Top 10 Maharashtra Marathi News: स्मार्ट बुलेटिन : 05 मार्च 2022 : शनिवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. पेट्रोल-डिझेलचे दर 12 रुपयांनी वाढण्याची शक्यता, तेल कंपन्यांच्या नुकसान भरपाईसाठी दर वाढवणार, ICICI सिक्युरिटीजच्या अहवालाचा दावा
2. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींच्या घरावर हल्ला, झेलेन्स्की देश सोडून पोलंडला गेल्याचा रशियन मीडियाचा दावा तर किव्हच्या कार्यालयात असल्याचा झेलेन्स्कींचा व्हिडीओ
Russia Ukraine War : युक्रेनवर रशियाकडून हल्ले सुरूच आहेत. रशियन सैन्याने युक्रेनचे लष्करी तळ उद्धवस्त केले आहे. रशियाकडून बॉम्ब हल्ले सुरू आहेत. रशियाकडून राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या हत्येचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोप युक्रेनने केला आहे. राष्ट्रपती झेलेन्स्की यांच्या निवास स्थानाजवळ रॉकेटचा काही भाग आढळून आला आहे. राष्ट्रपती निवास स्थानावर हल्ला करण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे. रशियाने डागलेल्या हल्ल्यात राष्ट्रपती भवनाचे नुकसान झाले नसल्याचे वृत्त आहे. स्वत: राष्ट्रपती व्लादिमीर झेलेन्स्की यांनी त्यांच्या निवासस्थानाबाहेर पडलेल्या या रॉकेटवर भाष्य केले आहे. रशियाचा निशाणा चुकला असल्याचे सांगत त्यांनी याआधीदेखील आपल्या हत्येचा प्रयत्न झाला असल्याचे त्यांनी म्हटले. काही वृत्तांनुसार, युद्ध सुरू झाल्यानंतर रशियाने किमान तीन वेळेस झेलेन्स्की यांच्या हत्येचा प्रयत्न केला आहे.
3. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण नाहीच, संपकरी कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं राज्य शासनाचं आवाहन
4. दिशा सालियन प्रकरणी राणे पिता-पुत्रांची आज चौकशी, आज दुपारी 1 वाजता मालवणी पोलीस ठाण्यात हजर राहण्याच्या सूचना
5.मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेच्या तारखा जाहीर; काही परीक्षा ऑफलाईन तर काही ऑनलाईन होणार
6. लोकप्रतिनिधींच्या विरोधातील फौजदारी खटल्यांची माहिती सादर करा, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
7. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचा प्रचार आज थांबणार, पंतप्रधान मोदींची युपीच्या खजुरीगावात सभा
8.मणिपूरमध्ये आज मतदानाचा दुसरा टप्पा, 22 जागांसाठी 92 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
9. ट्विटरचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, कायमस्वरुपी वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा, कार्यालयात येण्यासाठी कुणालाही सक्ती नाही
10. ऑस्ट्रेलियाचा महान लेगस्पिनर शेन वॉर्न काळाच्या पडद्याआड, वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन, क्रीडा विश्वात हळहळ