Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 01 सप्टेंबर 2022 : गुरुवार : एबीपी माझा
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
1. पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटकडून गर्भाशयाच्या कर्करोगावरील पहिल्या स्वदेशी लशीची निर्मिती, वैद्यकीय क्षेत्रात भारताची अतुलनीय कामगिरी
भारतात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगानं (Cervical Cancer) मृत्यू होतो. मात्र, या घातक आजारावर मात करणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute) तयार केली आहे. गर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटनं 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' ही स्वदेशी लस विकसित केली असून सीरम इन्स्टिट्यूट आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आजच 1 सप्टेंबर रोजी ही लस लाँच करणार आहेत, अशी माहितीये.
2. विदर्भातील 10 जिल्ह्यांना हवामान खात्याकडून यलो अलर्ट, मराठवाड्यातही जोरदार पावसाचा अंदाज, कोकण-मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी
राज्यात पावसाचा (Rain) जोर कमी झाला आहे. मात्र, गणपतीच्या आगमनाबरोबरच काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईसह, ठाणे, नवी मुंबई या भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तसेच रायगड आणि पालघरमध्ये देखील पावसानं हजेरी लावली आहे. तसेच पुणे जिल्ह्याच्या परिसरात देखील हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. तर अन्य ठिकाणी मात्र, पावसानं उघडीप दिली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, आज कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
3. सोलापुरातल्या माचणूरमधील प्राचीन मंदिरात पुरातत्व विभागानं कारवाई केल्यानं ग्रामस्थ संतप्त, मंदिरातील फरशी कामावर आक्षेप, ऐन गणेशोत्सवात वाद उफाळला
4. शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक बंद करा, भाजप आमदार प्रशांत बंब यांची भूमिका, शिक्षक आमदारांकडून पलटवार
5. टीईटी प्रकरणी 3 शिक्षकांची औरंगाबाद खंडपीठात धाव, राज्य सरकारच्या वेतन थांबवण्याच्या आदेशाविरोधात याचिका
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 01 सप्टेंबर 2022 : गुरुवार : एबीपी माझा
6. आज दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन, ऋषीपंचमीसाठी शेकडो दिंड्या शेगावात दाखल, पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर अथर्वशीर्ष पठण
7. ईडब्ल्यूएस आरक्षणाची सुनावणी 13 सप्टेंबरला, उच्च शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यातील आर्थिक दुर्बल घटकांना मिळणाऱ्या 10 टक्के आरक्षणाची घटनात्मक परीक्षा
8. इस्रायलचा सीरियाच्या अलेप्पो विमानतळासह दोन एअरपोर्टवर हल्ला, इस्रायल-इराणमध्ये युद्ध भडकण्याची चिन्ह
9. अभिनेत्री जॅकलिनला ईडीचं समन्स, 26 सप्टेंबरला चौकशीला हजर राहण्याचे आदेश, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी पटियाला कोर्टाचं समन्स
10. आशिया चषक टी-20 स्पर्धेत भारताची सुपर फोरमध्ये एन्ट्री, हाँगकाँगचा 40 धावांनी पराभव, विराट आणि सूर्यकुमारची बॅट तळपली