Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 16 मार्च 2022 : बुधवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
बारा ते चौदा वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला आजपासून सुरुवात, 28 दिवसांच्या अंतरानं कोर्बेवॅक्सचं दोन डोस
12 to 14 years Vaccination : आजपासून 12 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला (Corona Vaccination) सुरूवात होत आहे. 12 वर्ष पूर्ण ते 14 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचं लसीकरण करण्यात येणार आहे. मुंबईतील 12 केंद्रांवर 2 दिवस प्रायोगिक तत्त्वावर दुपारी 12 वाजल्यापासून लसीकरण सुरु होणार आहे.. लाभार्थ्यांना Corbevax या लसीचे 2 डोस 28 दिवसांच्या अंतराने देण्यात येणार आहेत. केंद्र सरकारकडून 12 ते 14 या वयोगटातील लहान मुलांसाठी हे लसीकरण सुरू होणार आहे. लहान मुलांना बायोलॉजिक ईएस कोर्बोवॅक्स कंपनीची लस दिली जाण्याची शक्यता आहे. एनटीएजीआयने 12 ते 14 या वयोगटासाठी लसीकरण सुरू करण्याची शिफारस केली होती. आरोग्य मंत्रालयाकडून यासंदर्भात गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. Corbevax ही लस मुलांना दिली जाणार असून दोन डोसमध्ये 28 दिवसांचं अंतर असणार आहे. याबाबतीत गाईडलाईन्स सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आल्या आहेत. देशभरात 12 ते 14 वर्षातील 7.74 कोटी मुलं आहेत. यांच्या लसीकरणासाठी CoWIN अॅप वर रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे. ही लस सर्वांना मोफत दिली जाणार आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेला उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार नाही, गैरप्रकार टाळण्यासाठी बोर्डाचा निर्णय
मुंबईत मनसे वाहतूक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आयपीएलची बस फोडली, खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचं काम मुंबईच्या व्यावसायिकाला न दिल्यानं संताप
नाशिकमध्ये चौकीतच पोलिसांची दारु पार्टी, दारुड्यांच्या तक्रारीसाठी गेलेल्या नागरिकांसमोर प्रकार उघड, मद्यधुंद पोलिसांनी मारहाण केल्याचाही स्थानिकांचा आरोप
हिंगोलीत बोगस डॉक्टरांचा पर्दाफाश, तीन क्लिनिकवर आरोग्य प्रशासनाची कारवाई
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रस्ताव राज्यपालांनी परत पाठवला, कोर्टातल्या प्रलंबित याचिकेवर बोट, काँग्रेसनं बोलावली महत्त्वाची बैठक
भगवंत मान आज घेणार पंजाबच्या मुख्यंमत्री पदाची शपथ, आपची जय्यत तयारी
कपिल सिब्बल यांच्या घरी काँग्रेसच्या जी-23 नेत्यांची बैठक, गांधी घराण्याच्या नेतृत्त्वावर सवाल उपस्थित होत असल्यानं बैठकीकडे लक्ष
विश्वचषकात भारत विरुद्ध इंग्लंड महिलांचा सामना सुरु, भारतीय संघाचं खराब प्रदर्शन, इंग्लंडच्या भेदक गोलंदाजीसमोर संघ ढेपाळला