एक्स्प्लोर

22 January In History : शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन, राणी व्हिक्टोरियाचा मृत्यू; आजच्या दिवशी इतिहासात काय घडले?

On This Day In History :   आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. 

On This Day In History :  आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे  22 जानेवारी रोजी इतिहासात एका दु:खद घटनेची नोंद आहे. 22 जानेवारी 1999 रोजी ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांना ओडिशातील केओंजार येथे जमावाने जिवंत जाळले. या घटनेने संपूर्ण जगभर खळबळ उडाली होती. मनोहरपूर गावात जमावाने स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांची पेट्रोल टाकून पेटवून दिली. स्टेन्स ते जवळजवळ 30 वर्षे कुष्ठरोगी रुग्णांसाठी काम करत होते. परंतु त्या भागात धर्मांतर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यातूनच त्यांची हत्या करण्यात आली. याशिवाय आजच्या दिवशी इतिहासात कोणकोणत्या महत्वपूर्ण घटना घडल्या होत्या यांची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. 

1666 :  मुघल सम्राट शाहजहान यांचे निधन ( Mughal Emperor Shah Jahan )

आजच्या दिवशी म्हणजे 22 जानेवारी 1666 रोजी ताजमहालच्या रूपाने जगाला प्रेमाची महान देणगी देणारा मुघल सम्राट शाहजहान यांचे निधन झाले. जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहालच्या बांधकामासाठी मुघल राजघराण्याचा पाचवा आणि सर्वात लोकप्रिय सम्राट शहाजहानची आठवण आजही लोकांना आहे. ताजमहाल हा शाहजहान आणि त्याची प्रिय बेगम मुमताज महल यांच्या प्रेमाचे प्रतीक आहे. मुघल सम्राट शाहजहान हा कला आणि वास्तुकलेचा निस्सीम प्रेमी होता. यातूनच त्यांनी ताजमल बांधला होता. 

1901  :  राणी व्हिक्टोरियाचा मृत्यू  (Queen Victoria)

राणी व्हिक्टोरिया यांचा 22 जानेवारी 1901 रोजी मृत्यू झाला. 1837 मध्ये ग्रेट ब्रिटन आणि आयर्लंडची राणी म्हणून राणी व्हिक्टोरिया सिंहासनावर बसल्या आणि  त्यानंतर मृत्यूपर्यंत त्या राणीपदी विराजमान होत्या. राणी व्हिक्टोरिया या 36 वर्षे आणि 216 दिवस इंग्लंडवर राज्य करणाऱ्या राणी होत्या. 

1972 :  भारतीय राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे निधन ( Swami Ramanand Tirtha )

भारतीय राजनीतिज्ञ आणि शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचे 22 जानेवारी 1972 रोजी निधन झाले. स्वामी रामानंद हे स्वातंत्र्य लढ्यातील एक थोर नेते, शिक्षणतज्ज्ञ, विद्वान व ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भगवान खेडगीकर होते. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 रोजी कर्नाटकातील सिंदगी येथे झाला. गिरणी कामगारांच्या लढ्यात ते सक्रिय सहभागी झाले. ना. म. जोशींनी स्वामीजींना कामगारविषयक विधेयकाची माहिती घेण्यासाठी ऐन हिवाळ्यात दिल्लीला पाठविले. नंतर त्यांनी अध्यात्माची कास धरली. आपल्या जन्मनावाचा त्याग करून भिक्षुकी अंगीकारली. त्यानंतर हिप्परगा (तालुका लोहारा, जिल्हा उस्मानाबाद) येथे लखनौस्थित स्वामी नारायण यांच्याकडून संन्यासदीक्षा घेऊन ते स्वामी रामानंद तीर्थ झाले.  

1973 : नायजेरियात जॉर्डन एअरलाइन्सचे विमान कोसळले

नायजेरियात जॉर्डन एअरलाइन्सचे विमान कोसळले. या अपघातात जवळपास 200 जणांचा मृत्यू झाला होता. 

1973 : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताला कायदेशीर मान्यता दिली

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाताला कायदेशीर मान्यता दिली. गर्भपाताला गुन्ह्याच्या श्रेणीतून बाहेर काढत न्यायालयाने हा महिलांच्या गोपनीयतेचा घटनात्मक अधिकार असल्याचे म्हटले होते.

