एक्स्प्लोर
Advertisement
मराठवाड्यात येत्या 48 तासात अतिवृष्टीची शक्यता : हवामान विभाग
औरंगाबाद : मराठवाड्यात येत्या 48 तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बुधवारी मध्यरात्रीपासून मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
दोन दिवसांपूर्वीच मराठवाड्यातील काही भागात मान्सून सक्रीय झाल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं होतं. राज्यात दाखल होण्याआधीपासूनच पावसाने मराठवाड्यात जोरदार हजेरी लावली होती.
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातल्या 74 तालुक्यात चांगला पाऊस झाला असून, 50 हून अधिक ठिकाणी अतिवृष्ठी झाली आहे. पहिल्याच पावसात नदी-नाल्यांना पूर आल्याने धरणांमधला पाणीसाठा वाढणार आहे.
पाऊस झाल्याने मराठवाड्यातील शेतकरी कामाला लागला आहे. मात्र समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करु नये, असं आवाहन कृषी तज्ञांनी केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement