Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 17 मे 2022 : मंगळवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. राज्यातल्या 14 महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, निवडणुका पावसाळ्यात की पावसाळ्यानंतर याची स्पष्टता होण्याची शक्यता
महाराष्ट्रातल्या निवडणुका (Maharashtra Mahanagarpalika ZP Election) नेमक्या कधी होणार याबाबत महत्वाचा फैसला आज सुप्रीम कोर्टात (Supreme Court) होणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने 13 तारखेला आपली याचिका सुप्रीम कोर्टात मेन्शन केली होती. त्यावर सुनावणीसाठी कोर्टानं 17 मे रोजीची दुपारी 2 वाजताची वेळ निश्चित केली आहे. आयोगाकडून महापालिका नगरपंचायती सप्टेंबरमध्ये तर जिल्हा परिषद ग्रामपंचायती ऑक्टोबरमध्ये घेण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळं सुप्रीम कोर्ट पावसाळ्यानंतर निवडणुका घेण्यासाठी मुभा देणार का? याचे उत्तर आज कळणार आहे.
राज्यात निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता
राज्यात निवडणुका पावसाळ्यानंतर आणि त्याही महापालिका, नगरपंचायती एकावेळी तर जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीनंतर अशा दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. राज्यातील जिल्हा परिषद, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्या असं राज्य निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टात केलेली ही विनंती मान्य होणार का यावर राज्यातल्या निवडणुकांचं भविष्य ठरणार आहे. तसं झाल्यास गेल्या दोन अडीच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुका शहरी आणि ग्रामीण अशा दोन टप्प्यांत, पावसाळ्यानंतर पार पडण्याची शक्यता आहे.
2. अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरेंची पुण्यात सभा, सभेच्या परवानगीसाठी मनसेकडून अर्ज, तर आजपासून अयोध्या दौऱ्यासाठी मनसेकडून नोंदणी अभियान
3. राज्यसभेसाठी संभाजीराजे छत्रपतींना राष्ट्रवादीचा पाठिंबा, राजे समर्थकांचा दावा तर शिवसेना आणि काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
4. केतकी चितळेच्या अडचणीत वाढ, ठाणे पोलिसांकडून केतकीचे जुने मोबाईल, लॅपटॉप जप्त तर केतकीविरोधात राज्यभरात 14 ठिकाणी गुन्हे
5. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा पुन्हा राज ठाकरेंवर निशाणा, कोरोनाच्या लाटेत अँब्युलन्सचे भोंगे ऐकू यायचे..आता वेगळेच भोंगे ऐकू येतात, ठाकरेंची फटकेबाजी
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 17 मे 2022 : मंगळवार
6. पुण्यात स्मृती इराणींच्या कार्यक्रमस्थळी भाजप आणि राष्ट्रवादींच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, कारवाईसाठी राष्ट्रवादीचा ठिय्या, तर कारवाई करा अन्यथा जशास तसं उत्तर देण्याचा फडणवीसांचा इशारा
7. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याचा हिंदू पक्षाचा दावा, संबंधित जागा सील करण्याचे कोर्टाचे आदेश, सर्वेविरोधातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी
8. मान्सून सहा दिवस आधीच अंदमानात, 27 मेपर्यंत केरळमध्ये पोहोचण्याचा अंदाज तर पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात पावसाच्या सरी कोसळणार
9. सुलभ कर्ज देणाऱ्या अॅप्सचा मोबाईल्सवर सुळसुळाट, आमिष दाखवून ग्राहकांची फसवणूक, कर्ज न घेताही परतफेडीसाठी धमकीचे फोन
10. एलआयसीचा आयपीओ आज शेअर बाजारात येणार, देशातल्या सर्वात मोठ्या आयपीओचं आज स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्टिंग, गुंतवणूकदारांचं लक्ष