(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde : औषधी आणि वैद्यकीय उपकरणे खरेदीला स्थगिती आदेश लागू नाही, मुख्यमंत्र्यांचे आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागाला निर्देश
औषधी आणि वैद्यकीय उपकरणे खरेदीला स्थगिती आदेश लागू नसल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली.
CM Eknath Shinde : औषधी आणि वैद्यकीय उपकरणे खरेदीला स्थगिती आदेश लागू नसल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी दिली. आरोग्य सेवा ही एक अत्यावश्यक सेवा आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण विभाग (Department of Medical Education) आणि औषधी द्रव्ये विभाग (Department of Medicines) तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून (Department of Public Health) खरेदी करावयाच्या औषधे, सर्जिकल्स साहित्य, कन्झुमेबल्स, रसायने व उपकरणे यांना स्थगितीच्या आदेशातून वगळण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला हे निर्देश दिले आहेत.
आरोग्य सेवा ही एक अत्यावश्यक सेवा आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत तसेच सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत ही सेवा राज्यातील जनतेला पुरवण्यात येते. वैद्यकीय शिक्षण देण्याचे व संशोधनाची कामेही करण्यात येतात. राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत 1 एप्रिल 2021 पासून आतापर्यंत जिल्हा वार्षिक योजना, राज्यस्तरीय योजना, आदिवासी उप योजना निधीतून मंजूर करण्यात आलेल्या परंतू निविदा न काढलेल्या कामाच्या अंमलबजावणीस पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यासंबंधीचे रितसर प्रस्ताव तत्काळ सक्षम प्राधिकारी यांच्यासमोर निर्णयार्थ सादर करण्यात यावेत, असे मुख्य सचिवांनी कळवले आहे.
दरम्यान, नुकोरोनाच्या संकटामुळं आरोग्य यंत्रणेवरील ताणही वाढलेला आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या पावसाळ्यात संसर्गजन्य आजार आणि साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांमध्ये बऱ्याच ठिकाणी पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत. उपकरणाअभावी या सुविधा पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच पावसाळयातील साथीचे आजार, कोव्हिडसारखी जागतिक महामारी आणि आरोग्यविषयक अत्यावश्यक सुविधा हाताळण्यासाठी या स्थगिती आदेशामधून या दोन विभागांना वगळण्याचा निर्णय झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: