एक्स्प्लोर

Lockdown 5.0 | राज्य सरकारची नियमावली जाहीर, कंटेनमेंट झोन वगळता अनेक निर्बंध शिथील

कंटेंनमेंट झोनमध्ये कोणताही शिथिलता नाही. मुंबई आणि एमएमआर रिजनमधील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.

मुंबई : देशभरात लॉकडाऊन-5 ची घोषणा झाल्यानंतर राज्य सरकारनेही लॉकडाऊन बाबतची नियमावली जाहीर केली आहे. राज्य सरकारनेही 30 जूनपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आता तीन टप्प्यात अनेक गोष्टी सुरू करण्यात येणार आहेत. रेड झोनमधील महापालिकांमध्येही काही गोष्टी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत. मात्र राज्यांतर्गत प्रवासावरील निर्बंध कायम असून मॉल-हॉटेल आणि मंदिरेही बंदच ठेवण्यात येणार आहेत.

3 जूनपासून खालील सूट लागू होणार

- प्लंबर, इलेक्ट्रिशियन, पेस्ट कंट्रोल आणि तंत्रज्ञ यांना काम करण्याची परवानगी - गॅरेजही सुरू करण्यास परवानगी, मात्र आधी वेळ ठरवून घेण्याच्या सूचना - सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थितीस परवानगी, आधी ही उपस्थिती 5 टक्के होती

कंटेंनमेंट झोनमध्ये कोणताही शिथिलता नाही

- मुंबई आणि एमएमआर रिजनमधील महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रात लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात सूट - यात संचारबंदी सकाळी 5 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सूट - ग्रुपने एकत्र जमा होण्यास बंदी - शारीरिक कसरतीसाठी काही वेळ बाहेर पडण्यास परवानगी, यासाठी जवळच्या मोकळ्या जागांची वापर करता येणार, दूर जाण्यास मनाई

5 जूनपासून खालील सूट

- मॉल्स आणि मार्केट कॉम्प्लेक्स वगळून सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू करण्यास परवानगी, यासाठी सम आणि विषम फॉर्म्युला वापरणार, सम तारखेला एका रस्त्यावरील दुकाने तर विषय तारखेला समोरच्या रस्त्यातील दुकाने खुली राहणार - कपड्याच्या दुकानातील चेंजिंग आणि ट्रायल रुम बंद राहणार - दुकानात गर्दी होणार नाही याची खबरदारी दुकानदाराने घ्यायची, यासाठी टोकन पद्धत, होम डिलिव्हरीसारखे पर्याय वापरायचे - खरेदीसाठी लोकांना शक्य असेल तर जवळच्या मार्केटमध्ये चालत,अथवा सायकलने जाण्याच्या सूचना - अत्यावश्यक वस्तूच्या खरेदीशिवाय इतर वस्तूच्या खरेदीला दूर जाण्यास मनाई - खरेदीसाठी गर्दी आढळल्यास स्थानिक प्रशासन मार्केट बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते

8 जूनपासून खालील बाबींमध्ये सूट

- सर्व खाजगी कार्यालये 10 टक्के कर्मचारी उपस्थिती चालवण्यास परवानगी, उरलेल्या लोकांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय - कामाच्या ठिकाणी सर्व खबरदारी घेण्याच्या सूचना - अत्यावश्यक सेवेसाठी टॅक्सी 1 चालक 1 प्रवासी, रिक्षा 1 चालक 2 प्रवासी, खाजगी चारचाकी 1 चालक 2 प्रवासी आणि दुचाकीवर केवळ एकाला प्रवास करण्याची परवानगी

उर्वरित राज्यात

-परवानगी दिलेल्या सेवा सुरू करण्यास सरकारच्या किंवा कोणत्याही यंत्रणेच्या परवानगीची गरज नाही - खुली स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्टेडियम आणि मोकळी मैदाने व्यायामासाठी खुली करण्याची परवानगी, मात्र एकत्र येऊन ग्रुपने कोणतेही व्यायाम प्रकार करता येणार नाहीत - स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्टेडियमच्या अंतर्गत भागात कोणतीही परवानगी नाही - जिल्हा अंतर्गत बससेवा 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालवण्यास परवानगी - सर्व मार्केट, दुकाने सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत खुली करण्यास परवानगी - गर्दी आढळल्यास मात्र बंद करण्याचा इशारा - राज्याबाहेर जाण्यासाठी किंवा आपल्या राज्यात येण्यासाठी परवानगीची गरज लागणार - राज्यांतर्गत एका जिल्ह्यातून दुस-या जिल्ह्यात अथवा दुस-या शहरात प्रवासासाठीही परवानगीची गरज लागणार - संपूर्ण राज्यात खालील बाबींवर बंदी कायम - शाळा, कॉलेज, शैक्षणिक ट्रेनिंग सेंटर, कोचिंग क्लासेस बंद राहणार - आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद राहणार - मेट्रो बंद राहणार - स्विमिंग पूल, जिम, सिनेमागृह, धार्मिक स्थळे, सलून, स्पा, ब्यूटी पार्लर, शॉपिंग मॉल्स, हॉटेल, रेस्टॉरंट बंद राहणार

Unlock MAH Guidelines | राज्यात तीन जूनपासून अनलॉक! पाहा महाराष्ट्रात काय सुरू काय बंद असणार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Embed widget