एक्स्प्लोर
तेजस ठाकरेंकडून खेकड्याच्या आणखी 11 प्रजातींचा शोध
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडून तेजस ठाकरे यांनी खेकड्याच्या 11 दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला.
![तेजस ठाकरेंकडून खेकड्याच्या आणखी 11 प्रजातींचा शोध Tejas Thackeray finds rare species of crabs in Sahyadri latest update तेजस ठाकरेंकडून खेकड्याच्या आणखी 11 प्रजातींचा शोध](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/02/27091639/Tejas-Thackeray-Crab-2.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे धाकटे सुपुत्र तेजस ठाकरे यांनी आणखी काही खेकड्यांच्या प्रजातींचा शोध लावला आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये हिंडून तेजस यांनी तब्बल 11 दुर्मिळ प्रजातींचा शोध लावला. खेकड्यांच्या प्रजातींबद्दलचा त्यांचा हा शोधनिबंध न्यूझीलंडमधील ‘झुटाक्सा’ अंकात प्रसिद्ध झाला आहे.
तेजस ठाकरे यांनी यापूर्वीही खेकड्यांच्या काही प्रजातींचा शोध लावला आहे.
न्यूझीलंडच्या ‘झुटाक्सा’ हे नियतकालिक आणि वेबसाईटवर तेजस ठाकरे यांचं दुर्मिळ खेकड्यांविषयी दुसरं संशोधन प्रसिद्ध झालं आहे. विशेष म्हणजे पश्चिम घाटातील 'सह्याद्री' या रांगड्या मराठी नावावरुन एका खेकड्याचं 'सह्याद्रियाना' असं नामकरण करण्यात आलं आहे.
तेजस ठाकरेंनी शोधलेल्या खेकड्यांच्या प्रजातीवर अभ्यासाची परवानगी
घरापासून कित्येक आठवडे दूर राहत दऱ्याखोऱ्यांमध्ये भटकून सहकार्य करणाऱ्या टीमचेही तेजस ठाकरेंनी आभार व्यक्त केले आहेत. डोंगरदऱ्या, जंगलामध्ये फिरण्याची परवानगी, शोधमोहिमेसाठी लागणारं साहित्य अशी सर्वप्रकारची मदत त्यांना वन विभागाने केली.
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये दुर्मिळ खेकड्यांच्या शोधामुळे वन्य जीव संपत्ती जतन करण्याचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जैवविविधता असून त्याचं संवर्धन अत्यंत गरजेचं असल्याची प्रतिक्रिया तेजस ठाकरे यांनी व्यक्त केली.
यापूर्वी, कला शाखेत दुसऱ्या वर्षाला शिकत असताना तेजस यांनी खेकड्याच्या पाच प्रजाती शोधल्या होत्या. जंगल, झाडं आणि वन्य प्राण्यांचा अभ्यास करणं हा त्यांचा छंद आहे. सापाच्या दुर्मिळ प्रजातींचा शोध घेण्यासाठी ते कोकणात गेले होते. त्यावेळी रघुवीर घाटातील एका धबधब्यात गोड्या पाण्यातील खेकड्याच्या पाच प्रजातींचा शोध लागला.
गुबेरनॅटोरिआना ठाकरी, घातिमा अॅट्रोपर्पुरेआ, घातिआना स्प्लेन्डिडा, गुबेरनॅटोरिआना अल्कोकी आणि गुबेरनॅटोरिआना वाघी अशी या पाच प्रजातींची नावं ठेवण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग तालुक्यातील सावंतवाडीमध्ये गोड्या पाण्यात हे खेकडे आढळतात.
तेजस ठाकरेने शोधलेल्या खेकड्याच्या प्रजातीला ठाकरे कुटुंबाचं नाव
कोकण, सातारा, कोल्हापूर आणि अहमदनगरमध्ये फिरुन तेजस ठाकरे यांनी दुर्मिळ जातीच्या खेकड्यांच्या प्रजातींचा शोध लावला. खेकड्याच्या दुर्मिळ 11 प्रजाती कोणत्या? घाटियाना बोट्टी घाटियाना पल्च्रा घाटियाना रथब्युने गुबेरनाटोरियाना लाँगीपेस गुबेरनाटोरियाना मार्लेश्वरेनेसीस गुबेरनाटोरियाना वालासेई सह्याद्रियाना बिल्यारजानी सह्याद्रियाना पाछेपालूस सह्याद्रियाना सह्याद्रीनेसीस सह्याद्रियाना टेन्यूफालस सह्याद्रियाना वुडसासोनी![तेजस ठाकरेंकडून खेकड्याच्या आणखी 11 प्रजातींचा शोध](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/06/26051110/Tejas-Thackeray-Crab.jpg)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)