एक्स्प्लोर

Todays Headline 19th September : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील. 

Todays Headline 19th September : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 

संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपतेय
पत्राचाळ घोटाळाप्रकरणी अटकेत असलेल्या शिवसेना नेते संजय राऊतांची न्यायालयीन कोठडी आज संपतेय. त्यांना आज मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. तसेच त्यांनी दखल केलेल्या जामीन अर्जावरही आजपासून सुनावणी सुरू होण्याची शक्यता आहे.

पालघरमधील साधू हत्येच्या तपासाबाबत सुनावणी
पालघरमधील दोन साधू आणि त्यांच्या ड्रायव्हरच्या हत्येचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.

राज्यातील 547 ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी 
राज्यातील १६ जिल्ह्यांतील 547 ग्रामपंचायतींच्या निवडणुका काल पार पडल्या. त्यातील 61 जागा बिनविरोध निवडून आल्या. पहिल्यांदाच थेट नागरिकांमधून सरपंचाची निवड होणार आहे. सकाळी दहा वाजता मतमोजणी सुरु होईल.  

राज ठाकरेंचा नागपूर, चंद्रपूर दौरा  
मनसे अध्यक्ष राज ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर असून ते नेतेमंडळींच्या भेटी घेणार आहेत.  
 
शरद पवार सौलापूर दौऱ्यावर 
शरद पवार यांच्या हस्ते कुर्डुवाडी पंचायत समितीमध्ये  आ. कै. विठ्ठलराव शिंदे यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. 

उस्मानाबादच्या कळंबमध्ये आज मराठा आरक्षण मोर्चा
कळंबमधील विद्याभवन हायस्कूल ते तहसील कार्यालय या मार्गावर  सकाळी ११ वाजता मराठा आरक्षण मोर्चा निघणार आहे.   
 
मनसेच्या वतीने कोल्हापुरातील किणी टोल नाक्यावर तिरडी मोर्चा 
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या सीमेवर महामार्गावर असलेला किणी टोल नाका बंद करावा यासाठी मनसेनं लढा उभा केला आहे. आज मनसेच्या वतीने किणी टोल नाक्यावर तिरडी मोर्चा काढण्यात येणार आहे.  

राष्ट्रवादीचे पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयासमोर आंदोलन
फोक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून फर्ग्युसन महाविद्यालयासमोर सकाळी 11.30 वाजता आंदोलन होणार आहे. 
 
राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात अमरावतीच्या उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील असेगाव, अचलपूर आणि तळेगाव मंडळातील ३५ गावे अतिवृष्टीतून वगळण्यात आली. या विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्या सुरेखा ठाकरे यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. 
 
 क्वीन एलिझाबेथ यांच्यावर अंत्यसंस्कार 
 आज क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराला देशभरातील राष्ट्राध्यक्ष, राष्ट्रपती, पंतप्रधान श्रद्धांजली देण्यासाठी उपस्थित राहतील. भारताच्याराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शनिवारी संध्याकाळी राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या शासकीय अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी आणि भारत सरकारच्या वतीने शोक व्यक्त करण्यासाठी तीन दिवसांच्या दौऱ्यावर लंडनला पोहोचल्या.  

जॅकलिन फर्नांडिसची चौकशी 
सुकेश चंद्रशेखर प्रकरणात दिल्ली पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा पुन्हा एकदा जॅकलिन फर्नांडिसची चौकशी करणार आहे. जॅकलिन सकाळी 11.30 वाजता मंदिर मार्गावरील EOW च्या कार्यालयात पोहोचेल.  

 हिजाब प्रकरणी सुनावणी
सुप्रीम कोर्टात कर्नाटक हिजाब प्रकरणी सुनावणी सुरू राहणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special Report Mahayuti : महायुतीत उमेदवारांचे गूढ, महायुतीचे उमेदवार अजूनही ठरेना!Narendra Modi Full Speech : 'बारशाला गेला अन् बाराव्याला आला'; मराठी म्हणीतून काँग्रेसवर हल्लाNarendra Modi Wardha Speech : तडस - राणांसाठी नरेंद्र मोदींची सभा! वर्ध्यात घोषणांचा पाऊसMadha Lok Sabha : भाजपला माढ्यात मोठा धक्का! मोहिते-पाटील आणि उत्तम जानकर एकत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
LSG vs CSK, IPL 2024 : केएल राहुलची 82 धावांची खेळी, लखनौचा चेन्नईवर 8 विकेटनं विजय
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
धोनीनं करियरमध्ये खेळला पहिल्यांच असा शॉट, षटकार पाहून चाहत्यांचा जल्लोष VIDEO
Uttam Jankar and Mohite Patil : 30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
30 वर्षांचे वैर संपले, उत्तम जानकर-मोहिते पाटील एकत्र, माढ्यात फडणवीसांच्या पदरी अपयश
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं,  चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
रवींद्र जाडेजाचं शानदार अर्धशतक, धोनीनं पुन्हा चोपलं, चेन्नईची 176 धावांपर्यंत मजल
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
एमएस धोनी : तो आला, त्याने पाहिले, त्याने फिनिशिंग केली, लखनौच्या गोलंदाजांना चोपलं
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
IND vs PAK : शुभमन गिल भारत-पाकिस्तान सामन्याचा पोस्टरबॉय, फोटो व्हायरल
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
Embed widget