(Source: ECI/ABP News/ABP Majha)
4 December Headline : मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री समृद्धी महामार्गाची पाहणी करणार, दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी मतदान; आज दिवसभरात
4 December Headline : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.
Todays 4 December Top Headline : बातमी कधी आणि कशी येईल सांगता येत नाही. अशात काही कार्यक्रम मात्र ठरलेले असतात. आज दिवसभरात काय काय कार्यक्रम आहेत. याबाबत आम्ही आपल्याला या बातमीतून माहिती देत आहोत. आज 4 डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत. याबरोबरच आज दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर नेव्ही विक सोहळ्याचा सर्वात थरारक आणि प्रेक्षणीय असा बिटिंग दी रिट्रीट हा कार्यक्रम गेट वे ऑफ इंडियाच्या समोर होणार आहे. त्याशिवाय अनेक महत्वाच्या घडामोडी आज दिवसभरात घडणार आहे. वाचा आज दिवसभरातील काही महत्वाच्या घडामोडींबद्दल
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आज समृद्धी महामार्गाची पाहणी करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज समृद्धी महामार्गाची पाहणी करणार आहेत.
राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. आज सकाळी 11 वाजल्यापासून मान्यवरांच्या भेटीगाठी, रत्नागिरी विधानसभा कार्यालयाचं उद्घाटन, पदाधिकाऱ्यांची बैठक, असे त्यांचे कार्यक्रम आहेत.
दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी मतदान
आज दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यापूर्वी दिल्लीत तीन महापालिका होत्या. मात्र आता केंद्र सरकारने तिन्ही महापालिकांची मिळून एक महापालिका केली आहे.
मुंबईत नेव्ही विक सोहळा
नेव्ही विक सोहळ्याचा सर्वात थरारक आणि प्रेक्षणीय असा बिटिंग दी रिट्रीट हा कार्यक्रम गेट वे ऑफ इंडियाच्या समोर होणार आहे. प्रात्यक्षिके आणि शिस्तबद्ध कवायती या सोहळ्याचे वैशिठ्य मानले जाते. मावळत्या सूर्याच्या साक्षीने नेव्ही जवान सादरीकरण करतील.
छत्रपती संभाजीराजे किल्ले विशाळगडला भेट देणार
छत्रपती संभाजीराजे किल्ले विशाळगडला भेट देऊन सद्यस्थितीची पाहणी करणार आहेत.
उदय सामंतांची पत्रकार परिषद
उद्योग मंत्री उदय सामंत नाशिक दौऱ्यावर आहेत. दिवसभर विविध कार्यक्रमांना उपस्थिती लावतील. दुपारी 12 वाजता उद्योजक बरोबर बैठक आहे. दुपारी दीड वाजता उदय सामंतांची पत्रकार परिषद होणार आहे.
विजयकुमार गावित यांची पत्रकार परिषद
आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांची पत्रकार परिषद होणार आहे. दुपारी 12 वाजता. बोगस आदिवासी प्रकरणावर माजी मंत्री के सी पाडवी यांनी केलेल्या आरोपांना ते उत्तर देणार आहेत.
डॉ. भागवत कराड परभणी दौऱ्यावर
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड परभणी दौऱ्यावर आहेत. भाजपा लोकसभा प्रवास योजना अंतर्गत भाजप नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. भाजपा प्रवास योजनेअंतर्गत भाजपनेते पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.