1980 : सोव्हिएत युनियनने सरकारविरोधी अणुशास्त्रज्ञ आंद्रेई सखारोव्हला अटक केली

सोव्हिएत युनियनने सरकारविरोधी अणुशास्त्रज्ञ आंद्रेई सखारोव्हला अटक केली. नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित सखारोव्ह यांनी एका अमेरिकन टेलिव्हिजन वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अफगाणिस्तानातून सोव्हिएत सैन्य मागे घेण्याची मागणी केली होती.

1996 :   पृथ्वीपासून सुमारे 3,50,000 प्रकाश-वर्षांच्या अंतरावर दोन नवीन ग्रह शोधले 

कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या वेधशाळेतील शास्त्रज्ञांनी पृथ्वीपासून सुमारे 3,50,000 प्रकाश-वर्षांच्या अंतरावर दोन नवीन ग्रह शोधले 

1999 : ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांना  जमावाने जिवंत जाळले

22 जानेवारी 1999 रोजी ऑस्ट्रेलियन मिशनरी ग्रॅहम स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांना ओडिशातील केओंजार येथे जमावाने जिवंत जाळले. या घटनेने संपूर्ण जगभर खळबळ उडाली होती. मनोहरपूर गावात जमावाने स्टेन्स आणि त्यांच्या दोन मुलांची पेट्रोल टाकून पेटवून दिली. स्टेन्स ते जवळजवळ 30 वर्षे कुष्ठरोगी रुग्णांसाठी काम करत होते. परंतु त्या भागात धर्मांतर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यातूनच त्यांची हत्या करण्यात आली. 
 
2001 : पाकिस्तानने देशातील सर्व तालिबान कार्यालये बंद केली आणि दहशतवादी मास्टरमाइंड ओसामा बिन लादेनची मालमत्ता गोठवली

पाकिस्तानने आजच्या दिवशी देशातील सर्व तालिबान कार्यालये बंद केली आणि दहशतवादी मास्टरमाइंड ओसामा बिन लादेनची मालमत्ता गोठवली 

2009 : सार्वजनिक खासगी भागीदारीवर आधारित तीन बंदर प्रकल्पांना सरकारने मान्यता दिली 

