एक्स्प्लोर

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली रतन टाटांची भेट, भेटीनंतर म्हणाले...

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांची आज भेट घेतली. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

CM Eknath Shinde Meet Ratan Tata : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांची आज भेट घेतली. बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, रतन टाटा यांची सदिच्छा भेट घेतली. त्यांची तब्येत ठीक आहे. निर्णयांच्या स्थगितीबाबत यावेळी त्यांना विचारलं असता ते म्हणाले की, जी कामं ठाकरे सरकारच्या काळात शेवटच्या काळात घाईत मंजूर झाली त्यांना स्थगिती दिली. अत्यावश्यक कामांना स्थगिती नाही. सरकार बदललं म्हणून लोकविकासाची काम कुठलीही रद्द होणार नाहीत. अत्यावश्यक जी कामं आहेत ती रद्द होणार नाहीत, चुकीच्या पद्धतीनं जी कामं झाली त्यावर मात्र नक्की विचार केला जाईल. घाईघाईने केलेली काम आहेत त्यांना स्थगिती दिली आहे.  अधिकाऱ्यांचा काहीही प्रश्न नाही, माझी त्यांच्याशी बैठक झाली आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. 

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल विचारलं असता 'त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत', असं म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्याकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना शुभेच्छा

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज 62 वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांचा उल्लेख केवळ माजी मुख्यमंत्री असा केला आहे. शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख करणं एकनाथ शिंदे यांनी टाळलं आहे.  एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी आई जगदंबेचरणी प्रार्थना असे म्हणून त्यांचे अभिष्टचिंतन केले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करताना शिवसेना पक्षप्रमुख म्हणणं टाळलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी जरी उद्धव ठाकरेंना शिवसेना पक्षप्रमुख म्हणणं टाळलं असलं तरी एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेक बंडखोर नेत्यांनी मात्र उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देताना त्यांचा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख असा केला आहे. माजी मंत्री गुलाबराव पाटील, शिवाजी आढळराव पाटील, धैर्यशील माने यांच्यासह काही बंडखोर नेत्यांनी उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देताना त्यांच्या नावाआधी शिवसेना पक्षप्रमुख असा उल्लेख केला आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : 'शिवसेनेचा मुख्यमंत्री पुन्हा होईल, विधानसभा निवडणुका होऊ द्या; मग दाखवतोच!'; उद्धव ठाकरेंचा मुलाखतीच्या दुसऱ्या भागातही हल्लाबोल

Uddhav Thackeray Interview : 'यांची भूकच भागत नाही, आता शिवसेनाप्रमुख व्हायचंय', उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर प्रहार

Uddhav Thackeray Interview : क्रॅम्प आला अन् मानेखालची हालचालच थांबली; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' अनुभव

महत्त्वाच्या बातम्या

Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Maharashtra Live News Updates: एसआयआर फॉर्म भरण्याचा आजचा शेवटचा दिवस
Mumbai Voter List News: मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
मुंबईत मतदार यादीत तब्बल 4 लाख 78 हजार 308 'मृत' मतदार; किरीट सोमय्यांनी उघड केली धक्कादायक आकडेवारी
Mumbai Crime Navy Sailor Family death: मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं
मुंबईतील नौदल अधिकाऱ्याचा वडिलांना शेवटचा मेसेज, “आकर हमारी डेड बॉडी लेकर जाना”, नंतर पत्नी-मुलांना विष दिलं अन् स्वत:ही आयुष्य संपवलं

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Rahul Gandhi: 'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
'संकटात त्यांच्या पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य, हेमंत सोरेन यांनी विद्यार्थ्यांची प्रत्यक्ष भेट घ्यावी...' झारखंड आंदोलनावर राहुल गांधींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Embed widget