एक्स्प्लोर

Gadchiroli News:  गडचिरोली: चकमकीत 3 नक्षलवादी ठार; गडचिरोली पोलिसांची मोठी कामगिरी

Gadchiroli News: गडचिरोलीत पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन नक्षली ठार झाले आहेत.

Gadchiroli News:  महाराष्ट्र दिनाच्या पूर्वदिनी गडचिरोली पोलिसांना मोठं यश मिळाले. भामरागड तालुक्यात झालेल्या पोलीस तीन नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये नक्षली दलमच्या महत्त्वाच्या कॅडरचा समावेश आहे. 

पेरिमिली आणि अहेरी दलम हे मनेराजाराम ते पेरिमिली पोलीस मदत केंद्रा दरम्यान कडमारा येथील जंगल परिसरात नक्षली तळ ठोकून असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली.  मिळालेल्या माहितीच्या आधारे जंगल परिसरात शोध मोहीम राबवण्यासाठी उप पोलीस मुख्यालय प्राणहिता अहेरी येथून दोन सी-60 पथक नक्षल ऑपरेशनसाठी पाठवण्यात आले होते. 

पोलिसांची ही शोध मोहीम सुरू असताना नक्षलवाद्यांनी सी-60 च्या पथकावर गोळीबार केला. या गोळीबाराच्या प्रत्युत्तरात पोलिसांनी गोळीबार सुरू केला. ही चकमक सुमारे रात्री 8 वाजताच्या दरम्यान घडली.  गोळीबार थांबल्यानंतर शोध मोहिमेदरम्यान शस्त्रे आणि इतर साहित्यासह तीन नक्षलवादी पुरुषांचे मृतदेह सापडले आहेत.  

पेरिमिली दलमचा कमांडर बिटलू मडावी यांचा एक मृतदेह आणि इतर दोन मृतदेह पेरिमिली दलमच्या वासू आणि अहेरी दलमच्या श्रीकांत यांचे असल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट झाले आहे.  प्राथमिक माहिती अशी आहे की वासू यांना पेरिमिली एलओएसच्या 2023 मध्ये डीव्हीसीएम पदावर आणि श्रीकांत यांना उपपदावर पदोन्नती देण्यात आली होती. अहेरी LOS चे कमांडर याची पडताळणी केली जात आहे.

बिटलू मडावी याने यावर्षी 9 मार्च रोजी पोलीस भरतीत गेलेल्या साईनाथ नरोटे याची पोलीस खबरी असल्याचे कारण देऊन हत्या केली होती. हत्येसह फेब्रुवारी/मार्च 2023 मध्ये विसामुंडी आणि आलेंगा येथे रस्ते बांधकाम उपकरणांची जाळपोळ करण्याच्या दोन घटनांमध्ये मुख्य आरोपी होता. चकमक घडलेल्या घटनास्थळी अजून ही सर्च ऑपरेशन सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

काही दिवसांपूर्वी छत्तीसगडमधील दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी हल्ल्यात 11 जवान ठार झाले होते. या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील गडचिरोलीत अलर्ट जारी करण्यात आला होता. छत्तीसगडच्या सीमेला लागून असलेल्या भागात अधिक खबरदारी बाळगण्याचे निर्देश देण्यात आले होते. 

छत्तीसगडमधील दंतेवाडात हल्ला

माओवादी मोठ्या प्रमाणावर असल्याच्या माहितीवरून दंतेवाडा येथून डीआरजी जवानांना रवाना करण्यात आले. यानंतर सर्व जवान तेथून परतत होते. दरम्यान, नक्षलवाद्यांनी अरणपूर रस्त्यावरील पालनार येथे स्फोट घडवला. हे सैनिक खासगी वाहनाने निघाले होते. या हल्ल्यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला. तो या खाजगी वाहनाचा चालक होता. हल्ल्यानंतर जवानांकडूनही प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली. यात काही नक्षलवादीही जखमी झाल्याची माहिती आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget