एक्स्प्लोर
इंदापूरजवळ तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू
इंदापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरजवळ झालेल्या अपघातात तीन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. अभिजीत पाटील, दिग्विजय लोखंडे आणि संदीप ढवळे अशी अपघातात बळी पडलेल्या विद्यार्थ्यांची नावं आहेत.
हे तिघं जण अकलूज येथील रत्नाई कृषी महाविद्यालयात द्वितीय वर्षाला शिकत होते. अकलूजमधील एका चौकात दूध पिताना अभिजीतचा मोबाईल एका कट्ट्यावर राहिला. विसरलेला मोबाईल मिळवण्यासाठी तिघं एका दुचाकीवरुन शुक्रवारी रात्री इंदापूरला आले होते.
मोबाईल एका ट्रॅव्हलच्या चालकाने नेल्याचे त्यांना समजलं. तो चालक इंदापूर येथील एका ढाब्यावर असल्याचं कळताच तिघं बाईकवरुन मोबाईल आणण्यासाठी रात्री अकरा वाजता निघाले. इंदापूर येथे मोबाईल मिळाल्यानंतर अकलूजकडे येत असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या भरधाव कारनं धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती, की यात तिघांचाही जागीच मृत्यू झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
छत्रपती संभाजी नगर
महाराष्ट्र
बातम्या
नाशिक
Advertisement