Top 10 Maharashtra Marathi News : स्मार्ट बुलेटिन : 13 मे 2022 : शुक्रवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. महागाईनं मोडला 8 वर्षांचा रेकॉर्ड, अन्नधान्य महागाईचा दर 8.38 टक्क्यांवर, जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडल्यानं सर्वसामान्यांच्या खिशावर मोठा भार
2. एकही खासदार नसणारे आणि घरातून बाहेर काढलेल्यांवर काय बोलू, अकबरुद्दीन ओवेसींचा राज ठाकरेंवर हल्लाबोल, तर औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेणाऱ्या धाकट्या ओवेसींवर सेना-मनसेची टीका
3. पराभवाच्या गर्तेत सापडलेल्या काँग्रेसचं उदयपूरमध्ये 3 दिवसीय चिंतन शिबीर, एक कुटुंब-एक तिकीट फॉर्म्युल्यासह अनेक महत्त्वाच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता
4. छोटा शकीलशी व्यवहार केल्याच्या आरोपाखाली मुंबईतील दोन भावंडांना अटक, आरोपी आरिफ आणि शब्बीर ओशिवाराचे रहिवाशी
5. मे अखेरीस मान्सून कोकणात दाखल होण्याचा अंदाज, वेळेआधी वरुणराजा येणार असल्यानं शेतीकामाचं वेळापत्रक बदलण्याची शक्यता
6.जालना जिल्ह्यातील चांदई गावात दोन गटात तुफान दगडफेक, गावातील कमानीला नाव देण्यावरुन वाद, पोलिसांकडून हवेत गोळीबार
7. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्यातील ग्रॅनाईट काढण्याचा निर्णय, विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची झीज प्रकरणी पुरातत्व विभागाचा अहवाल, मंदिर समितीच्या बैठकीत निर्णय
Ashadhi Wari 2022 : विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची झपाट्याने होणारी झीज ABP माझाने समोर आणल्यानंतर राज्य शासनाने तातडीने एक बैठक घेत भारतीय पुरातत्व विभागाच्या पथकाला पाहणीसाठी पाठवले होते. या अधिकाऱ्यांनी आता आपला अहवाल राज्य शासन आणि मंदिर समितीला दिला असून या अहवालानुसार मूर्तीला हानिकारक ठरणाऱ्या ग्रॅनाईट फारशा तातडीने काढण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. याच सोबत देवाला अभिषेक घालताना दूध, दही, मध आणि साखर याचा अत्यंत मर्यादित स्वरूपात वापर करून अभिषेकासाठी क्षारमुक्त आरओ पाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा भिषेक करताना देवाच्या डोक्यावरून अतिशय हळू वेगात पाणी घालण्याचाही निर्णय घेण्यात आला.
विठ्ठलाचा गाभारा लहान असून येथे भाविकांच्या गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात उष्णता आणि ह्युमिडिटी तयार होते . याचाही परिणाम मूर्तीवर होत असल्याने येथे टेम्परचर सेन्सर लावण्यात येणार आहे . मूर्तीसाठी साधारण 22 ते 25 डिग्रीपर्यंत तापमान राखणे आवश्यक असल्याने त्याच पद्धतीने भाविकांना मर्यादित संख्येत गाभाऱ्यात सोडण्यात येणार आहे . सध्या गाभाऱ्यातील तापमान 32 ते 35 डिग्री पर्यंत जात असल्याने या उष्णतेचा त्रास मूर्तीला होत असतो . याशिवाय गाभाऱ्यातील गरम हवा बाहेर जाण्यासाठी चौखांबी मध्ये व्यवस्था पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केली जाणार आहे.
देवाच्या सजावटीसाठी वापरण्यात येणारे फळे आणि देशी विदेशी फुलांमुळे देखील मूर्तीला त्रास होत असल्याने ही सजावट गाभारा आणि चौखांबीच्या बाहेर करण्यावर विचार केला जात आहे . याबाबत देखील पुरातत्व विभागाच्या सूचनांचे पालन होणार आहे . सध्या रुक्मिणीमातेच्या पायाची झालेली झीज पूर्ववत करण्यासाठी वज्रलेप देण्याचा निर्णय घेण्यात आला असून पुरातत्व विभागाकडून वेळ नक्की केली जाणार असल्याचे मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितले. रुक्मिणीच्या पायाची झीज झाली असताना हे समितीच्या निदर्शनास का आणून दिले नाही असा विषय बैठकीत होऊन याबाबत जबाबदार असणाऱ्या वर कारवाई करण्याचा निर्णय देखील बैठकीत झाला आहे.
8. दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघेंचा जीवनपट आजपासून मोठ्या पडद्यावर, ठाण्यातील व्हीवियाना मॉलमध्ये दिंघेंच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करून सिनेमाला सुरुवात
9. बीडमध्ये अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर, पुन्हा एका संतप्त शेतकऱ्याने पेटवला ऊस
10. चेन्नईचे आयपीएलमधील आव्हान संपुष्टात, डॅनिअल सॅम्स-तिलक वर्मा मुंबईच्या विजयाचे शिल्पकार