एक्स्प्लोर

'लक्ष्मी निवास'च्या टीमचं 100 भागांचं अनोखं सेलिब्रेशन, रिअल लाईफ रिक्षा चालक पोहोचले सेटवर; अनोख्या भेटवस्तूनं केलं स्वागत

Zee Marathi Laxmi Niwas Serial 100 Episods Celebration: 'लक्ष्मी निवास' मालिकेनं आज 100 भागांचा हृदयस्पर्शी टप्पा गाठला. पण हा आनंद द्विगुणित तेव्हा झाला, जेव्हा मुंबईचे रिक्षाचालक या उत्सवात सहभागी झाले.

Zee Marathi Laxmi Niwas Serial 100 Episods Celebration: 'झी मराठी' (Zee Marathi) वाहिनीवरील 'लक्ष्मी निवास' (Laxmi Niwas) मालिकेनं नुकताच 100 भागांचा टप्पा गाठला आहे. अल्पावधीतच हर्षदा खानविलकर (Harshada Khanvilkar), तुषार दळवी (Tushar Dalvi) स्टारर या मालिकेनं प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. या मालिकेतील शंभर भागांच्या सेलिब्रेशनचा आनंद खऱ्या अर्थानं तेव्हा द्विगुणित झाला, ज्यावेळी मुंबईचे रिक्षाचालक (Mumbai Rickshaw Driver) या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले.

'लक्ष्मी निवास' मालिकेनं आज 100 भागांचा हृदयस्पर्शी टप्पा गाठला. पण हा आनंद द्विगुणित तेव्हा झाला, जेव्हा मुंबईचे रिक्षाचालक या उत्सवात सहभागी झाले. 'लक्ष्मी निवास' टीमनं एका खास सेलिब्रेशनसाठी रिक्षाचालकांना आपल्या सेटवर आमंत्रित केलं. सध्याची कथा, जिथे श्रीनिवास, एका रिक्षाचालकाची भूमिका साकारत आहे, त्यांची दुसरी इनिंग सुरू झाली आहे.  हे सर्व कष्ट सुरू आहेत, एक हक्काच्या घरासाठी. या वेळेस मालिकेतील सर्व कलाकार सामील झाले आहेत. रिक्षाचालकांनी, लक्ष्मी आणि श्रीनिवास यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या, त्यांचे अनुभव ऐकून लक्ष्मीचे डोळेही पाणावले. त्यांच्या मेहनतीचे किस्से ऐकल्यावर त्यांना आपल्या गोड आणि साहसी शब्दांनी प्रोत्साहन दिलं. लक्ष्मी म्हणजेच, हर्षदा खानविलकर यांनी सांगितलं की, मी अनेकदा मुंबईच्या रिक्षामध्ये प्रवास केला, भलेही रात्रीचे 2 किंवा 3 वाजले असतील, पण मला नेहमीच सुरक्षितपणे घरी पोहचवलं आहे आणि मला या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो. अशा अनेक गप्पा सुरू असतानाच लक्ष्मी निवासचं संपूर्ण कुटुंब सेटवर पोहचलं आणि यशस्वी 100 भाग पूर्ण झाले, याच सेलिब्रेशन म्हणून रिक्षाचालक भावांसोबत केक कापला. 

लक्ष्मी निवास'च्या टीमचं 100 भागांचं अनोखं सेलिब्रेशन, रिअल लाईफ रिक्षा चालक पोहोचले सेटवर; अनोख्या भेटवस्तूनं केलं स्वागत
 
मालिकेत श्रीनिवासची भूमिका साकारत असलेली तुषार दळवी म्हणाले "आपल्या या रिक्षाचालक बंधूंच्या  प्रेरणादायी कथा ऐकून, त्यांच्या कुटुंबांप्रती असलेल्या त्यांच्या समर्पणामुळे मी खूप भारावून गेलो. आम्ही 'लक्ष्मी निवास' या मालिकेत याच लोकांच्या खऱ्या आयुष्यातले अनुभव टीव्ही स्क्रीनवर आणण्याचा प्रयत्न करत आहोत याचा आम्हाला आनंद आहे. आज या निमित्तानं परत आम्हाला आठवण झाली की, आपण या कथा का सांगतो? सामान्य माणसाची ताकद आणि लवचिकता प्रतिबिंबित करण्यासाठी." 

दरम्यान, रिक्षाचालक बंधू वेळात वेळ काढून 'लक्ष्मी निवास' सेटवर आले आणि श्रीनिवास, लक्ष्मी सोबत गप्पा मारल्या आणि 100 भागांच्या सेलेब्रेशनमध्ये सहभागी झाले, म्हणून झी मराठी आणि लक्ष्मी निवास कुटुंबाकडून त्यांना एक आंब्यांची पेटी भेट म्हणून देण्यात आली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Jai Jai Swami Samarth Marathi Serial Track: स्वामी समर्थांमध्ये घडणार हनुमान तत्वाचा साक्षात्कार; हनुमान जयंतीनिमित्त विशेष भाग

महत्त्वाच्या बातम्या

Asha Kale: 'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
'परमेश्वराने याचसाठी आत्तापर्यंत ठेवलं'  ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे त्याच ग्रेसने चाहत्यांसमोर आल्या; चाहतेही भारावले..
Rashmika Mandanna Mangalsutra: दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
दुखापतीनंतर रश्मिका मंदाना बेड रेस्टवर; कुटुंबासोबत घालवेय निवांत वेळ, मंगळसुत्राने वेधलं लक्ष
Govinda On Wife Sunita: बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
बायको सुनिताची टीका गोविंदाच्या जिव्हारी; अभिनेत्याची सणसणीत प्रतिक्रिया, म्हणाला, 'आपल्या मर्यादेत राहा'
ZEE5 Marathi: मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका
मराठी प्रेक्षकांसाठी ZEE5 चा मोठा मास्टरप्लॅन! ‘देवखेळ 2’, ‘हे काय नवीन?’; मोठे स्टार्स, नव्या कंटेंटचा धमाका

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget