Tahawwur Rana in India Special Report : तहव्वूर राणाला आणला, मुंबईला न्याय द्या Mumbai Terror Attack
नवी दिल्ली: मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड तहव्वूर राणाला भारतात आणण्यात आलं आहे. एनआयएचे आयजी बत्रांच्या नेतृत्वात विशेष पथक राणाला घेऊन भारतात आलं आहे. आता तहव्वूर राणाची एनआयए मुख्यालयात चौकशी होणार आहे. मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या तहव्वूर राणाला 2009 साली अमेरिकेत अटक करण्यात आली होती. आता त्याला भारतात आणण्यात आलं आहे.
अमेरिकेच्या कायद्यानुसार भारतात खटला चालणार
अमेरिकन कोर्टाने अनुमती दिलेल्या कलमांनुसारच तहव्वूर राणावर खटला चालवण्यात येणार आहे. अमेरिकेत खटला चालला असताना भारतात पुन्हा खटला का चालवता? असा सवाल तहव्वूर राणानं केला होता. मात्र भारताने राणाचा दावा खोडून काढत आंतरराष्ट्रीय कायद्यांचा दाखला दिला. सोबतच राणावरील आरोप गंभीर असल्याने भारतातही खटला चालवू शकतो असा दावा भारत सरकारच्या वकिलांनी अमेरिकन कोर्टात केला होता.
All Shows

































