Nitin Gadkari : टाटा समूहाचं हब नागपूरमध्ये व्हावं, नितीन गडकरींचे टाटा सन्सच्या अध्यक्षांना पत्र
Tata group project : नागपूरला टाटा समुहाचं हब बनवण्याची विनंती करणारे पत्र टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांना लिहिलं आहे.
नागपूर: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पानंतर ( Vedanta-Foxconn Project) नागपूरला (Nagpur) होणारा C-295 लष्करी ट्रान्सफोर्ट एअरक्राफ्ट प्रकल्प आता गुजरातमधील (Gujarat) वडोदऱ्याला होणार आहे. या मुद्यावरुन सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू असताना एक मोठी माहिती समोर आली आहे. टाटाचा प्रकल्प नागपुरमध्ये (Nagpur) व्हावा यासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी (Nitin Gadkari) आग्रही होते. नागपूरला टाटा समुहाचं हब (Tata Airbus) बनवण्याची विनंती करणारे पत्र टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांना लिहिलं आहे.
टाटा सन्सचे अध्यक्ष नटराजन चंद्रशेखर यांना लिहिलेल्या पत्रात नितीन गडकरी म्हणाले, टाटा समुहाच्या विविध उद्योग आणि व्यापाराच्या अनुषंगाने नागपूरच्या मिहानमध्ये एसईझेड आणि नॉन एसईझेड अशा दोन्ही प्रकारचे जमिनी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. त्यामुळे टाटा समूहाच्या विविध उद्योगांसाठी मोठे गोदाम या ठिकाणी तयार करता येणार आहे.
नागपूरच्या मिहानमध्ये एअर इंडियाचे विमानांसाठीचे एमआरओ असून टाटा (Tata) समूह भविष्यातील व्यापार विस्ताराच्या संधीकडे पाहून मिहानमध्ये आणखी एमआरओ उभारू शकतो. तसेच स्वत:च्या एअरलाईन्ससाठी आणि इतर एअरलाईन्ससाठी स्पेअर पार्टचे मोठे गोदाम उभारू शकतो, असेही गडकरी यांनी पत्रात नमूद केले. मात्र, या पत्रात गडकरी यांनी कुठेही एअरबस सोबत टाटाचा प्रकल्पाबद्दल भाष्य केले नव्हते किंवा तो प्रकल्प नागपुरात येत आहे किंवा टाटांनी तो प्रकल्प नागपुरात आणावं असे नमूद केले नव्हते ही बाब विशेष आहे.
टाटा एअर बस प्रकल्प काय?
- या प्रकल्पातून मध्यम आकाराच्या वाहतुकीच्या विमानांची निर्मिती होणार
- एकूण 56 सी-295 या विमानांची निर्मिती करणार
- 40 विमानं दहा वर्षात देणार
- सी-295 एमडब्ल्यू विमानांना एव्हीआरओ- 748 विमानांना रिप्लेस करणार
- 5 ते 10 टन क्षमता असलेली विमानं, छोटी धावपट्टीवर उतरण्याची क्षमता असलेली विमान निर्मिती होणार
- 71 ट्रुप्स किंवा 50 पॅराट्रुपर्सची क्षमता असलेली विमानं, चार वर्षांच्या आत 16 विमानं एअरफोर्सला द्यावी लागणार
- या प्रकल्पामुळे 600 तज्ज्ञांसाठी थेट नोकरी निर्माण होईल.
- तर 3000 नोकऱ्या अप्रत्यक्षरित्या तयार होणार आहेत.
संबंधित बातम्या :
Vedanta-Foxconn प्रकल्प गमावल्यानंतर Tata-Airbus प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रयत्न, कसा आहे हा प्रकल्प?