(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Manoj Jarange Patil on Pankaja Munde : तर मतपेटीत काहीच राहिलं नसतं, पंकजा मुंडेंवरून मनोज जरांगे पाटील नेमकं काय म्हणाले?
सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी 13 जुलैपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिली होती. मात्र, सरकारकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे 20 जुलैपासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
Manoj Jarange Patil on Pankaja Munde : ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाके यांना आम्ही विरोधक मानलेलं नाही. छगन भुजबळ यांनीच त्यांना हुसकावण्यासाठी सांगितलं असेल, अशा शब्दात मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी तोफ डागली. आम्ही त्यांना ज्या दिवशी विरोधक मानू त्या दिवशी आम्ही त्यांच्यावर प्रतिक्रिया देऊ असेही पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाचा इशारा दिला आहे.
सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी 13 जुलैपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिली होती. मात्र, सरकारकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे 20 जुलैपासून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्या दिवशीच मोठी घोषणा करू, असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर आता पुन्हा सरकार काय निर्णय घेणार याकडे लक्ष आहे.
मी पंकजा मुंडे यांना पाडा असं म्हटलं नाही
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी आज बोलताना सांगितले की, पंकजा मुंडे यांना लोकसभा निवडणुकीमध्ये पाडा, असे मी कुठेही म्हटलं नव्हतं, असे सांगितले. मी कोणाचं नाव घेतले नाही, जर मी नाव घेतलं असतं, तर मतपेटीत काहीच राहिलं नसतं, अशा खोचक शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की मिस्त्री मुस्लिम असतो, त्याच्या टोपल्या उचलायला मराठ्याचा पोरगा असतो. किती दिवस त्यांनी असा अन्याय सहन करायचा? दलित मुलांनी किती दिवस कामगार म्हणून राहायचे अशी विचारणा पाटील यांनी केली. आरक्षण असून फायदा होत नाही, याचा विचार बंजारा समाजाने करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
दरम्यान, एमआयएम खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी जरांगे पाटील यांचा प्रस्ताव आल्यास चर्चेस तयार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, मला प्रस्ताव काय आहे हेच माहीत नसल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या