एक्स्प्लोर

अंबरनाथ शहरात कोरोना बाधितांच्या उपचारांसाठी जागाच नाही; कोविड रुग्णालय फुल

अंबरनाथ शहरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या उपचारांसाठी रुग्णालयात जागाच शिल्लक नाहीत. एकमेव कोविड स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सगळे बेड फुल झाले आहेत. परिणामी अनेक रुग्णांवर क्वॉरंटाईन सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.

अंबरनाथ : राज्यात अनेक शहरांमध्ये वाढत्या कोरोना बाधित रुग्णांमुळे रुग्णालये कमी पडू लागली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारांसाठी जागाच उरलेली नाही. कारण शहरातल्या एकमेव कोविड स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सगळे बेड फुल झाले आहेत. इतर कुठलीही व्यवस्था पालिकेनं अद्याप उभारलेली नाही. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या कोरोना संक्रमित रुग्णांचे हाल होत आहे. अंबरनाथ शहरात आत्तापर्यंत 165 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी 112 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या उपचारांसाठी पालिकेनं सिटी हॉस्पिटल हे 60 बेडचं खासगी हॉस्पिटल ताब्यात घेतलं आहे. तिथली क्षमता संपल्यानं कोरोना संशयितांसाठी तयार करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना ठेवण्याची वेळ पालिकेवर आली होती. मात्र, आता तिथेही जागा संपल्यानं दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांना ठेवायचं कुठे? असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे. दुसरीकडे पालिकेकडून 500 बेड्सचं कोविड केअर सेंटर उभारण्याचं काम सुरू असलं, तरी ते ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अतिशय संथगतीनं सुरू असल्यानं आता आपत्कालीन परिस्थितीत काय करावं? अशा पेचात पालिकेचे अधिकारी सापडले आहेत, अशी माहिती डॉ. धीरज चव्हाण, अतिरिक्त मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद यांनी दिली. Lockdown 5.0 | राज्य सरकारची नियमावली जाहीर, कंटेनमेंट झोन वगळता अनेक निर्बंध शिथील राज्यात कोरोना बाधितांचा संख्या वाढतेय राज्यात आज कोरोनाच्या 2487 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 67,655 वर गेली आहे. यापैकी सध्या राज्यात 36031अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात 89 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2286 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 1248 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत 29,329 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 62 हजार 176 नमुन्यांपैकी 67655 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 58 हजार 100 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 34 हजार 480 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. Unlock MAH Guidelines | राज्यात तीन जूनपासून अनलॉक! पाहा महाराष्ट्रात काय सुरू काय बंद असणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Embed widget