एक्स्प्लोर

Thackeray Faction Vs BJP Activists Controversy At Rajkot Fort : त्यांना वाटत असेल, पण आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या नाहीत, राजकोट किल्ल्यावर राडा सुरु असताना आदित्य ठाकरेंचा बोचरा वार

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राजकोटवर पोहोचले असतानाच विद्यमान खासदार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह पुतळ्याची ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले.

Thackeray Vs BJP Activists Controversy At Rajkot Fort : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा फक्त आठ महिन्यांमध्ये कोसळल्यानंतर महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये एकच आक्रोश सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीकडून मालवणमध्ये मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. मात्र हा मोर्चा होण्यापूर्वीच राजकोटवर कट्टर विरोधक खासदार नारायण राणे विरुद्ध ठाकरेंची शिवसेना असा सामना रंगला. एकमेकांवर धावून जाण्याचा प्रकार सुद्धा घडला. 

एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार

महाविकास आघाडीचे कार्यकर्ते राजकोटवर पोहोचले असतानाच खासदार नारायण राणे माजी खासदार निलेश राणे यांच्यासह पुतळ्याची ठिकाणी पाहणी करण्यासाठी आले. या ठिकाणी नारायण राणे यांनी एबीपी माझाच्या प्रतिनिधीला दमदाटी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान हा सर्व प्रकार सुरू असतानाच ठाकरे गटाचे आणि भाजप समर्थक आमने सामने आल्याने एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार सुद्धा घडला. एकमेकांच्या कार्यकर्त्यांना ओढून मारण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे पुतळा पाहणीचा जो कार्यक्रम होता तो बाजूला पडून एकमेकांच्या कार्यकर्त्यांवर धावून जाण्याचा प्रकार घडल्याने या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. 

त्यांना वाटत असेल आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या असतील

हा राडा सुरु असताना ठाकरे गटाकडून सुद्धा पोलिसांना अल्टिम देण्यात आला. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी जर आम्हाला पंधरा मिनिटांमध्ये रस्ता करून दिला नाही, तर शिवसेना रस्त्यावरची संघटना आहे आम्ही सुद्धा दाखवून देऊ असा इशारा दिला. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर बोचरा वार केला. त्यांना वाटत असेल आम्ही कोंबड्या वगैरे आणल्या असतील, पण तसं काही नाही म्हणत एक प्रकारे नारायण राणे यांना राजकोट किल्ल्यावर बोचरा वार करण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी, नारायण राणे आणि निलेश राणे राजकोटवर पाहणी करत असतानाच आदित्य ठाकरे यांचेही आगमन झाले. यावेळी माजी खासदार विनायक राऊत सुद्धा होते. त्यामुळे ठाकरे आणि नारायण राणे गट आमने-सामने आल्याने दोन्हीकडील कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले.  यावेळी नारायण राणे यांच्या समर्थनार्थ सुद्धा घोषणा देण्यात आल्या. घोषणांचा प्रकार सुरू असतानाच पोलीस दोन्हीकडील कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न करत होते. मात्र या ठिकाणी पोलीस बळ अपूर्ण ठरल्याचे दिसून आले. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचा कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Walmik Karad- Jyoti Mangal Jadhav यांचा संबंध काय, FC रोडवरील संपत्तीचं गौडबंगाल काय? Vastav EP 122Walmik Karad Mother : माझ्या लेकाला न्याय मिळाला पाहिजे, सगळे गुन्हे खोटे, वाल्मिकच्या आईची सादWalmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजीDhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
टीका जिव्हारी लागली नाही, नोंद घ्यावी अशी ती व्यक्ती नाही, शरद पवारांचा अमित शाह यांना टोला 
Walmik Karad: वाल्मिक कराडविरोधात कोर्टात सरकारी वकिलांनी काय युक्तिवाद केला? CID अधिकाऱ्याची महत्त्वाची माहिती
Walmik Karad: सीआयडी अधिकाऱ्याचा कोर्टात महत्त्वाचं वक्तव्य, वाल्मिक कराडची भारताबाहेर संपत्ती?
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
Walmik Karad mother Parli : आईसोबत परळीकरांचाही ठिय्या, वाल्मिक कराड समर्थकांची घोषणाबाजी
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
वाल्मिक कराडचे समर्थक आक्रमक, दोन ठिकाणी आंदोलन, आईसोबत महिलांचा पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या, कार्यकर्ते टॉवरवर चढले!
Mutual Fund SIP : 25000 हजारांची एसआयपी दरवर्षी 10 टक्क्यांनी स्टेप अप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार? जाणून घ्या
25000 हजारांची एसआयपी 10 टक्क्यांनी स्टेपअप केल्यास 10 वर्षात किती परतावा मिळणार?
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
मंत्रालयातील ती लॅम्बोर्गिनी कुमार मोरदानींची, 116 एकर जमिनीची फाईल घेऊन मंत्र्यांसमोर; रोहित पवारांचा गौप्यस्फोट
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Dhananjay Deshmukh On SIT : नवीन एसआयटी स्थापन, पण धनंजय देशमुख नाराजच
Walmik Karad: विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी; 13 दिवस पोलीस कोठडीत राहिल्यानंतर ऐटीत राहणाऱ्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
विस्कटलेले केस, वाढलेली पांढरी दाढी ; 13 दिवस कोठडीत राहिलेल्या वाल्मिक कराडचं रुपडं पालटलं
Embed widget