एक्स्प्लोर

बारामतीत चाणक्य लिहिलेला देवेंद्र फडणवीसांचा बॅनर पेटवला, पोलीस धावले, घटनास्थळी तणाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बारामतीत लावण्यात आलेला बॅनर अज्ञाताने  पेटवला आहे. बारामती नगर परिषदेसमोर लावलेला देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरला जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला

पुणे : राज्यातील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळालं असून 132 जागांसह भाजप महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर, महायुतीनेही 237 जागांवर विजय मिळवत मोठं बहुमत मिळवल्याने राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील लढाईत महाविकास आघाडीचं पानीपत झाल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वात महाविकास आघाडी निवडणूक लढवती. मात्र, मविआचा मोठा पराभव झाला असून शरद पवारांच्या (Sharad pawar) राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ 10 जागांवर यश मिळालं आहे. त्यामुळे, देवाभाऊंनी दाखवून दिलं, देवाभाऊच महाराष्ट्राचे खरे चाणक्य अशी बॅनरबाजी देखील सोशल मीडियात पाहायला मिळाली. मात्र, बारामतीमधील असाच एक बॅनर वादग्रस्त ठरला असून बारामतीत झळकावलेला हा बॅनर एका अज्ञाताने पेटवल्याची घटना घडली आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बारामतीत लावण्यात आलेला बॅनर अज्ञाताने  पेटवला आहे. बारामती नगर परिषदेसमोर लावलेला देवेंद्र फडणवीस यांच्या बॅनरला जाळून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र पेटवल्यानंतर तो अर्धा जळाला असून अर्धाच शिल्लक राहिल्याचं दिसून आले. बारामतीत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर भाजपच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला होता. त्यावर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा चाणक्य असा उल्लेख देखील केला होता. त्यामुळे, बारामतीमधील काही अज्ञातांनी हा बॅनर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, भाजप कार्यकर्त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तर, पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले होते. दरम्यान, राज्यातील विधानसभा निवडणूक ही दोन व्यक्तींची लढाई म्हटल्यास शरद पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस यांच्यातच होती, असा राजकीय कयास लावला जातो. त्यामुळे, महायुतीच्या विजयानंतर देवेंद्र फडणवीस यांचा गौरव करताना शरद पवारांवरही अनेकांनी टीका केली. 

लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर शरद पवार हेच राजकीय चाणक्य असल्याचं महाविकास आघाडी व राष्ट्रवादीच्या समर्थकांकडून म्हटलं जात होतं. कारण, लोकसभा निवडणुकी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता. तसेच, त्यांचे 9 खासदार निवडून आले होते. तर, राज्यात महाविकास आघाडीला 30 जागांवर यश मिळालं होतं. त्यामुळे, विधानसभा निवडणुकीतही मविआला मोठ्या विजयाची अपेक्षा होती. मात्र, मविआचा दारुण पराभव झाला. त्यामुळे, महायुतीच्या विजयाचं श्रेय भाजप नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनाच दिले जात आहे. त्यातूनच देवाभाऊ, चाणक्य असा उल्लेख केला जात आहे. मात्र, बारामतीमधील चाणक्य नावाने त्यांचा झळकलेला बॅनर अज्ञातांकडून पेटवण्यात आला आहे. याबाबत माहिती मिळताच बारामती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तो उर्वरीत बॅनर खाली उतरवला. 

हेही वाचा

Nagpur Oath Ceremony: महायुतीच्या 39 मंत्र्यांची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, पुणे, बीडसह अनेक जिल्ह्यात जल्लोष ; A टू Z स्टोरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vasai Jewellers Robbery CCTV : हेल्मेट घालून आले थेट बंदूक काढली, ज्वेलर्स दुकानातील दरोड्याचा थरार!Sakshana Salgar on Santosh Deshmukh:देशमुखांची लेक 12वीत,न्यायासाठी दारोदारी जात रडतेय;वाईट वाटतंय!Beed Santosh Deshmukh Case MCOCA Update : संतोष देशमुख हत्याप्रकरणी सर्व आरोपींवर मकोकाSuresh Dhas on MCOCA : अजून बऱ्याच लोकांवर मकोका लागणार...सुरेश धसांचा रोख कुणावर?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Nimbalkar : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
हेमंत निंबाळकर : कर्नाटकमध्ये नक्षल्यांना गुडघ्यावर आणणारा कोल्हापूरचा रांगडा आयपीएस अधिकारी
Santosh Deshmukh Case : माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
माझ्या वडिलांचा खून झाला, 18 वर्षे खटला सुरूय; पण देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी केस फास्टट्रॅकवर चालवा; ओमराजे निंबाळकर कडाडले
Devendra Fadnavis : संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
संजय राऊतांच्या स्वबळावरच्या घोषणेवर देवेंद्र फडणवीसांची एका शब्दात प्रतिक्रिया, म्हणाले....
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
Beed: बीडमध्ये स्त्री-भ्रूण हत्येचा परिणाम, मुलींचा जन्मदर घटला; 1000 मुलांमागे केवळ 865 मुली
IPO : पैसे तयार ठेवा, 2025 मध्ये शेअर बाजारात आयपीओची रांग लागणार,90 कंपन्यांकडून ड्राफ्ट दाखल
गुंतवणूकदारांसाठी कमाईची मोठी संधी,शेअर बाजारात 2025 मध्ये आयपीओचं जोरदार लिस्टींग...
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
69 वर्षीय आजोबांचा नाद खुळा; संभाजीनगरहून सुरुवात, पूर्ण केली 4000 किमी सायकल वारी; तरुणाईला मोलाचा संदेश
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
महाविकास आघाडी इतिहास जमा, फक्त अधिकृत घोषणा बाकी, शिंदे गटातील आमदाराच्या व्यक्तव्यानं भुवया उंचावल्या!
Sanjay Raut : स्वबळाच्या नाऱ्यानं महाविकास आघाडीत वितुष्ट येईल का? संजय राऊत यांचं दोन शब्दात उत्तर, तर्क वितर्क थांबणार?
स्वबळाच्या नाऱ्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण, मविआच्या प्रश्नावर संजय राऊतांनी दोन शब्दात उत्तर देत सगळं स्पष्ट केलं
Embed widget