एक्स्प्लोर

13th December Headlines : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी, वादग्रस्त वक्तव्यांविरोधात पुणे बंदची हाक; आज दिवसभरात 

Today 13 December Top Headlines : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे. शिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप नेते चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुणे बंदची हाक दिलीय. 

Today 13 December Top Headlines : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सुनावणी होणार आहे. शिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप नेते चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुणे बंदची हाक दिलीय. तर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी आहे. यासह आज दिवसभरात घडणाऱ्या विविध घडामोडीवर आमचं लक्ष असणार आहेत, याची सर्व माहिती आम्ही तुम्हाला देऊ....

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबतची सुनावणी
महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाबाबतची सुनावणी घटनापीठासमोर दुसऱ्या क्रमांकावर आहे. निर्देशांसाठी हे प्रकरण आहे. आज सत्ता संघर्षाच्या प्रकरणात घटनापीठासमोर मुख्य युक्तिवादांची तारीख आज ठरण्याची शक्यता आहे.  

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक सुनावणी 
 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आज सुप्रीम कोर्ट काही आदेश देतं का याची उत्सुकता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबतचे प्रकरण क्रमांक 36 वर आहे.  

नवाब मलिकांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी आहे. मलिकांच्या वैद्यकीय प्रकृतीचा दाखल देत वकिलांकडून तातडीच्या सुनावणीसाठी विनंती करण्यात आली आहे. हायकोर्टानं सुनावणीची विनंती मान्य केली असून आज ही सुनावणी होईल. 
 
राज्य मंत्रिमंडळाची बैठक
आज सकाळी 11 वाजता मंत्रालयात मंत्रिमंडळाची बैठक आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्नाटक सीमावादा संदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे.  

वादग्रस्त वक्तव्यांविरोधात आज पुणे बंदची हाक 
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, भाजप नेते चंद्रकांत पाटील, भाजप नेते प्रसाद लाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या निषेधार्थ सामाजिक संघटना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांनी पुणे बंदची हाक दिलीय. 
 
आजपासून जी-20 परिषदेला सुरुवात होणार
मुंबईसह देशभराचे लक्ष लागून राहिलेल्या जी- 20 परिषेदेसाठी राज्य सरकारने तयारीचा वेग वाढविला आहे. या परिषदेअंतर्गत महाराष्ट्रात एकूण 14 बैठका होणार असून त्यातील आठ बैठका या मुंबईत पार पडणार आहेत. त्याशिवाय पुण्यात 4 तर नागपूर आणि औरंगाबादेत प्रत्येकी एक बैठक आयोजित करण्यात येणार आहे. आजपासून 16 तारखेपर्यंत मुंबईतील बिकेसी सेंटर येथे या बैठकीला सुरुवात होणार आहे.  
 तृतीयपंथीयांना ऑनलाइन साइटवर आजपासून पर्याय उपलब्ध 

आता तृतीयपंथीयांना देखील पोलिस आणि पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी फॉर्म भरतील येईल. आजपासून म्हणजेच 13 डिसेंबरपासून ऑनलाइन साइटवर पर्याय उपलब्ध असणार आहे.  

बिल्कीस बानोच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
बिल्कीस बानोच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. बिल्कीस बानो रेप केस प्रकरणी दोषी आरोपींची शिक्षा माफ करण्यात आली होती. याविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी होईल. 
 
जळगावात रास्ता रोको 
महापुरुषांबाबत बदनामीकारक वक्तव्यांविरोधात शाहू, फुले आणि आंबेडकरी संघटनांच्या वतीने मुंबई नागपूर हायवेवर रास्ता रोको करण्यात येणार आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget