एक्स्प्लोर

 'जाणूनबुजून लसीकरण टाळणारी लोकं समाजात इतरांसाठी धोका' - हायकोर्ट

vaccination : दुसरा डोस पूर्ण न केलेल्यांना आरटी-पीसीआर चाचणी सक्तीची करण्याचा निर्णय योग्यच, हायकोर्टाचा निर्णय

vaccination  : कोरोना लसीकरण करण्यास जाणूनबूजून टाळाटाळ करणाऱ्यांमुळेच कोरोनाचा प्रसार आणि संक्रमणचा धोका अधिक होत असल्याचं निरीक्षण मुंबई उच्च न्यायालृानं नोंदवलं आहे. मुंबई पोर्ट ट्रस्टनं दुसरा डोस न घेतलेल्या कर्मचाऱ्यांसाठी दर दहा दिवसांनी स्वखर्चानं आरटीपीसीआर चाचणी करणं अनिवार्य केल्याचा निर्णय योग्यच असल्याचं स्पष्ट करत त्याविरोधात न्यायालयाची पायरी चढलेल्या कर्मचाऱ्यांना कोणताही दिलास देण्यास नकार दिला आहे. तसेच जी व्यक्ती लसीकरण टाळून कोविड संक्रमणाचा संभावित धोका पत्कारू शकते, त्या व्यक्तीने उपचाराचा खर्चही उचलण्याची तयारी ठेवावी, असे स्पष्ट करत हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली.

मुंबई पोर्ट ट्रस्टने 15 जून रोजी यासंदर्भात परिपत्रक जारी करत लसीकरण पूर्ण न केलेल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्याच खर्चाने कोणत्याही मान्यताप्राप्त रुग्णालयातून आरटीपीसीआर चाचणी करूनच कार्यालयात उपस्थित राहणं सक्तीचे केलंय. दर 10 दिवसांनी ही आरटीपीसीआर चाचणी लसीकरण पूर्ण न झालेल्या कर्मचा-यांना करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. त्या परिपत्रकाला एमपीटीच्या सात कर्मचाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हानं दिलं होते. एमपीटीचं हे परिपत्रक लसीकरण झालेल्या आणि लसीकरण न केलेल्या कर्मचार्‍यांमध्ये भेदभाव करणारं आहे. लसीकरण करणं हे ऐच्छिक असल्यामुळे ते करण्यासाठी भाग पाडले जाऊ शकत नाही. असा दावाही या याचिकेतून करण्यात आला होता. 

या याचिकेवर न्यायमूर्ती शाहरुख काथावाला आणि न्यायमूर्ती अभय अहुजा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. एमपीटीचा हा निर्णय याचिकाकर्त्यांच्या मूलभूत अधिकारांचं उल्लंघन करणारा आहे. लसीकरणाच्या आधारे व्यक्तींचे वर्गीकरण करणं योग्य नाही, कोविडवरील लस घेणं हे ऐच्छिक आहे. त्यामुळे लसीकरण करण्यास कुणालाही भाग पाडलं जाऊ शकत नाही, असं सांगत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून आरटीआयद्वारे मिळालेल्या उत्तराचा दाखलाही याचिकाकर्त्यांच्यावतीनं हायकोर्टात देण्यात आला. मात्र एमपीटीकडून या याचिकेला विरोध करण्यात आला. लसीकरण करण्यास नकार देणा-या कर्मचाऱ्यांना कोविड-19 चा संसर्ग होण्याचा जास्त धोका आहे. तसेच एमपीटीने अशा व्यक्तींच्या उपचाराचा खर्च उचलणार नसल्याचंही स्पष्ट केलेलं आहे.

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर हायकोर्टानं स्पष्ट केलं की, लसीकरण केलेल्या व्यक्तींपेक्षा लसीकरण न केलेल्या व्यक्तींना कोविड-19 चा प्रसार होण्याचा धोका जास्त असतो. एमपीटीसारख्या मोठ्या संस्थेसाठी उच्च स्तरावरील तपासणी आणि देखरेख ठेवण्याची आवश्यकता असणं वाजवी आहे. सध्याच्या परिस्थितीत लस न घेतल्यांची आरटीपीसीआर चाचणी करणं हे संस्थेचा व्यवसाय आणि उद्योग सुरळीत सूरू ठेवण्यासाठी गरजेचे आहे. तर दुसरीकडे, जी व्यक्ती लस न घेण्याचे निर्णय घेते तेव्हा ती स्वतः सोबत इतरांनाही धोका निर्माण करत असते. त्यामुळे आरटीपीसीआर चाचणीसाठी खिशातसे पैसे मोजण्यास नकार देणं हे असमर्थनीय आहे. लस न घेण्याचा निर्णय याचिकाकर्त्यांनीच घेतलेला आहे. त्यामुळे लस घेतलेल्यांना समान वागणूक मिळण्याची अपेक्षा याचिकाकर्ते करुच शकत नाहीत. त्यामुळे याचिकाकर्त्यांना कोविडचे संक्रमण झाल्यास त्यांच्यावर मोफत उपचार करण्यासही एमपीटी बांधील नाही. जी व्यक्ती लसीकरण टाळून कोविड संक्रमणाचा संभावित धोका पत्कारू शकते, त्या व्यक्तीने उपचाराचा खर्चही उचलण्याची तयारी ठेवावी, असे स्पष्ट करत हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली.

महत्त्वाच्या बातम्या

तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

Embed widget