आर्थिक उदारीकरण, खासगीकरण आणि जागतिकीकरणाच्या युगात विकासाचा वेग वाढवण्यासाठी आणि सार्वजनिक खासगी सहकार्याला चालना देण्यासाठी गेल्या दशकात आर्थिक पटलावर एक नवीन संकल्पना वेगाने उदयास आली आहे, ती म्हणजे सार्वजनिक खासगी भागीदारी. जिथे एकीकडे सार्वजनिक खासगी भागीदारी आणि दुसरीकडे सरकारी खासगी सहकार्याद्वारे विकासाला चालना दिली जाते. तिथे सार्वजनिक गुंतवणूक मॉडेल सामान्यतः समाजवादी प्रवृत्ती असलेल्या देशांमध्ये स्वीकारले जाते. याच पार्श्वभूमीवर सार्वजनिक खासगी भागीदारीवर आधारित तीन बंदर प्रकल्पांना 22 जानेवारी 2009 रोजी सरकारने मान्यता दिली.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिंदे साहेबाकडे रोग आलाय का? राणेकडं काय कमी पडलंय? आमदार पळवणाऱ्या कंबोजकडून कोटी घ्या, एकेकाकडून पैसे गोळा केले तरी दिवसात हजार कोटी जमा होतील; मनोज जरांगे यांचं आवाहन
शिंदे साहेबाकडे रोग आलाय का? राणेकडं काय कमी पडलंय? आमदार पळवणाऱ्या कंबोजकडून कोटी घ्या, एकेकाकडून पैसे गोळा केले तरी दिवसात हजार कोटी जमा होतील; मनोज जरांगे यांचं आवाहन
Ind Vs Pak Asia Cup Final: गौतम गंभीर कानात काहीतरी पुटपुटला अन् अर्शदीप वाऱ्याच्या वेगाने मैदानात धावत गेला, VIDEO व्हायरल
गौतम गंभीर कानात काहीतरी पुटपुटला अन् अर्शदीप वाऱ्याच्या वेगाने मैदानात धावत गेला, VIDEO व्हायरल
Pune News: पुणे तिथे काय उणे; वैतागलेल्या पुणेकरांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर केली खराब रस्त्यांची पूजा
पुणे तिथे काय उणे; वैतागलेल्या पुणेकरांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर केली खराब रस्त्यांची पूजा
Manoj Jarange Patil : ओला दुष्काळ जाहीर करा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील चौथा हिस्सा घ्या, फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्ती घ्या; जरांगे पाटलांच्या 8 मागण्या
ओला दुष्काळ जाहीर करा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील चौथा हिस्सा घ्या, फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्ती घ्या; जरांगे पाटलांच्या 8 मागण्या
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100th Foundation Day : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष; पाहा संपूर्ण प्रवास
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम
Manoj Jarange Dasara Melava : आडनाव सारखं असेल तरी कुणबी प्रमाणपत्र मिळणार? जरांगे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिंदे साहेबाकडे रोग आलाय का? राणेकडं काय कमी पडलंय? आमदार पळवणाऱ्या कंबोजकडून कोटी घ्या, एकेकाकडून पैसे गोळा केले तरी दिवसात हजार कोटी जमा होतील; मनोज जरांगे यांचं आवाहन
शिंदे साहेबाकडे रोग आलाय का? राणेकडं काय कमी पडलंय? आमदार पळवणाऱ्या कंबोजकडून कोटी घ्या, एकेकाकडून पैसे गोळा केले तरी दिवसात हजार कोटी जमा होतील; मनोज जरांगे यांचं आवाहन
Ind Vs Pak Asia Cup Final: गौतम गंभीर कानात काहीतरी पुटपुटला अन् अर्शदीप वाऱ्याच्या वेगाने मैदानात धावत गेला, VIDEO व्हायरल
गौतम गंभीर कानात काहीतरी पुटपुटला अन् अर्शदीप वाऱ्याच्या वेगाने मैदानात धावत गेला, VIDEO व्हायरल
Pune News: पुणे तिथे काय उणे; वैतागलेल्या पुणेकरांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर केली खराब रस्त्यांची पूजा
पुणे तिथे काय उणे; वैतागलेल्या पुणेकरांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर केली खराब रस्त्यांची पूजा
Manoj Jarange Patil : ओला दुष्काळ जाहीर करा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील चौथा हिस्सा घ्या, फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्ती घ्या; जरांगे पाटलांच्या 8 मागण्या
ओला दुष्काळ जाहीर करा, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातील चौथा हिस्सा घ्या, फडणवीस, शिंदे, ठाकरे, राणे, पवारांसह राजकीय नेत्यांची संपत्ती घ्या; जरांगे पाटलांच्या 8 मागण्या
अश्वदेवं... वंशावळ सुरू राहते, म्हणत दसऱ्याच्या मुहूर्तावर घोड्यांचे पूजन; चर्चा तर होणारच
अश्वदेवं... वंशावळ सुरू राहते, म्हणत दसऱ्याच्या मुहूर्तावर घोड्यांचे पूजन; चर्चा तर होणारच
Manoj Jarange Patil: मराठ्यांनी यापुढे शासक आणि प्रशासक सुद्धा व्हावं लागेल, नेता हात जोडून समोर उभा राहील; नारायणगडावरून मनोज जरांगेंची भावनिक साद
मराठ्यांनी यापुढे शासक आणि प्रशासक सुद्धा व्हावं लागेल, नेता हात जोडून समोर उभा राहील; नारायणगडावरून मनोज जरांगेंची भावनिक साद
भारतानं सांगूनही रशियानं ऐकलं नाही, पाकिस्तानला लढाऊ विमानाचं इंजिन पाठवणार, पुतिन यांचा डबल गेम, जाणून घ्या काय घडलं? 
भारतानं सांगूनही रशियानं ऐकलं नाही, पाकिस्तानला लढाऊ विमानाचं इंजिन पाठवणार, पुतिन यांचा डबल गेम
Video: मी थोड्या दिवसाचा पाहुणा, मनोज जरांगे पाटलांचं भावनिक भाषण; नारायण गडावर डोळ्यातून अश्रू
Video: मी थोड्या दिवसाचा पाहुणा, मनोज जरांगे पाटलांचं भावनिक भाषण; नारायण गडावर डोळ्यातून अश्रू
Embed widget