान शरद पवारांना उद्धव ठाकरेंचा फोन, पवारांनी बोलणं टाळलं, पत्रकार परिषदेदरम्यान आलेल्या फोनची समाज माध्यमात चर्चा
5. पहिल्या कॅबिनेट बैठकीत जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव आणण्याचे फडणवीसांचे आदेश तर आरेतच मेट्रो कार शेड होईल, कोर्टात बाजू मांडण्याचे महाधिवक्तांचे निर्देश
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 01 जुलै 2022 : शुक्रवार
6. शनिवारी आणि रविवारी विधानसभेचं विशेष अधिवेशन, नव्या सरकारला बहुमत चाचणी सिद्ध करावी लागणार, विधानसभा अध्यक्षाचीही निवड होणार
7. 2004 ते 2019 पर्यंतच्या निवडणुकांपर्यंतची शरद पवारांना आयकर विभागाची नोटीस, शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिल्याचं आश्चर्य, तर उपमुख्यमंत्रीपदाबद्दल नाखूश असल्याची फडणवीसांची देहबोली, पवारांचा प्रतिक्रिया
8. जूनमध्ये दडी मारलेल्या पावसाची दमदार एन्ट्री, कोकण किनारपट्टीवर मुसळधार पावसाचा इशारा, मुंबईतही रात्रभर पावसाची बॅटिंग, लोकलही उशिरानं
9. मणिपूरच्या नोने जिल्ह्यात मोठं भूस्खलन, रेल्वेलाईनच्या सुरक्षेसाठी तैनात टेरिटोरियल आर्मीचे जवान ढिगाऱ्याखाली दबले, 7 जवानांसह 14 नागरिकांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
मणिपूरच्या नोनी जिल्ह्यात भूस्खलनाच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. आताच्या अपडेट्सनुसार या घटनेत सात जवानांसह 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ढिगाऱ्याखाली अद्याप अनेक जण अडकले असल्याची शक्यता आहे. यात काही जवान देखील आहेत, अशी माहिती मिळत आहे. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु असल्याची माहिती असून खराब हवामान आणि सातत्यानं भूस्खलन सुरु असल्यानं मदतकार्यात अडथळे येत आहेत.
इम्फाळ-जिरिबाम रेल्वे मार्गाच्या सुरक्षेसाठी भारतीय लष्कराची एक तुकडी तैनात करण्यात आली होती. याच ठिकाणी भूस्खलन झाले आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली. ढिगाऱ्याखाली गाडल्या गेलेल्या जवानांना आणि नागरिकांना बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत.
10. बर्मिंगहॅम कसोटीसाठी टीम इंडियाच्या नेतृत्त्वाची सूत्रं उपकर्णधार जसप्रीत बुमराच्या खांद्यावर; कर्णधार रोहित शर्माची कोरोनामुळं इंग्लंड दौऱ्यातल्या कसोटीतून माघार