एक्स्प्लोर

Todays Headline 1st october : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

Todays Deadline : ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. 

पंतप्रधान मोदींच्या हस्ते 5G सेवांचा शुभारंभ -
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 5G सेवांचा शुभारंभ होणार आहे. त्याचवेळी मोदींच्या हस्ते नवी दिल्लीतील प्रगती मैदानात सहाव्या भारतीय मोबाईल परिषद 2022 (IMC-2022) चे उदघाटन होणार आहे. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर 5G सेवांचा शुभारंभ होत आहे. अलीकडेच 5G ध्वनिलहरींचा यशस्वीरित्या लिलाव करण्यात आला आणि दूरसंचार सेवा प्रदात्यांना 51,236 मेगाहर्टझ इतक्या क्षमतेचे स्पेक्ट्रम वाटप यशस्वीरित्या करण्यात आले ज्याचे एकूण उत्पन्न 1,50,173 कोटी रुपये इतके आहे.
 
सहाव्या भारतीय मोबाईल परिषदेचे उद्घाटन -
सहाव्या भारतीय मोबाईल परिषदेचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत. IMC “ नवे डिजीटल विश्व” या संकल्पनेसह 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान या भारतीय मोबाईल परिषद – 2022 चे उद्घाटन होणार आहे. या परिषदेच्या माध्यमातून डिजिटल तंत्रज्ञानाच्या जलद स्वीकार  आणि प्रसारामुळे उदयाला आलेल्या विशेष संधीबाबत चर्चा करण्यासाठी आणि त्या मांडण्यासाठी आघाडीचे विचारवंत, उद्योजक, नवोन्मेषी आणि सरकारी अधिकारी एका मंचावर येणार आहेत.

पावसाची शक्यता 
महाराष्ट्रात परतीच्या पावसाला सुरुवात झालीय. अशात पुढील चार पाच दिवस महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ज्यात पुढील तीन दिवस मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तीन ते चार ऑक्टोबर रोजी विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज आहे.

कंगना रणौत एकनाथ शिंदेंची भेट घेणार
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कट्टर विरोधक मानली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे. कंगना आज रात्री नऊच्या सुमारास मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या समर्थकांसह त्यांच्या विरोधकांनाही आपल्या बाजूनं वळवण्याचा शिंदे यांचा सातत्यानं प्रयत्न आहे. त्यामुळं कंगना रणौतच्या निकटवर्तियांकडून विचारणा झाल्यावर शिंदे यांनी तिला तातडीनं भेटीची वेळ दिली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात कंगनानं उद्धव ठाकरे यांच्याविरोधात वारंवार वादग्रस्त विधानं करून थेट शिवसेनेशी पंगा घेतला होता. तसंच कंगनाच्या कार्यालयातल्या बांधकामावरही मुंबई महापालिकेनं कारवाई केली होती.

रुपाली चाकणाकर हिंगोली दौऱ्यावर -
आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणाकर हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. जवळा बाजार येथे महिला मेळाव्याला त्या संबोधित करणार आहेत. यासह वसमत शहरात  अनेक कार्यक्रम आहेत. 

देवेंद्र फडणवीस विदर्भ दौऱ्यावर - 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी नागपुरात दाखल झाले आहेत. आज सकाळी ते हेलिकॉप्टरने गडचिरोली जिल्ह्यात जाणार असून तिथल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सहभागी होणार आहे.. तिथून ते वर्धा जिल्ह्यातील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी जाणार असून संध्याकाळी परत नागपुरात पोहोचणार आहे..

शशी थरूर नागपूर दौऱ्यावर
काँग्रेसचे अध्यक्ष पदाचे उमेदवार शशी थरूर आज नागपूरच्या काही तासांच्या दौऱ्यावर येत आहेत. संध्याकाळी पाचच्या सुमारास त्यांचे नागपूर आगमन होणार असून त्यानंतर ते दीक्षाभूमी येथे जाणार आहेत... संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांची दीक्षाभूमी येथेच पत्रकार परिषद होणार आहे..

भाजपचा रोजगार मेळावा

मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे राबवले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून आज भाजपच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंगल प्रभात लोढा, आशिष शेलार प्रवीण दरेकर प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत या रोजगार मेळाव्याची सुरुवात होईल

 चीनचा राष्ट्रीय दिवस -
चीनचा आज राष्ट्रीय दिवस आहे. त्यानिमित्ताने चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग राष्ट्राला संबोधित करणार आहेत. तसेच त्यापूर्वी सैन्याच्या परेडची सलामी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, सकाळी साडेसात वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 

केजरीवाल दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर - 
आम आदमी पार्टीचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. 
गांधीधाम आणि जूनागढ येथे ते सभांना संबोधित करणार आहे. त्यानंतर दोन ऑक्टोबर रोजी सुरेंद्र नगर आणि खेडब्रह्म येथे केजरीवाल यांची सभा होणार आहे.  

