उसतोड मजूर महिलांना मासिक पाळीच्या चार दिवसात वेतन साखर कारखानदारांनी द्यावं, नितीन राऊत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
LIVE
Background
'आज दिवसभरात' या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
महत्त्वाच्या हेडलाईन्सवर एक नजर....
1. ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा लांबणीवर, 27 किंवा 30 डिसेंबरचा नवा मुहूर्त, वेळ खाणाऱ्या काँग्रेसला शरद पवारांचा टोला
2. मंत्रिमंडळासाठी हायकमांडची अशोक चव्हाणांना पसंती तर पृथ्वीराज चव्हाणांच्या नावावर फुल्ली, सूत्रांची माहिती, अजित पवारांच्या मंत्रिपदाची उत्सुकता शिगेला
3. महाराष्ट्रानंतर भाजपचं झारखंडमध्येही पानिपत, काँग्रेस-जेएमएम आघाडीला स्पष्ट बहुमत, दीड वर्षांत भाजपने 5 राज्ये गमावली
4. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंना पुण्यात जिल्हाबंदी, शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी, भीमा कोरेगावमध्ये प्रशासनाची जय्यत तयारी
5. नाताळ आणि नववर्षाच्या तोंडावर जेवणाच्या ताटातून मासळी गायब, राज्यातील 22 टक्के मत्स्योत्पादन घटलं, खवय्यांची निराशा
6. विकी कौशल, आयुषमान खुरानाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार, हिंदीत पॅडमॅन तर मराठीत भोंगा ठरला सर्वोत्कृष्ठ सिनेमा