एक्स्प्लोर
Advertisement
LIVE UPDATES | पुणे, मुंबईनंतर नागपूरमध्ये एका रूग्णाला कोरोनाची लागण; राज्यभरात एकूण 11 कोरोनाग्रस्त
LIVE
Background
आज दिवसभरात या लाईव्ह ब्लॉगमध्ये देश-विदेशातील घडामोडींचा संक्षिप्त आढावा घेतला जातो. दिवसभर घडणाऱ्या घडामोडी, ब्रेक्रिंग न्यूज एकाच ठिकाणी, एकाच क्लिकवर वाचता येतात. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत आणि टेक्नॉलॉजीपासून लाईफस्टाईलपर्यंत सर्व बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट्स वाचकांना इथे मिळतील. त्यामुळे सुपरफास्ट अपडेट्स आणि दिवसभरातील ब्रेकिंग न्यूजसाठी लॉगऑन करा www.abpmajha.in
राज्यातील आणि देशभरातील बातम्यांचा संक्षिप्त आढावा
- महाराष्ट्रात आतापर्यंत 5 कोरोनाग्रस्त, पुण्यातल्या दाम्पत्याच्या मुलीसह विमानातल्या सहप्रवाशाला लागण, मुंबई ते पुणे प्रवास करणाऱा टॅक्सीचालकही कोरोनाग्रस्त
- कोरोनासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांनी बोलावली मंत्रिमंडळाची बैठक, आयपीएलसह, अधिवेशन कामकाजाबाबत निर्णय होण्याची शक्यता
- साडे चारशे वर्षात पहिल्यांदाच पैठणचा नाथषष्ठी सोहळा रद्द, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी निर्णय, अंबाबाईच्या दारावर निर्जंतुकीकरण यंत्रणा, इगतपुरीतली शिबिरं रद्द
- ज्योतिरादित्यांसह मध्य प्रदेशातील काँग्रेसच्या 22 आमदारांचा राजीनामा, कमलनाथांची खुर्ची धोक्यात, उर्वरीत आमदारांना आज काँग्रेस भोपाळमधून जयपूरला हलवणार
- ल्लीतल्या दंगलीवर लोकसभेत आज चर्चा, गृहमंत्री अमित शाह चर्चेला उत्तर देणार, विरोधी पक्षांकडून केली होती चर्चेची मागणी
- मनसेच्या शॅडो कॅबिनेटवर सामनातून टीका, मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी शॅडो राज्यपाल नेमण्याचाही खोचक सल्ला
23:34 PM (IST) • 11 Mar 2020
पुण्यातल्या नायडू रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोनाग्रस्तांच्या वॉर्डमध्ये डॉक्टरच फिरकत नसल्याची खंत, खुद्द रुग्णांनीच व्यक्त केलीय. अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असल्याचं कोरोनाग्रस्तांनी एबीपी माझाच्या प्रतिनिधीशी फोनवरुन बोलताना म्हटलंय.
23:32 PM (IST) • 11 Mar 2020
भिवंडीत कोरोनाच संशयित रुग्ण आढळून आलेल्या खळबळ उडाली होती. या रुग्णाचा रिपोर्ट मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयात चाचणी करता पाठविण्यात आला होता. या रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे
23:31 PM (IST) • 11 Mar 2020
सातारा जिल्ह्यात एकही कोरोनाची लागण झालेला रुग्ण नाही ; अफवावर विश्वास ठेवू नका, अफवा पसरविणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करणार, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या सूचना
23:30 PM (IST) • 11 Mar 2020
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर युजीसीने सर्व विद्यापीठांना खबरदारी म्हणून सूचना दिल्या आहेत.
त्यानुसार राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सर्व परिसंवाद, कार्यशाळा आणि व्याख्यान रद्द करण्यात आले आहेत.
सध्या विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. या परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात सूचना नाहीत.
23:31 PM (IST) • 11 Mar 2020
कोरोनाचा एकही संशयित रुग्ण धुळे जिल्ह्यात नसल्याची माहिती धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी यांनी दिलीय. शहरी भागापासून तर ग्रामीण भागापर्यंत कोरोना संदर्भात प्रशासनानं खबरदारीचे उपाय केले आहेत. दोंडाईचा येथील उपजिल्हा रुग्णालयात देखील विशेष कक्ष स्थापन करण्यात आलाय. कोरोना संदर्भात व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम जिल्ह्यात सुरु आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी धुळे शहरातील जिल्हा क्रीडा संकुल येथे मार्च दरम्यान होणाऱ्या विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा , सांस्कृतिक कार्यक्रम स्थगित करण्यात आल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिलीय .
Load More
Tags :
Aaj Divasbharat Today\'s News In Marathi Marathi News Trending News Abp Majha Latest Marathi Newsमराठीतील सर्व ताज्या बातम्या सर्वात आधी वाचा एबीपी माझावर. राजकारणपासून कोरोनापर्यंत आणि क्रीडापासून ते बॉलिवूडपर्यंतच्या सर्व अपडेट्स वाचण्यासाठी मराठीतील विश्वसनीय वेबसाईट म्हणजे एबीपी माझा. मराठीतील सर्व बातम्या वाचण्यासाठी लगेच फॉलो करा
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्राईम
महाराष्ट्र
निवडणूक
Advertisement