एक्स्प्लोर
हुंड्याच्या वादातून तरुणीचा आमहत्येचा प्रयत्न, उपचारादरम्यान मृत्यू

बीड: बीडमध्ये हुंड्याच्या देण्याघेण्यावरुन झालेल्या वादामुळं तरुणीनं विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तर उपचार सुरु असताना मुलाच्या कुटुंबीयांनी विषारी औषध पाजल्याचा आरोप मनिषाच्या नातेवाईकांनी केला आहे.
मनिषा चव्हाण असं मृत पावलेल्या तरुणीचं नाव आहे. बीडमधील गेवराई तालुक्यातल्या कठोडा तांडा गावात ही धक्कादायक घटना घडली.
मनिषा आणि 22 वर्षीय विलास राठोड यांच्या दोघांच्या प्रेमप्रकरणाची माहिती चव्हाण आणि राठोड कटुंबीयांना झाली. त्यानंतर विलास राठोड या तरुणाशी लग्न करुन देण्यास चव्हाण कुटुंब तयारही झालं. दीड लाख रुपये हुंडाही ठरला. मात्र, त्यानंतर 5 लाखांची मागणी झाल्याचा आरोप चव्हाण कुटुंबीयांनी केला.
पाच लाख रुपये देण्यास नकार दिल्यानं दोन्ही कुटुंबातील वाद विकोपास गेला. याचाच राग मनात धरुन काल मनीषानं शेतात विषारी औषध प्राशन केलं. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखलही करण्यात आलं. विष प्राशन केल्यानं उपचार सुरु असताना मुलाच्या कुटुंबीयांनी विषारी औषध पाजल्याचा आरोपही मनिषाच्या नातेवाईकांनी केला आहे.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नाशिक
व्यापार-उद्योग
राजकारण
निवडणूक
Advertisement
Advertisement
