स्वच्छ सर्वेक्षण 2022 अवार्ड समारंभ - 
आज दिल्लीमध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2022 अवार्ड समारंभ आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असतील. 

मुंबईमध्ये आजपासून रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाड होणार
मुंबईमध्ये आजपासून ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरामध्ये वाढ लागू होणार आहे. टॅक्सीचे दर तीन रुपयांनी तर रिक्षाच्या दरांमध्ये दोन रुपयांनी वाढ होणार आहे. मुंबईमध्ये आता टॅक्सीसाठी कमीत कमी 28 रुपये तर रिक्षासाठी 23 रुपये आकारले जाणार आहेत. 

 Card Tokenisation नियम लागू
 एक ऑक्टोबरपासून आरबीआय क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरकर्त्यांसाठी कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन नियम आणत आहे. देशभरातील वाढत्या सायबर फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पुढील महिन्यापासून महत्त्वाचे बदल करणार आहे. या पूर्वी हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू होणार होता, पण RBI ने ही मुदत सहा महिन्यांसाठी वाढवून 30 जून केली होती. नंतर आरबीआयने 1 ऑक्टोबर 2022 पासून हा नियम लागू करण्याचे निश्चित केले. 

डिमॅट अकाउंट -
शेअर मार्केटमधील व्यवहारासाठी डिमॅट अकाउंट आवश्यक असते. अनेकजण शेअर बाजारात व्यवहार करतात. आता डिमॅट अकाउंटधारकांसाठी Two Factor Authentication करणे आवश्यक आहे. तुमच्या डिमॅट अकाउंटमध्ये  Two Factor Authentication चा पर्याय 30 सप्टेंबरपर्यंत Enable करावा लागणार आहे. त्याशिवाय, तुम्हाला तुमचे डिमॅट अकाउंट सुरू करता येणार नाही. 

एलपीजी गॅस दरात वाढ?
एलपीजी गॅस सिलेंडरचे दर एक ऑक्टोबर रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. दर महिन्याला व्यावसायिक आणि घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलेंडरचे दर जाहीर होतात.

 दिल्लीतील वाढतं वायूप्रदूषण रोखण्यासाठी आजपासून (जीआरएपी)  ‘GRAP योजना लागू केली जाईल... वायू प्रदूषण थांबवण्यासाठी योग्य पद्धतीनं या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे... पर्यावरण तज्ञांच्या मतानुसार याच वर्षाअखेर योजनेमुळे प्रदूषणांची समस्येत घट होईल. याआधी जीआरएपीची १५ ऑक्टेबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार होती. दरम्यान दिल्लीतील वायू प्रदूषण थांबवण्यासाठी ही योजना फायदेशीर ठरणार आहे

दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय आज दुपारी ३ वाजता महत्त्वाची पत्रकार परिषद घेणार आहेत.. रक्तदान दिनानिमित्त सकाळी ११ वाजता एम्स रुग्णालयातील रक्तदान शिबीरमध्ये सहभागी होणार आहेत.

सौराष्ट्र आणि शेष भारतमध्ये सामना - 
ईरानी चषकात आज सौराष्ट्र आणि शेष भारत यांच्यामध्ये सामना होणार आहे. या सामन्यात सर्व नजरा चेतेश्वर पुजारा याच्यावर असणार आहेत. अनुभवी पुजाराच्या फलंदाजीवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. 
आशिया चषकात भारतीय महिलांचा सामना - 
आजपासून भारतीय महिलांचा आशिया चषकाची  सुरुवात होणार आहे. एकदिवसीय मालिकेतील लय कायम ठेवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. इंग्लंडला क्लीन स्वीप दिल्यानंतर भारतीय महिलांचा उत्साह नक्कीच वाढला आहे. हरमनप्रीतच्या नेतृत्वातील भारतीय संघाला आशिया चषकाचा दावेदार म्हटले जातेय. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Attacker Update : सैफवरील हल्लेखोर वरळीच्या सिल्कवर्क्स कॅफेमध्ये होता कामाला, इतर कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यातSaif Ali Khan Attacker Update : सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं वरळीतील कोळीवाड्यात वास्तव्य, आरोपीचे शेजारी काय म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 19 January 2024Anandache Paan ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाकेंशी समकाल आणि समांतर पुस्तकांच्या निमित्त खास संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Saif Accused Police Custody : सैफ अली खानच्या आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
Embed widget