एक्स्प्लोर
Gold Rate : अमेरिका-चीनच्या टॅरिफ वादात सोन्याचे दर भडकले, तीन महिन्यात तब्बल 14 हजारांची वाढ
Gold Price Latest: आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळाले. सोन्याचे दर 3089.17 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत. 2025 च्या तीन पहिल्या तीन महिन्यात सोने दर वाढलेत.
सोने दरात वाढ
1/5

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर 125 टक्के आयात शुल्क लादण्याचा निर्णय घेतल्यानंतर गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 3089.17 डॉलर प्रति औंसवर पोहोचले. अमेरिकन गोल्ड फ्यूचर्सच्या दरात 0.8 टक्क्यांची वाढ होऊन ते 3104.90 डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहेत.
2/5

भारतात यावर्षी म्हणजेच 1 जानेवारी ते आतापर्यंत सोन्याच्या दरात 14421 रुपयांची वाढ झाली आहे. चांदीच्या दरात देखील 4652 रुपयांची वाढ झाली. एप्रिल महिन्यात सोन्याचे दर 997 रुपयांनी तर चांदीचे दर 10265 रुपयांनी घसरले आहेत.
Published at : 10 Apr 2025 06:35 PM (IST)
आणखी पाहा























