एक्स्प्लोर

Todays Headline 9th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या सर्व घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर, आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे शुक्रवारपासून दौन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी दोघांनीही अमित शाह यांची भेट घेतली. शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांची देखील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री भेट घेणार आहेत. मुख्यंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एकनाथ शिंदे यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची देखील भेट घेणार आहेत. त्यानंतर ते दिल्लीहून थेट पुण्याला येतील.  

जपानचे माजी पंतप्रधान शिन्झो आबे यांना आदरांजली वाहण्यासाठी भारतात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा - 
जपानचे माजी पंतप्रधान शिंझो आबे यांचे 8 जुलै 2022 रोजी निधन झाले. दिवंगत आबे यांना आदरांजली म्हणून, आज देशभरात एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा पाळण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. दुखवटा असताना, देशभरात ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जातो त्या सर्व इमारतींवर राष्ट्रध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल आणि त्या दिवशी कोणतेही औपचारिक मनोरंजनपर कार्यक्रम होणार नाहीत.

अमरनाथमध्ये मोठी दुर्घटना, 10 जणांचा मृत्यू
अमरनाथ येथे गुहेजवळ ढगफुटी झाली आहे. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एनडीआरफ आणि एसडीआरफच्या तुकड्या मदत आणि बचाव कार्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या असून वेगाने बचावकर्य सुरु आहे.  या दुर्घटनेतील मृतांचा अकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अती मुसळधार पावसाची शक्यता
पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात आज रेड अलर्ट आहे.  मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.   

अंकित सेरसा कोर्टात हजर करणार - 
सिद्धू मुसेवाला हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला अंकित सेरसा याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात येणार. पाच दिवसांपोसून अंकित आणि सचिन भिवानी पोलिसांच्या ताब्यात होते.

काँग्रेसची आज पत्रकार परिषद-
महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यानंतर आता महाविकास आघाडीतील पक्ष संघटनात्मक बांधणीच्या कामाला लागलेत. शिवसेनेप्रमाणेच काँग्रेसमध्ये महापालिका निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी होऊ नये याची विशेष काळजी घेतली जातेय. काँग्रेसमध्ये विधानपरिषद निवडणुकीत ७ मते फुटली. या फुटीर मतांचा शोध घेतला गेला असून चौकशी आणि अहवाल सादर करण्याकरता कॉँग्रेस हायकमांडनं निरीक्षकाची नियुक्ती केली आहे. आज ऑल इंडीया काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते अजॉय कुमार याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतील. 

वारी अपडेट - 
मान्याच्या पालख्यासह इतर सर्व महत्वाच्या पालख्या आज पंढरपुरात दाखल होतील. दोन वर्षानंतर होत असलेली आषाढी यात्रा विक्रमी होत असून शहरात जवळपास 7 लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांच्या निवासाचा प्रश्न कायमच गंभीर असतो. मात्र, काही वर्षांपासून प्रशासनाने चंद्रभागे शेजारी असणाऱ्या 65 एकर जागेवर भक्तिसागर हे निवास क्षेत्र विकसित केले आहे. यंदा रेल्वेच्या ताब्यात असलेले 40 एकराचे क्षेत्र देखील प्रशासनाला मिळाल्याने यंदा 105 एकर जागेत तब्बल 5 लाख भाविकांच्या मोफत निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.  या ठिकाणी पिण्याचे आणि वापराचे शुद्ध पाणी, आरोग्य व्यवस्था, स्वच्छतागृहे, वीज, डांबरी रस्ते आणि सुरक्षेसाठी पोलिसांची व्यवस्था केल्याने यंदा प्रथमच या ठिकाणी पाच लाखांपेक्षा जास्त भाविकांना येथे निवासाची सोय झाली आहे.

भारत-इंग्लंड यांच्यातील दुसरा टी 20 सामना आज -
सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून सध्या टी20 मालिका सुरु आहे. पहिल्या टी20 मध्ये भारताने विजय मिळवल्यानंतर आज दुसरी टी20 खेळवली जाणार आहे. हा सामना भारत जिंकून मालिकेत विजयी आघाडी घेईल? की इंग्लंड सामना जिंकून मालिकेत बरोबरी साधतो, हे पाहावं लागेल. सायंकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09PM 07 July 2024Top 100 Headlines Superfast News 8PM 07 July 2024Eknath Shinde on Uddhav Thackeray  | जे गेटमधून बाहेर निघत नव्हते ते शेताच्या बांधावर पोहोचले, शिंदेंची टीकाManoj Jarange Parbhani : लोकसभेत धडा मिळाला, आता अंत पाहू नका, मराठा महिलांचा सरकारला इशारा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
वीज कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! तीनही कंपन्यांच्या वेतनात मोठी वाढ
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
''आधी आमचं घर फोडलं, आता जनतेची घरं फोडताय''; लाडकी बहीण योजनेवरुन उद्धव ठाकरेंचा संताप
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
जी चूक झाली ती झाली, भुजबळांवर निशाणा, सरकारला इशारा, मराठ्यांना आवाहन; जरांगेंचं परभणीतलं भाषण
Embed widget